भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा आणि अंतिम कसोटी सामना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. सामना पाहण्यासाठी आणि भारत-ऑस्ट्रेलिया मैत्रीचा ७५ वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी सामन्यापूर्वी रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज या समारंभात पोहोचले. दोन्ही देशांच्या पंतप्रधानांच्या या भेटीमुळे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. सुमारे तीन हजार पोलिस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले होते. सामन्यापूर्वीच्या सरावासाठी संघांना स्टेडियममध्ये प्रवेश दिला गेला नाही आणि त्यांना नेटमध्ये बाहेर सराव करावा लागला.

राजकारणी लोकांच्या कार्यक्रमानिमित्ताने खेळाडूंना बाहेर सराव करावा लागला यामुळे दोन्ही संघांच्या टीम मॅनेजमेंटने नाराजी व्यक्त केली आहे. नाणेफेकीच्या काही मिनिटे आधी खेळाडूंना अखेर सरावासाठी स्टेडियममध्ये प्रवेश करण्याची संधी मिळाली. सुरक्षेच्या कारणास्तव दोन्ही पंतप्रधानांच्या भोवती बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अहमदाबाद कसोटीपूर्वी सरावासाठी भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंना मैदानात प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले. यामागील कारण जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल. वास्तविक, सरावाच्या वेळी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलिया अँथनी अल्बानीज रथातून संपूर्ण स्टेडियमला ​​प्रदक्षिणा घालत होते.

रोहित शर्मा आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या नेतृत्वाखालील संघांना चौथ्या कसोटीपूर्वी नेटमध्ये सराव करण्यासाठी स्टेडियमबाहेर जावे लागले. या संपूर्ण सोहळ्यामुळे नाणेफेकीलाही उशीर झाला. बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही चाहत्यांनी राजकारणापेक्षा क्रिकेटवर वर्चस्व गाजवल्याबद्दल नेत्यांवर टीका केली. मात्र, एवढ्या कडेकोट बंदोबस्तात काही काळ खेळाडूंना स्टेडियममध्ये प्रवेश बंदी असताना एक कुत्रा मैदानात घुसला.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ९ मार्चपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यासाठी मोटेरा येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुमारे ३,००० पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सेक्टर-१ जेसीपी आणि डीआयजी नीरज बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली ११ एसपी दर्जाचे अधिकारी आणि पोलिस निरीक्षकांसह २०० पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने स्टेडियम आणि बाहेरील सुरक्षा व्यवस्था सांभाळली. याशिवाय १५०० वाहतूक पोलीस कोठेही जाम होऊ नये यासाठी ड्युटीवर होते.

हेही वाचा: IND vs AUS 4th Test:  चौथ्या कसोटी सामन्याआधी पंतप्रधान मोदी-अल्बानीज यांनी दिले रोहित-स्मिथला खास गिफ्ट, काय आहे ते जाणून घ्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामन्यातील सध्यस्थिती

उस्मान ख्वाजाने १४६ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने आतापर्यंतच्या खेळीत नऊ चौकार मारले आहेत. त्याने स्टीव्ह स्मिथसोबत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. याआधी त्याने ट्रॅव्हिस हेडसोबतही अर्धशतकी भागीदारी केली होती. ख्वाजाचे हे कसोटी क्रिकेटमधील २२वे अर्धशतक आहे. त्याच्या या शानदार खेळीमुळे ऑस्ट्रेलियाची धावसंख्या दोन गडी गमावून १३० धावांच्या पुढे गेली आहे.