IND vs AUS Test Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात फेब्रुवारी-मार्चमध्ये चार सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ तब्बल सहा वर्षांनंतर भारतीय भूमीवर कसोटी मालिका खेळणार आहे. यापूर्वी, २०१७ मध्ये त्याने शेवटच्या वेळी कसोटी मालिकेत भाग घेतला होता, जिथे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने २-१ ने मालिका जिंकली होती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलमध्ये पोहोचण्याच्या आणि कसोटी क्रमवारीत नंबर-१ येण्याच्या दृष्टीने ही मालिका खूप महत्त्वाची आहे. या मालिकेकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी जल्लोषही सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू इयान हीलीने बीसीसीआयवर महत्त्वपूर्ण टिप्पणी केली आहे.

वास्तविक, भारताविरुद्धची मालिका सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघ एकही सराव सामना खेळत नाहीये. याचे कारण असे सांगितले जात आहे की, बीसीसीआय सराव सामन्यासाठी वेगळ्या प्रकारची खेळपट्टी पुरवते, तर प्रत्यक्ष कसोटी सामन्यातील खेळपट्टीचे वर्तन पूर्णपणे वेगळे असते. अशा परिस्थितीत भारत दौऱ्याच्या तयारीसाठी उत्तर सिडनीमध्येच भारतीय खेळपट्ट्यांसारखी विकेट तयार करण्यात आली आणि संपूर्ण ऑस्ट्रेलियन संघाने त्यावर सराव केला.

Rohit first Indian to hit 500 sixes
MI vs CSK : रोहित शर्माने रचला इतिहास! टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत कोणत्याच भारतीय खेळाडूला जमलं नाही ते करून दाखवलं
Glenn Maxwell makes bizarre comment on Virat Kohli
T20 World Cup : ‘मला आशा आहे की विराट कोहलीची निवड होणार नाही’, आरसीबीच्या ‘या’ खेळाडूचे चकित करणारे वक्तव्य
Manoj Tiwary criticizes Glenn Maxwell
IPL 2024 : मॅक्सवेलच्या फ्लॉप शोवर माजी भारतीय खेळाडूची सडकून टीका; म्हणाला, ‘तो वेळोवेळी फक्त पगार घेतोय पण…’
India Vs Pakistan bilateral series
IND vs PAK : भारत आणि पाकिस्तान यांच्यात मालिका होणार? क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आयोजनासाठी व्यक्त केली इच्छा

हेही वाचा: Shoaib Malik: ‘अभी तो मे जवान हू!’ शोएब मलिकने पुनरागमनाबद्दल केले मोठे विधान म्हणाला, “२५ वर्षीय खेळाडूशी …”

इयान हिलीला खेळपट्टीची चिंता सतावत आहे

ऑस्ट्रेलियाच्या या तयारीवर इयान हिली म्हणाला, “आम्ही आमच्या फिरकीपटूंना सिडनीमध्ये भारताविरुद्ध धोरणात्मक प्लान चर्चेसाठी एकत्र केले, कारण आम्हाला सरावासाठी ज्या सुविधा (पिच) आवश्यक आहेत,  त्या आम्हाला भारतात मिळतीलच याबाबत आम्हाला अजिबात खात्री नाही. मागच्या अनेक दौऱ्यातून आम्ही धडा घेतला असून खूप काही नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या. जेव्हा मी ऐकले की आम्ही भारत दौऱ्यावर एकही सराव सामना खेळणार नाही, तेव्हा मी ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांच्याकडे गेलो आणि म्हणालो की, इथेच आपण व्यवस्थित व्यूहरचना तयार करून ही योग्य कल्पना आहे.”

ही मालिका सुरू होण्यास अजून काही दिवस बाकी आहेत, पण निवेदनांचा टप्पा आताच सुरू झाला आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक इयान हिलीने भारतीय खेळपट्ट्यांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. नागपूर, दिल्ली, धर्मशाला आणि अहमदाबाद येथील खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल बनवल्या जाण्याची भीती हीलीला आहे. हिलीने सेन रेडिओला सांगितले की, “त्यांच्याकडे (भारताचा) संघ चांगला आहे, पण मी त्यांच्या फिरकीपटूंना घाबरत नाही जोपर्यंत ते मालिकेच्या शेवटच्या कसोटीपर्यंत विचित्र खेळपट्ट्या तयार करत नाहीत. दोन खेळपट्ट्या इतक्या भयानक, अन्यायकारक होत्या ज्यावर पहिल्या दिवसापासून फिरकीपटूंचे वर्चस्व होते. ”इयान हिली पुढे म्हणाला, “अशा प्रकारच्या खेळपट्ट्यांवर ते आमच्यापेक्षा चांगले खेळतील, पण जर आम्हाला सपाट भारतीय खेळपट्ट्या मिळाल्या तर गोलंदाजांना खूप मेहनत करावी लागली पण आम्ही विजयी होऊ. नाहीतर भारत २-१ ने जिंकेल असा माझा अंदाज आहे.”

हेही वाचा: IND vs NZ: पिच क्युरेटर बनला हार्दिकच्या रागाचा शिकार, न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यानंतर झाला गोंधळ, नोकरी गेली, करिअर संपले!

उस्मान ख्वाजा याने देखील खेळपट्टीवर केले मोठे विधान

या महिन्याच्या सुरुवातीला उस्मान ख्वाजाने भारतामध्ये एकही सराव सामना न खेळण्यासंबंधीच्या प्रश्नावर पत्रकार परिषदेत मोठे विधान केले होते. त्याने उत्तर दिले, “तुम्ही आमच्यासोबत (ऑस्ट्रेलिया) प्री-टूरला गेला आहात का? भारतात फिरकीचे ट्रॅक आहेत पण जेव्हा आम्ही सराव सामने खेळायला जातो तेव्हा आम्हाला गाभा सारखी हिरवी खेळपट्टी दिली जाते. त्यामुळे तिथे सराव सामने खेळण्यात काही अर्थ नाही.”