India vs South Africa Test Series: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील बॉक्सिंग-डे कसोटी सामना २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. दोन्ही संघ दोन कसोटीत आमनेसामने येतील. पहिली कसोटी सेंच्युरियनमध्ये खेळवली जाणार आहे. तर, दुसरी कसोटी केपटाऊनमध्ये खेळवली जाईल. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेत कधीही कसोटी मालिका जिंकलेली नाही. यावेळी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरला आहे.

कसोटी मालिका सुरू होण्यापूर्वीच टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. ऋतुराज गायकवाडच्या बोटाला फ्रॅक्चर झाल्याने कसोटी मालिकेतून तो बाहेर पडला. बीसीसीआयने अद्याप त्याची अधिकृत घोषणा केलेली नाही किंवा बदलीची घोषणाही केलेली नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऋतुराजच्या बदली खेळाडूंपैकी एकाने यापूर्वी भारत अ संघाचे कर्णधारपद भूषवले आहे, तर दुसऱ्याने रणजी ट्रॉफीमध्ये खूप धावा केल्या आहेत. त्या दोघांपैकी एकाला पहिल्या कसोटीत संघात स्थान मिळू शकते.

ऋतुराजने एकदिवसीय आणि टी-२० या दोन्ही सामन्यांमध्ये पदार्पण केले आहे, परंतु अद्याप कसोटीत एकही सामना खेळलेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारत अ संघाचा माजी कर्णधार अभिमन्यू ईश्वरनचा संघात समावेश केला जाऊ शकतो. ईश्वरन बंगाल संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो. त्याला ८८ प्रथम श्रेणी सामने खेळण्याचा अनुभव आहे आणि याआधीही तो टीम इंडियामध्ये सामील झाला होता.

हेही वाचा: NZ vs BAN: बांगलादेशने रचला इतिहास! न्यूझीलंडचा त्यांच्याच देशात दारुण पराभव, १०० पेक्षा कमी धावांवर ऑल आऊट

ईश्वरनने दीर्घकाळ भारत-अ चे नेतृत्व केले आहे. याशिवाय मीडिया रिपोर्ट्समध्ये सरफराज खानही टीममध्ये सामील झाल्याची चर्चा आहे. मुंबईच्या या फलंदाजाने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली असून रणजी ट्रॉफीमध्ये त्याने खूप धावा केल्या आहेत. सरफराज सध्या भारत अ संघाबरोबर दक्षिण आफ्रिकेत असून वरिष्ठ भारतीय संघाविरुद्ध इंट्रा स्क्वॉड सराव सामने खेळत आहे. सराव सामन्यातही त्याने शतक झळकावले आहे.

वर्ल्ड कप फायनलमधील पराभवानंतर विश्रांतीवर असलेला रोहित शर्मा टीम इंडियात परतला असून तो दोन कसोटी सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करेल. याशिवाय विराट कोहली, जसप्रीत बुमराह, शार्दुल ठाकूर आणि रविचंद्रन अश्विन देखील संघात खेळताना दिसणार आहेत. वर्ल्ड कप फायनलनंतर या सर्व खेळाडूंना विश्रांती देण्यात आली होती.

हेही वाचा: IPL 2024 Auction: “सीएसकेच्या प्रत्येक बोलीमागे धोनीचे…”, चेन्नईच्या सीईओ यांनी केला मोठा खुलासा

भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के.एस. भरत (यष्टीरक्षक), के.एल. राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), प्रसिध कृष्णा.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण आफ्रिकेचा कसोटी संघ: टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, गेराल्ड कोएत्झी, टोनी डी जॉर्गी, डीन एल्गर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, एडन मार्कराम, विआन मुल्डर, लुंगी एनगिडी, कीगन पीटरसन, कागिसो स्टेब्स, कागिसो राबाब्स, काइल व्हेरीन.