India vs Australia: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्थान मिळविण्याच्या दृष्टीने भारतासाठी अतिशय महत्त्वाची असलेली ऑस्ट्रेलियाविरुद्धची चार सामन्यांची मालिका आज, गुरुवारपासून विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर पहिल्या कसोटीने सुरू होत आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी असणार आहे. असे असताना टीम इंडियात कोणाचे सिलेक्शन होणार यावरून प्रचंड गोंधळ दिसत आहे. अशातच तीन दिग्गज प्लेअरनी त्यांच्या त्यांच्या टीम बनवून हे कन्फ्यूजन आणखी वाढविले आहे.

उभय संघांतील या चार सामन्यांची कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूरमध्ये खेळला जाईल. पहिल्या कसोटी सामन्यात भारताच्या प्लेइंग इलेव्हनविषयी अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत. भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड चर्चा करून पहिल्या कसोटी सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हन निवडतील. कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या १७ सदस्यीय संघातील ६ खेळाडूंना बाकावर बसावे लागणार आहे.

तीन दिग्गजांनी निवडली प्लेईंग ११

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाची अंतिम अकरा कशी असेल याविषयी सर्वजण बोलत आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकांमध्ये खेळलेल्या धडाकेबाज फलंदाजांनी स्वतःचा संघ समोर ठेवला आहे. रवी शास्त्री, हरभजन सिंग आणि वसीम जाफर यांनी तर सूर्यकुमार यादवला बाहेर बसवले आहे, तसेच किती फिरकीपटू खेळवायचे यावर बरीच चर्चा होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शर्मा आणि राहुल द्रविड या खेळाडूंना बसवणार बाकावर

बीसीसीआयने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी काही दिवसांपूर्वी संघ घोषित केला. या १७ सदस्यीय संघातील ११ खेळाडूंना प्रत्यक्ष खेळण्याची संधी मिळणार असून सहा खेळाडू बाकावर बसलेले असतील. संघातून बाहेर बसणाऱ्या सहा खेळाडूंमध्ये काही मोठ्या नावांचाही समावेश आहे. शुबमन गिल, श्रेयस अय्यर, इशान किशन, अक्षर पटेल, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट यांना बाकावर बसवण्याची शक्यता आहे.