भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना खेळला जात आहे. इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात भारताने एकही विकेट न गमावता २०० धावांचा आकडा पार केला होता. या धावांमध्ये भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने शतकी खेळी करत सिंहाचा वाटा उचलला. यासह रोहित शर्माच्या नावावर अनेक विक्रम नोंदवले गेले. शुबमन गिल आणि रोहित शर्मा यांच्यात तब्बल २१२ धावांची भागीदारी झाली त्याच्याच जोरावर टीम इंडियाने न्यूझीलंडसमोर ३८६ धावांचे डोंगराएवढे आव्हान ठेवले.

भारताने ठेवलेल्या ३८६ धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडची सुरुवात फारशी काही चांगली झाली नाही. शून्य धावांवर असताना फिन अॅलन बाद झाला मात्र त्याचा साथीदार डेव्हॉन कॉनवेने अजूनही खेळपट्टीवर टिकून आहे. भारतीय गोलंदाजांना चौकार-षटकार मारत त्याने अक्षरशः चोपून काढले. त्याचे एवढे धाडस झाले कारण टीम इंडियाचा यष्टीरक्षक इशान किशनने त्याच्या स्टंपिंगची चालून आलेली संधी गमावली. त्यावेळी तो ४७ चेंडूत ५७ धावांवर खेळत होता. किशनच्या एका चुकीमुळे टीम इंडिया इंदोरच्या सामन्यात संकटात सापडली होती.

Hyderabad beat Punjab by 2 runs
SRH vs PBKS : हैदराबादविरुद्धच्या पराभवासाठी शिखर धवनने कोणाला जबाबदार धरले? ‘या’ दोन खेळाडूंची वारंवार घेतली नावे
Ravindra Jadeja Earned Cricket Thalapathy Title From Chennai Super Kings
IPL 2024: रवींद्र जडेजाला CSKने दिलं स्पेशल नाव; थाला, चिन्ना थालासोबत आता चेन्नईच्या ताफ्यात ‘क्रिकेट थालापती’
Rishabh becomes first player to play 100th match for Delhi
IPL 2024 : ऋषभ पंतने झळकावले अनोखे ‘शतक’, दिल्ली कॅपिटल्ससाठी ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिला खेळाडू
IPL 2024 Chennai Super Kings vs Royal Challengers Bangalore Match Updates in Marathi
IPL 2024 CSK vs RCB: ऋतुराज गायकवाडने सांगितला सामन्याचा टर्निंग पॉईंट, कॅप्टन्सीबद्दल बोलताना म्हणाला “अर्थातच माही भाई…”

युजवेंद्र चहलच्या षटकात त्याच्या शानदार लेगस्पिनवर तो मोठा फटका मारण्याच्या नादात पुढे आला आणि हुकला. त्याचबरोबर इशान किशन देखील चेंडू पकडण्यात अयशस्वी झाला. अखेर तो १३८ धावा करून  तो बाद झाला, अन्यथा भारताला सामना जिंकणे अवघड होते तरीदेखील तब्बल ८१ धावांचा फटका भारताला बसला.  

विराट कोहली आणि रोहित शर्मा संतापले

इशान किशनच्या स्टंपिंगनंतर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीसह युझवेंद्र चहल निराश आणि संतप्त दिसत होते. कारण डेव्हॉन कॉनवेची विकेट संघासाठी किती महत्त्वाची आहे हे त्याला माहीत होते आणि ते घडले. कारण या जीवनदानानंतर कॉनवेने आपला गियर बदलला आणि अवघ्या ७१ चेंडूत शतक झळकावले. कॉनवे इथेच थांबला नाही आणि शतक झळकावल्यानंतरही त्याने फलंदाजांची चौकशी सुरूच ठेवली.

तत्पूर्वी, न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी टीम इंडियासाठी चमकदार कामगिरी केली आणि पहिल्या विकेटसाठी २१२ धावांची भागीदारी केली. यादरम्यान रोहित शर्माने वनडे क्रिकेटमधील ३०वे शतक झळकावले. यासोबतच त्याने ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगच्या वन डेतील ३० शतकांची बरोबरी केली.

हेही वाचा: Australian Open 2023: “इतरांना होते ती दुखापत अन् मला होते तेव्हा ते नाटक…”, क्वार्टर फायनलपूर्वी नोव्हाक जोकोविचचे टीकास्त्र

रोहितनंतर शुभमननेही शतक झळकावले. शुबमन गिल ११२ धावा करून बाद झाला. त्याच्या द्विशतकानंतर या मालिकेतील त्याची ही दुसरी सर्वात मोठी खेळी ठरली. त्याचवेळी अष्टपैलू हार्दिक पंड्यानेही अप्रतिम खेळ दाखवत ३८ चेंडूत ५४ धावांची खेळी करत भारताची धावसंख्या ५० षटकांत ३८५ धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.