IND vs AUS 3rd Test Updates: भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात तिसरा कसोटी सामना इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात भारताचा दुसरा डाव १६२ धावांवर गुंडाळला. तसेच ऑस्ट्रेलियाला ७६ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. या दरम्यानचा कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो युवा खेळाडू इशान किशनला रागात काही तरी सांगताना दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता, मात्र दुसऱ्या दिवशी टीम इंडियाने पुनरागमन करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. भारतीय संघ पहिल्या डावात अवघ्या १०९ धावांवर आटोपला होता. त्यानंतर ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवशी चार विकेट गमावत १५६ धावा केल्या होत्या. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने ऑस्ट्रेलियाला १९७ धावांवर सर्वबाद केले.

८८ धावांनी पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियाने दुसऱ्या डावात १४० धावांत सात विकेट गमावल्या होत्या आणि अक्षर पटेल चेतेश्वर पुजारासह क्रीजवर उभा होता. या दोघांच्या भागीदारीदरम्यान, कर्णधा रोहित शर्मा ड्रेसिंग रूममध्ये बसलेल्या इशान किशनशी दोन्ही फलंदाजांना संदेश पाठवताना बोलत असल्याचे कॅमेऱ्यात कैद झाला. रोहितचा आवाज ऐकू येत नव्हता. पण ज्या पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यांवर हावभाव होते, त्यावरुन तो रागात बोलत असल्याचे दिसत होते.

रोहित शर्माने पाठवला संदेश –

ही घटना ५२ व्या षटकानंतर पाहायला मिळाली. टीम इंडियाच्या ७ विकेट १४४ धावांवर पडल्या होत्या. पुजारा ५२ आणि अक्षर पटेल 3 धावा करून खेळत होते. अशा स्थितीत कर्णधार रोहित या दोन्ही फलंदाजांच्या फलंदाजीच्या दृष्टिकोनावर खूश नव्हता. त्याने हाताचा इशारा करत ईशान किशनला आपल्याकडे बोलावले. इशान त्याच्या जवळ बसल्यावर त्याने त्याला काहीतरी समजावून सांगितले आणि मग त्याला मैदानात पाठवले.

यानतर काही वेळातच इशान किशन कर्णधाराचा निरोप घेऊन मैदानावर पोहोचला. रोहितचा संदेश मिळाल्यानंतर काही वेळातच चेतेश्वर पुजाराने आक्रमक खेळायला सुरुवात केली. त्याने नॅथन लायनच्या चेंडूवर षटकार मारला. हा षटकार पाहिल्यानंतर रोहितच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत होता की त्याला हाच संदेश द्यायचा होता.

हेही वाचा – Lionel Messi: अर्जेंटिनाच्या कर्णधाराचा मोठा निर्णय; फिफा विश्वचषक विजेत्या संघासाठी खरेदी केले तब्बल ‘इतके’ सोन्याचे आयफोन

ऑस्ट्रेलियाला ७६ धावांचे लक्ष्य –

यानंतर टीम इंडियाचा दुसरा डाव अवघ्या १६३ धावांवर आटोपला. मोहम्मद सिराज शेवटची विकेटच्या रुपाने म्हणून बाद झाला. त्याने ७ चेंडू खेळले आणि त्याला एकही धाव करता आली नाही. ऑस्ट्रेलियन गोलंदाज नॅथन लायनने शानदार गोलंदाजी करताना ८ बळी घेतले. ऑस्ट्रेलियाला ७६ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलिया या लक्ष्याचा पाठलाग करेल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs aus 3rd test rohit sharma angry on akshar patel and cheteshwar pujaras defensive play video viral vbm
First published on: 02-03-2023 at 18:04 IST