सध्या भारत आणि बांगलादेश या संघामध्ये एकदिवसाय सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना रविवारी (दि. ४ डिसेंबर) ढाका येथे खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत केवळ १८६ धावा केल्या होत्या. मात्र, भारताच्या युवा गोलंदाजांनी बांगलादेशचे नऊ बळी मिळेपर्यंत दमदार गोलंदाजी केली होती. मात्र, भारतीय गोलंदाजांना शेवटचा बळी न मिळाल्याने बांगलादेशने एक गडी राखून विजय मिळवला. मेहदी हसन मिराज हा बांगलादेशच्या विजयाचा नायक ठरला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोलायमान होत असलेल्या या सामन्यात भारताचे ढिसाळ क्षेत्ररक्षण कारणीभूत ठरले. आजच्या सामन्यात गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत सामन्यात टीम इंडियाला परत आणले होते. मात्र भारतीय खेळाडू मिळालेल्या संधीचे सोने करण्यात अपयशी ठरले. तब्बल ४७ धावा या अधिक देत क्षेत्ररक्षकांनी बांगलादेशला विजय मिळवून देण्यात मोठा हातभार लावला. जिथे एक धाव तिथे दोन तर कधी दोन तर कधी तीन असे करत भारताने धावा सढळ हाताने गिफ्ट केल्या. तसेच ४ चोकर जे वाचवण्यासारखे होते तिथे देखील टीम इंडियाच्या खेळाडूंनी खराब क्षेत्ररक्षण करत एकप्रकारे बांगलादेशला मदतच केली.

भारताच्या या पराभवात सर्वांच्या टीकेचा धनी बनला तो म्हणजे भारताला एकमेव चांगली धावसंख्या उभारणारा केएल राहूल आहे. विजयासाठी ३२ धावांची आवश्यकता असताना मेहदी हसन मिराजचा झेल त्याने दीप मिडविकेटला झेल सोडला. लॉंगऑनला असलेला रजत पाटीदार झेल पकडायला आला होता मात्र राहुलने इशारा केला की मी हा झेल पकडतो मात्र त्याच्याकडून तो सुटला आणि तिथेच खरा सामना फिरला. लागोपाठ शार्दूल ठाकूरच्या त्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर त्यानेच फटका मारला आणि थर्ड मॅनला असलेला वॉशिंग्टन सुंदरने झेल घेण्यासाठी प्रयत्न केलाच नाही. कारण काय तर त्याला चेंडू लाईट्समुळे दिसला नाही. हे ४२वे षटक बांगलादेशच्या डावाचे भारताला खूप महागात पडले.

हेही वाचा :   IND vs BAN 1st ODI: शाकीब अल हसनचा झेल घेत विराट कोहलीने केली सव्याज परतफेड

बांगलादेशच्या विजयात सर्वात महत्त्वाचा वाटा मेहदी हसन मिराजने केलेल्या शानदार खेळीचा आहे. त्याने मुस्तफिजूर रेहमानला हाताशी धरत ५० धावांची भागीदारी केली. त्या भागीदारीमुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला. तत्पूर्वी,  या धावांचा पाठलाग करताना बांगलादेशला पहिल्याच चेंडूवर शंतो याच्या रूपाने झटका बसला. कर्णधार लिटन दासने ४१ धावांची दमदार खेळी केली. त्यानंतर शाकिब (२९) व रहीम (१८) यांना सुरुवात मिळाली मात्र ते याचे रूपांतर मोठ्या खेळीत करू शकले नाहीत. त्यानंतरचे फलंदाज हे उपयुक्त योगदान देऊ शकले नाही. त्यामुळे बांगलादेशचा डाव ९ बाद १३६ असा संकटात सापडला होता.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs ban 1st odi mehdi hasans dropped catch was the turning point in the match kl rahul trolled on social media avw
First published on: 04-12-2022 at 20:12 IST