India vs South Africa 2nd T20, 12 December 2023: पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात नशिबाने दक्षिण आफ्रिकेची साथ दिली आणि टीम इंडियाचा पाच गडी राखून पराभव झाला. या सामन्यात टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करताना १९.३ षटकात १८० धावा केल्या होत्या. मात्र, त्यानंतर पावसाला सुरुवात झाली आणि डकवर्थ लुईसच्या नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला १५ षटकात १५२ धावांचे लक्ष्य मिळाले. पाऊस पडल्याने मैदान आधीच ओलसर झाले होते. त्यामुळे गोलंदाजांना कुठलीही मदत मिळाली नाही. चेंडू सतत ओला होत होता. ना स्विंग ना स्पिन होता तरीही, टीम इंडियाने चांगली लढत दिली. भारताची ही झुंज अखेर अपयशी ठरली आणि पावसाने टीम इंडियाचा पराभव केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (१२ डिसेंबर) खेळला गेला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करामने गबेरहा येथील सेंट जॉर्ज पार्कवर नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे खेळ थांबवण्यात आला तेव्हा भारताने १९.३ षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या होत्या. त्यानंतर टीम इंडिया पुढे खेळू शकली नाही. डकवर्थ लुईस नियमानुसार दक्षिण आफ्रिकेला १५ षटकांत १५२ धावांचे लक्ष्य मिळाले. त्यांनी १३.५ षटकात १५४ धावा करत सामना जिंकला. यासह त्याने मालिकेत १-० अशी अभेद्य आघाडी घेतली. तिसरा आणि अंतिम सामना १४ डिसेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे खेळवला जाईल.

फेहलुकवायोने षटकार मारून सामना संपवला

१४व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अँडिले फेहलुकवायोने रवींद्र जडेजाला षटकार ठोकला आणि सामना संपवला. आफ्रिकन संघाने मालिकेत १-० अशी अभेद्य आघाडी घेतली. तिसरा आणि अंतिम सामना जोहान्सबर्ग येथे गुरुवारी होणार आहे. टीम इंडियाने तो सामना जिंकला तर मालिका बरोबरीत येईल. याबरोबरच दक्षिण आफ्रिकेची नजर मालिका २-०ने जिंकण्यावर असेल.

तत्पूर्वी, भारताचा डाव संपणार होता तेव्हा पाऊस आला आणि पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. खेळ थांबला तेव्हा भारताने १९.३ षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या होत्या. रिंकू सिंग ३९ चेंडूत ६८ धावा केल्या आणि तो नाबाद राहिला. मोहम्मद सिराजला एकही चेंडू खेळायला मिळाला नाही कारण, तेव्हाच पावसाला सुरुवात झाली होती. खाते न उघडता नाबाद आहे. भारताकडून कर्णधार सूर्यकुमार यादवने ५६ धावांची खेळी केली. तिलक वर्माने २९ तर रवींद्र जडेजाने १९ धावा केल्या आहेत. यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल आणि अर्शदीप सिंग यांना खाते उघडता आले नाही. जितेश शर्माने केवळ एक धाव काढली. दक्षिण आफ्रिकेकडून जेराल्ड कोएत्झीने तीन विकेट्स घेतल्या. मार्को जॅनसेन, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी आणि एडन मार्करन यांना प्रत्येकी एक गडी बाद करण्यात यश मिळाले.

भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याची सुरुवात टी-२० मालिकेने होत आहे. डरबनमध्ये खेळलेला पहिला टी-२० पावसामुळे रद्द झाला, त्यात नाणेफेकही होऊ शकली नाही. टी-२० मालिकेपाठोपाठ वन डे मालिका होणार असून कसोटी मालिकेने या दौऱ्याचा शेवट होणार आहे. दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आणि उसळत्या खेळपट्ट्यांवर चांगली कामगिरी करण्याचे आव्हान युवा भारतीय संघासमोर असेल. क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेत चांगला रेकॉर्ड आहे, परंतु सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील संघाला येथे विजय मिळवणे सोपे असणार नाही.

हेही वाचा: कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धा : भारतीय संघ उपांत्य फेरीत; उपांत्यपूर्व सामन्यात नेदरलँड्सवर ४-३ अशी मात

दोन्ही संघाची प्लेईंग -११

भारत: यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका: मॅथ्यू ब्रिट्झके, रीझा हेंड्रिक्स, एडन मार्कराम (कर्णधार), हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक), डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅनसेन, अँडिले फेहलुकवायो, जेराल्ड कोएत्झी, लिझाद विल्यम्स, तबरेझ शम्सी.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sa 2nd t20 brilliant innings from reza hendricks south africa defeated india by five wickets avw
First published on: 13-12-2023 at 00:30 IST