भारताविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिका संघाने एक मोठी चूक केली. यजमान संघाने धावबादची एक संधी गमावली. सामन्यादरम्यान केएल राहुल आणि ऋषभ पंत दोघेही एकाच एंडकडे धावले. असे असतानाही आफ्रिकेचा संघ पंत किंवा राहुलला बाद करू शकला नाही. या घटनेचा मजेशीर व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.
ऋषभ पंतने १५व्या षटकातील शेवटचा चेंडू मिडविकेटच्या दिशेने खेळला आणि एक झटपट एक धाव घेण्याचा प्रयत्न केला, परंतु काही पावले टाकल्यानंतर तो थांबला. दरम्यान, केएल राहुलने धाव घेतली होती, त्यामुळे नॉन-स्ट्राइक एंडवर कोणीही नव्हते, आफ्रिकेच्या संघाला धावबाद करण्याची मोठी संधी मिळाली.




आफ्रिकेचा कप्तान टेंबा बावुमाने मिडविकेटवरून चेंडू उचलून स्टंपच्या दिशेने फेकला, पण तो स्टंपला लागला नाही. त्यामुळे राहुलने पुन्हा नॉन-स्ट्राइक एंडकडे धाव घेतली. त्यामुळे भारताला मोठे जीवदान मिळाले. यानंतर राहुल आणि पंत यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली.
हेही वाचा – IND vs SA : ‘ये तो शुरू होते ही खत्म’, विराट शून्यावर बाद; ट्विटर ट्रेंड होतोय DUCK!
दरम्यान, राहुलने आपले अर्धशतक पूर्ण केले आणि वैयक्तिक ५५ धावा केल्या. दुसरीकडे, पंतने वेगवान फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. त्याने १० चौकार आणि २ षटकारांसह ८५ धावांची खेळी केली.