scorecardresearch

Premium

IND vs AUS 2nd ODI: हिटमॅनला मागे टाकत शुबमन गिल बनला २०२३ चा सिक्सर किंग, जाणून घ्या किती मारलेत षटकार?

IND vs AUS 2nd ODI Match Updates: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या वनडे सामन्यात शुबमन गिलने रोहित शर्माचा विक्रम मोडला. त्याचबरोबर या सामन्यात आपले अर्धशतकही पूर्ण केले.

IND vs AUS 2nd ODI Match Updates
शुबमन गिल (फोटो-बीसीसीआय ट्विटर)

Shubman Gill breaks Rohit Sharma’s sixes record in 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघांत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूर येथे खेळला जात आहे. होळकर स्टेडियमवर खेळल्या जात असलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकली. ऑस्ट्रेलियन संघाने भारतीय संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाकडून शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतक झळकावले. तसेच शुबमन गिलने रोहित शर्माचा एक विक्रम मोडला.

भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुबमन गिलने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ७४ धावांची खेळी केली होती. त्याचबरोबर दुसऱ्या वनडेतही तो या संघाविरुद्ध फॉर्ममध्ये दिसला. त्याने ३७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. तसेच त्याने रोहित शर्माचा एक मोठा विक्रम मोडला. गिलने या सामन्यात ३७ चेंडूत ३ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने ५० धावा केल्या होत्या. या षटकारांच्या जोरावर तो या वर्षी म्हणजे २०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनला आहे. त्याने याबाबतीत आपला कर्णधार रोहित शर्माला मागे टाकले.

Suryakumar Yadav has a game that creates fear among his opponents Virender Sehwag big statement
Virender Sehwag: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ‘मिस्टर ३६०’ने केलेल्या अर्धशतकावर सेहवागचे सूचक विधान; म्हणाला, “सूर्यकुमारची फलंदाजी…”
Suryakumar Yadav's luck will change in one innings Shreyas Iyer's position from World Cup playing XI in danger zone
IND vs AUS: ‘मिस्टर ३६०’ फॉर्ममध्ये परतला, एकदिवसीय क्रिकेटमध्ये सूर्यकुमारने झळकावले तिसरे अर्धशतक; श्रेयस अय्यरचे स्थान धोक्यात
IND vs AUS 1st ODI Updates
IND vs AUS 1st ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमन गिलने मोडला बाबर आझमचा विक्रम, घरच्या मैदानावर केला खास पराक्रम
Rohit Sharma Breaks Shahid Afridi's Record
IND vs SL: रोहित शर्माने मोडला शाहिद आफ्रिदीचा मोठा विक्रम, श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात केला ‘हा’ खास कारनामा

शुबमन गिलने रोहित शर्माला टाकले मागे –

कांगारू संघाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात, शुबमन गिलने ३७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. या खेळीत त्याने ३ षटकार मारले. या षटकारांच्या मदतीने तो यावर्षी भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा पहिला खेळाडू ठरला आहे. या दोन षटकारांनंतर २०२३ मध्ये गिलच्या एकूण षटकारांची संख्या ४४ झाली, तर हिटमॅन रोहित शर्माने आतापर्यंत ४३ षटकार मारले आहेत.

२०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज –

शुबमन गिल – ४५ (वृत्त लिहूपर्यंत)
रोहित शर्मा – ४३

भारताची धावसंख्या १५० धावा पार –

भारतीय संघाने एका विकेटच्या नुकसानावर २० षटकांनंतर 150 धावा केल्या आहेत. श्रेयस आणि शुबमनमध्ये शानदार शतकी भागीदारी झाली आहे. दोन्ही फलंदाज वेगाने धावा करत आहेत आणि टीम इंडिया मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. भारताकडून श्रेयय अय्यरनेही ४१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs aus 2nd odi match updates shubman gill breaks rohit sharmas sixes record in 2023 vbm

First published on: 24-09-2023 at 16:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×