वेलिंग्टनमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या टी२० मालिकेतील पहिल्या सामन्याच्या पूर्वसंध्येला, युवा भारतीय फलंदाजी युनिटने रोहित शर्मा, केएल राहुल आणि विराट कोहलीशिवाय आपली तयारी मजबूत केली. या मालिकेसाठी संघाचा कर्णधार हार्दिक पांड्या, यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत, इशान किशन, संजू सॅमसन, फलंदाज श्रेयस अय्यर, शुभमन गिल, अष्टपैलू दीपक हुडा हे सर्वजण हवाई सराव म्हणजेच षटकारांची तयारी करताना दिसले. बीसीसीआयने भारताच्या सराव सत्राचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये जवळपास सर्वच फलंदाजांनी मोठे फटक्यांची आतिषबाजी केली. जे न्यूझीलंडविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या टी२० आंतरराष्ट्रीय मालिकेत भारताच्या फलंदाजी ताफ्यात महत्वाचा बदल दर्शवते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजू सॅमसन आणि श्रेयस अय्यरने अनेक शॉट्समध्ये बिग नो-लूक (न बघता) मारले, जे सर्वात आकर्षक होते. अय्यर आणि सॅमसनला २०२२ च्या टी२० विश्वचषकासाठी संघात स्थान देण्यात आले नव्हते. बेसिन रिझर्व्हमध्ये सराव करताना खेळपट्टीवर फलंदाजी करताना तो लांब चेंडूंचा सामना करताना दिसला. व्हिडिओमध्ये, अय्यर नो-लूक षटकार मारताना दिसत आहे, तर सॅमसनही दोनदा शॉट मारतो. भारतीय क्रिकेटपटू आणि सपोर्ट स्टाफनेही या शॉट्सचे कौतुक केले. नो-लुक म्हणजे स्वतः मारलेला फटका न बघता तो योग्यच होता याची खात्री असणे आणि स्टाईलमध्ये पोज देणे होय.

कार्यवाहक मुख्य प्रशिक्षक व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी गुरुवारी सांगितले की, “विश्वचषकातील आणखी एका अपयशानंतर भारत फक्त टी२० खेळणारे विशेष खेळाडूंचा शोध घेणार असून त्यासाठी ही मालिका अत्यंत महत्वाची आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (एनसीए) चे प्रमुख शुक्रवारी पहिल्या टी२० च्या आधी म्हणाले, “पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला त्याच प्रकारच्या खेळाडूंची गरज असते आणि भविष्यातील टी२० क्रिकेटमध्ये तुम्हाला आणखी बरेच टी२० खेळणारे खेळाडू पाहायला मिळतील. टी२० क्रिकेटने गेल्या काही वर्षांत आम्हाला दाखवून दिले आहे की तुम्हाला बहुआयामी क्रिकेटपटूंची गरज आहे.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs nz sanju samsons no look 6 shot puts new zealand to sleep hints at pre match form avw
First published on: 17-11-2022 at 18:18 IST