India vs Bangladesh, World Cup 2023: आज एकदिवसीय विश्वचषक २०२३चा १७वा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये असून आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. तर बांगलादेश संघाने तीनपैकी एक जिंकला आहे आणि दोन गमावले आहेत. भारत आणि बांगलादेश यांच्यातील हा सामना पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यादरम्यान रवींद्र जडेजाने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर हवेत सूर मारत जबरदस्त झेल घेतला त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

भारत आणि बांगलादेश सामन्यादरम्यान जडेजाने असा झेल घेतला की काही क्षणांसाठी मुशफिकुर रहीम देखील स्तब्ध झाला. सध्या संपूर्ण सोशल मीडियामध्ये त्याच्या झेलची चर्चा सुरु आहे. वास्तविक, जडेजा हा भारताचा सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक मानला जातो, याचा पुरावा जडेजाने बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पुन्हा एकदा दिला, जेव्हा त्याने जसप्रीत बुमराहच्या चेंडूवर पॉईंटला क्षेत्ररक्षण करत असताना हवेत सूर मारत मुशफिकुर रहीमचा झेल घेतला. हा असा झेल होता की फक्त गोलंदाजच नाही तर फलंदाजही अवाक् झाला.

Gautam Gambhir Argument With Umpire
KKR vs PBKS : पंजाबविरुद्धच्या सामन्यात गौतम गंभीर संतापला, लाइव्ह मॅचदरम्यान अंपायरशी भिडला, VIDEO व्हायरल
Tilak Second player to hit 50 sixes in IPL at 21
PBKS vs MI : तिलक वर्माचा IPL मध्ये मोठा पराक्रम, ऋषभ पंतनंतर ‘ही’ कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू
IPL 2024 Mumbai Indians vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024: बुमराह वि कोहलीमध्ये जसप्रीतने मारली बाजी, आयपीएलमध्ये पाचव्यांदा केलं विराटला आऊट, पाहा VIDEO
Abhishek Sharma Breaks Chris Gayle and Sunil Narine's Record in SRH vs CSK Match
SRH vs CSK : अभिषेकने वादळी खेळीच्या जोरावर मोडला गेल-नरेनचा विक्रम, IPL मध्ये ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज

शानदार झेल घेतल्यानंतर जडेजाने भारतीय डग आउटकडे पाहिले आणि पदकासाठी आवाहन केले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरे तर सामन्यानंतर भारतीय व्यवस्थापन खेळाडूंना सर्वोत्तम क्षेत्ररक्षक म्हणून पदकेही देत ​​आहे. अशा स्थितीत जडेजाने अफलातून झेल घेतल्यानंतर जडेजाने ज्या प्रकारे सेलिब्रेशन केले ते त्याच गोष्टीचे संकेत देत होते. जडेजाने या सामन्यात अप्रतिम झेल घेतला, तर गोलंदाजीने आश्चर्यकारक कामगिरी करण्यातही तो यशस्वी ठरला. रवींद्र जडेजा १० षटकात ३८ धावा देऊन २ विकेट्स घेण्यात यशस्वी ठरला होता. नझमुल हुसेन शांतो आणि लिटन दास यांना बाद करण्यात जडेजाला यश आले आहे.

बांगलादेशने २५६ धावा केल्या

प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने आठ गडी गमावून २५६ धावा केल्या. वन डे वर्ल्ड कप २०२३ मध्ये सलग चौथा विजय मिळवण्यासाठी टीम इंडियासमोर २५७ धावांचे लक्ष्य आहे. बांगलादेशकडून लिटन दासने सर्वाधिक ६६ धावा केल्या. तर तनजीद हसनने ५१ धावांची खेळी केली. अखेरीस महमुदुल्लाहने ४६ धावांची खेळी करत संघाची धावसंख्या २५० धावांच्या जवळ नेली. मुशफिकुर रहीमने ३८ धावांचे योगदान दिले. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि रवींद्र जडेजाने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादव यांना प्रत्येकी गडी बाद करण्यात यश मिळाले.

हेही वाचा: IND vs BAN: विराट कोहलीने सहा वर्षांनंतर केली गोलंदाजी, स्टेडियममध्ये झाला एकच जल्लोष? पाहा Video

हार्दिक पांड्या जखमी

दुसरीकडे, हार्दिक पांड्याला सामन्यादरम्यान दुखापत झाली. त्यामुळे त्याला मैदान सोडावे लागले. बीसीसीआयने त्याच्याबद्दल अपडेट दिले आहे की त्याचे स्कॅनिंग केले जात आहे, अद्याप कोणतेही मोठे अपडेट आलेले नाही.