भारत आणि बांगलादेश यांच्यातील वनडे मालिकेतील पहिला सामना मीरपूर येथे खेळवला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघाने ४१.२ षटकांत सर्वबाद १८६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर बांगलादेशला १८७ धावांचे लक्ष्य दिले आहे. दरम्यान या सामन्यात शाकिब अल हसने रोहित आणि विराटला बाद करत एक मोठा पराक्रम केला आहे.

भारतीय संघाने नाणेफेक गमावून फलंदाजी करताना शिखर धवनच्या (७) रूपाने संघाला पहिला धक्का बसला. तो डावाच्या सहाव्या षटकात बाद झाला. तेव्हा धावफलकावर केवळ 23 धावा झाल्या होत्या. विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. बांगलादेशचा फिरकी गोलंदाज शकिब अल हसनने पहिल्यांदा रोहितला बाद केले. त्यानंतर लगेच त्याच षटकात विराटला बाद केले. त्यामुळे भारतीय संघाला एकाच षटकात दुहेरी झटका बसला.

IPL 2024 Mumbai Indians vs Chennai Super Kings Match Updates in Marathi
MI vs CSK: आयपीएल २०२४ मध्ये ऋतु’राज’, मुंबईविरूद्ध विस्फोटक फलंदाजीसह ‘हा’ विक्रम करणारा पहिला भारतीय खेळाडू
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
Virat Kohli breaks Gayle's record
KKR vs RCB : किंग कोहलीने मोडला धोनी आणि गिलचा ‘विराट’ विक्रम! आयपीएलमध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला चौथा फलंदाज
Sunil Narine's 500th T20 Match
RCB vs KKR : सुनील नरेनने आरसीबीविरुद्ध रचला इतिहास, टी-२०मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला जगातील चौथा खेळाडू

बांगलादेशच्या डावातील ११वे षटक टाकण्यासाठी आलेल्या शाकीबने भारताचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीला ३ चेंडूतच तंबूत पाठवले. षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर शाकिबने रोहितला त्रिफळाचित केले. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर त्याने विराटला एक्स्ट्रा कव्हरवर लिटन दासकडे झेलबाद केले. रोहितला २७ तर विराटला फक्त ९ धावा करता आल्या. शाकीबच्या उत्कृष्ट गोलंदाजीमुळे भारताने ४९ धावांत ३ विकेट गमावल्या.

शाकीबने दुसऱ्यांदा केला हा पराक्रम –

हेही वाचा – T10 League 2022: आंद्रे रसेलने केला कहर; केवळ ११ चेंडूत कुटल्या ५२ धावा, पाहा व्हिडिओ

शाकिब अल हसनने विराट कोहली आणि रोहित शर्माला एकाच षटकात बाद करत वनडेत दुसऱ्यांदा ही कामगिरी केली. यापूर्वी २०१० मध्ये आशिया चषकाच्या एका सामन्यात त्याने १५ व्या षटकात ही कामगिरी केली होती. वनडे फॉरमॅटमध्ये रोहित आणि कोहलीला एकाच षटकात दोनदा बाद करणारा शाकिब हा पहिला बांगलादेशी खेळाडू ठरला आहे. या सामन्यात डावखुरा फिरकी गोलंदाज शाकिबने ३६ धावांत ५ बळी घेतले. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक ७३ धावा केल्या. तसेच ७ फलंदाज दुहेरी आकडा देखीव गाठू शकले नाहीत.