IND vs NZ 3rd ODI Rishabh Pant: भारत विरुद्ध न्यूझीलंड तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात पुन्हा एकदा संजू सॅमसनला डावलून त्याच्या ऐवजी ऋषभ पंतला स्थान देण्यात आले होते, मात्र आजही टीम इंडियाचा विश्वास पंतला खरा करून दाखवता आला नाही. न्यूझीलंड विरुद्ध अवघ्या १० धावा करून पंत थेट पॅव्हेलियनमध्ये परतला. यावरूनच आता ट्विटरवर नेटकऱ्यांनी पंतला धारेवर धरण्यास सुरुवात केली आहे. अशातच भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्याच्या अगोदरचा पंतचा एक इंटरव्ह्यू सुद्धा तुफान व्हायरल होत आहे. पंतला क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांनी सेहवागचे उदाहरण देत एक प्रश्न केला होता. ज्यावर पंतने काहीश्या उद्धट अंदाजात उत्तर दिले हे पाहcता नेटकरीही भडकले आहेत. ट्विटरवर अनेकांनी पंतची शाळा घेत त्यालाच खडेबोल सुनावले आहेत.

हर्षा भोगले यांनी पंतला प्रश्न करताना टी २० क्रिकेट व कसोटी क्रिकेट यांमधील खेळाच्या रेकॉर्डवरून एक प्रश्न केला होता. हर्षा भोगले म्हणाले की, मी सेहवागला याआधी प्रश्न केला होता, तुला बघूनही असं वाटतं की तू टी २० मध्ये उत्तम खेळशील पण तुझा टेस्ट रेकॉर्ड त्याहून चांगला आहे, यावर पंतने “सर एक तर रेकॉर्ड फक्त नंबर आहे आणि दुसरं म्हणजे माझा टी २० रेकॉर्ड सुद्धा उत्तमच आहे” असा पलटवार केला होता.

Deepika Kumari in the semi finals of the Archery World Cup sport
दीपिका कुमारी उपांत्य फेरीत; विश्वचषक तिरंदाजीत भारताची चार पदके निश्चित
hardik pandya
कामगिरी उंचावण्याचे ध्येय! मुंबई इंडियन्सचा आज दिल्ली कॅपिटल्सशी सामना
shashank singh
PBKS VS KKR: पंजाबने ‘करुन दाखवला’ विक्रमी पाठलाग; केकेआरविरुद्ध २६२चं लक्ष्य केलं पार
indians captain hardik pandya video with his son agastya during ipl ad shoot
हार्दिक पंड्याने लेकाला दिले अभिनयाचे धडे; शुटिंगमधील धमाल VIDEO शेअर करताच चाहते म्हणतात, “वॉव…”

परिस्थिती शांतपणे हाताळून भोगले यांनी पुन्हा पंतला “मी खराब नाही म्हणणार फक्त टेस्ट रेकॉर्डशी तुलना करत आहे” असे म्हंटले तर यावर पुन्हा पंत वैतागला व “तुलना करणे हा तसाही माझ्या आयुष्याचा भाग नाही, मी आता २४- २५ वर्षाचा आहे, जेव्हा ३०-३२ वर्षाचा होईन तेव्हा तुलना करा आता तर या तुलनेला काही लॉजिकच नाही” असे उत्तर त्याने दिले.

नेटकऱ्यांना ऋषभ पंतचे हे उत्तर काहीसे उद्धट वाटत आहे त्यावरूनच अनेकांनी २५ वर्षीय पंतची शाळा घ्यायला सुरुवात केली आहे. गल्ली क्रिकेटमध्ये एक नियम असतो की ज्याची बॅट त्याला बॅटिंग मिळणारच, मग चांगले फलंदाज मागे राहिले तरी हरकत नाही असंच काहीसं पंतच्या बाबत होत आहे असे एका युजरने पोस्ट केले आहे. तर काहींनी ऋषभच्या उत्तरावरून हिंमत तर बघा अशाही प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी ऋषभ पंतचे मजेशीर मिम्स सुद्धा बनवायला सुरुवात केली आहे.

ऋषभ पंत वर नेटकरी भडकले…

हे ही वाचा<< IND vs NZ 3rd ODI: संजू सॅमसन खेळत नाही कारण BCCI त्याच्यावर.. पाकिस्तानी क्रिकेटपटूचा थेट हल्लाबोल

दरम्यान, टी २० विश्वचषकाच्या वेळी अनेकदा जेव्हा ऋषभ पंतला संघात खेळण्याची संधी मिळत नव्हती तेव्हा याच नेटकऱ्यांनी पंतची पाठराखण करून त्याचे कौतुक केले होते पण आता न्यूझीलंड दौऱ्यात मात्र अगदी उलट चित्र दिसून येत आहे.