Asia Cup 2025 India Playing 11 vs Bangladesh: आशिया चषक २०२५ सुपर फोर सामन्यात भारताचा सामना आज बांगलादेशशी होत आहे. या सामन्यात जिंकणारा संघ आशिया चषक अंतिम सामन्यात आपले स्थान पक्क करण्याच्या एक पाऊल जवळ जाणार आहे. त्यानुसार सुपर फोरमधील समीकरणं बदलणार आहेत. पण या मोठ्या सामन्यापूर्वी बांगलादेश संघाला मोठा धक्का बसला आहे.
भारत आणि बांगलादेश सामन्याची नाणेफेक बांगलादेशने जिंकली असून संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडिया प्रथम फलंदाजीसाठी उतरणार आहे. पण बांगलादेश संघासाठी इथेच मोठा बदल आहे. कारण संघाचा कर्णधार लिटन दास याला सराव सत्रात दुखापत झाल्याने तो भारताविरूद्ध सामन्यात खेळणार नाहीये, त्याच्या जाकेर अली संघाचा कर्णधार असेल.
भारताविरूद्ध महत्त्वाच्या सामन्यात का खेळत नाहीये बांगलादेशचा कर्णधार लिटन दास?
लिटन दासला सराव सत्रादरम्यान दुखापत झाली आणि दुर्दैवाने तो महत्त्वाचा सामना खेळू शकणार नाहीये.” अशी माहिती संघाचा कर्णधार जाकेर अली याने दिली. यासह बांगलादेशने भारताविरूद्ध सामन्यासाठी प्लेईंग इलेव्हनमध्ये ४ बदल केले आहेत. जाकेर अली याने आजपर्यंत कोणत्याच टी-२० सामन्यात संघाचं नेतृत्त्व केलेलं नाही. त्यामुळे कर्णधार म्हणून हा त्याचा पहिलाच सामना असणार आहे.
भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवनेही या सामन्यात संघ प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेणार होता. त्यामुळे प्रथम फलंदाजी मिळणं संघासाठी चांगली संधी आहे. तर भारताच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये एकही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे जसप्रीत बुमराह या सामन्यातदेखील खेळताना दिसणार आहे.
बांगलादेशविरूद्ध सामन्यासाठी भारताची प्लेईंग इलेव्हन
शुबमन गिल, अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.
बांगलादेशच प्लेईंग इलेव्हन
सैफ हसन, तांझिड हसन, परवेझ होसेन इमॉन, तौहिद हृदोय, जेकर अली (कर्णधार आणि यष्टीरक्षक), शामिम होसेन, रिशाद होसेन, नसुम अहमद, तांझिम हसन साकीब, मोहम्मद सैफूद्दीन, मुस्ताफिझूर रहमान.