IND vs AUS ODI Matches Live Streaming: रोहित शर्मा आणि विराट कोहली हे भारताचे दोन दिग्गज खेळाडू ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेत खेळताना दिसणार आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियामध्ये दाखल झाला असून संघाने सरावाला सुरूवात केली आहे. १९ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या या मालिकेतील सामने लाईव्ह कुठे पाहता येणार जाणून घेऊया.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका रविवार, १९ ऑक्टोबर रोजी सुरू होत आहे. पहिला सामना पर्थ स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात सर्वांचे लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह नवीन भारतीय एकदिवसीय कर्णधार शुबमन गिलवर असेल. भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये अखेरचा वनडे सामना खेळला होता.
भारत आणि ऑस्ट्रेलिया हेड टू हेड रेकॉर्ड
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डमध्ये कोणता संघ वरचढ ठरला आहे, जाणून घेऊया. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत १५२ सामने खेळवले गेले आहेत, ज्यात ऑस्ट्रेलियाने सर्वाधिक सामने जिंकले आहेत. ऑस्ट्रेलियाने ८४ सामने जिंकले आहेत, तर भारताने ५८ सामने आपल्या नावे केले आहेत. तर दहा सामने अनिर्णित राहिले. पण, गेल्या १० एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला सहा वेळा पराभूत केलं आहे.
भारत-ऑस्ट्रेलिया सामने भारतीय वेळेनुसार किती वाजता सुरू होणार?
मालिकेतील पहिला सामना भारतीय वेळेनुसार सकाळी ९:०० वाजता सुरू होईल, नाणेफेक अर्धा तास आधी सकाळी ८:३० वाजता होईल. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिका टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येणार आहे, तर जिओहोस्टवर सामन्यांचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येईल.
ऑस्ट्रेलियाविरूद्ध मालिकेसाठी भारताचा वनडे संघ
शुबमन गिल (कर्णधार), रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर (उप-कर्णधार), अक्षर पटेल, केएल राहुल (यष्टीरक्षक), नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा, ध्रुव जुरेल, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), यशस्वी जैस्वाल