scorecardresearch

Premium

IND vs SA: ना सूर्या ना हार्दिक; दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर टी-२० कर्णधारपदासाठी BCCI करणार ‘या’ खेळाडूची मनधरणी

IND vs SA series: एकदिवसीय विश्वचषकादरम्यान घोट्याच्या दुखापतीमुळे टी-२० कर्णधार हार्दिक पंड्या आणखी एका महिन्यासाठी बाहेर झाला आहे. त्यामुळे बीसीसीआय रोहित शर्माने कर्णधारपद भूषवावे यासाठी त्याचे मन वळवण्याचे प्रयत्न करत आहे.

IND vs SA: BCCI will convince Rohit to captain the T20 team Rahane can be dropped from the Test squad
बीसीसीआय 'या' स्टार खेळाडूला कर्णधारपद भूषवावे यासाठी त्याचे मन वळवण्याचे प्रयत्न करत आहे. सौजन्य- (ट्वीटर)

India vs South Africa series: गुरूवारी दक्षिण आफ्रिकेच्या आगामी महत्त्वाच्या दौऱ्यासाठी संघाची घोषणा करण्यापूर्वी बीसीसीआयचे वरिष्ठ अधिकारी रोहित शर्माला टी-२० फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न करतील. टी-२० विश्वचषक २०२२च्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या पराभवानंतर रोहितला टीकेचा सामना करावा लागला होता. याच कारणामुळे तो गेल्या एक वर्षापासून टी-२० खेळलेला नाही. या मालिकेत बीसीसीआयचे सचिव आणि निवड समितीचे निमंत्रक जय शाह दिल्लीत मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांची भेट घेतील आणि संघाशी चर्चा करण्याबरोबरच पुढील मोठ्या स्पर्धेच्या टी-२० विश्वचषकाची ब्लू प्रिंटही तयार करतील.

रोहितने टी-२० मध्ये पुनरागमन करावे अशी बीसीसीआयची इच्छा आहे

नुकत्याच पार पडलेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान घोट्याच्या दुखापतीमुळे टी-२० कर्णधार हार्दिक पंड्या आणखी एका महिन्यासाठी बाहेर झाला आहे. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे देण्यात आली आहे. मात्र, आता टी-२० विश्वचषकाला सात महिने बाकी असताना संघाची तयारी जवळपास सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत रोहितने पुन्हा टी-२०मध्ये पुनरागमन करावे आणि कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारावी, अशी बोर्डाची इच्छा आहे.

kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच
sunil gavaskar supports rohit sharma
कसोटी क्रिकेटसाठी दृढनिश्चय आवश्यक! रोहित शर्माच्या वक्तव्याचे गावस्करांकडून समर्थन
All people think Rohit Sharma's bitter sweet DRS affair continues commentators left in splits
VIDEO : ‘काही सेकंद बाकी, सर्वांनी डोकं लावा…’, डीआरएसबाबत रोहित शर्मा गोंधळला, शेवटच्या क्षणी घेतला निर्णय
KL Rahul IPL 2024 Shoot Video Viral
VIDEO : ‘हे कोण लिहितंय…’, आयपीएल शूटमध्ये केएल राहुलचा संयम सुटला, स्क्रिप्टवरुन कर्मचाऱ्यावर संतापला

हेही वाचा: राहुल द्रविडची पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर गंभीरचे सूचक विधान; म्हणाला, “विश्वचषक पराभवाचा…”

हार्दिक परत आला तर काय होईल?

रोहितला टी-२० फॉरमॅटमध्ये खेळायचे नसल्याचा अहवाल यापूर्वी आला होता आणि त्याने याबाबत बीसीसीआयला स्पष्टपणे कळवले होते. पण एकदिवसीय विश्वचषकात त्याने ज्या प्रकारे संघाचे नेतृत्व केले त्यामुळे बीसीसीआयला खात्री पटली की त्याने जून-जुलैमध्ये अमेरिकेत होणाऱ्या टी-२० विश्वचषकापर्यंत मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळावे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेच्या अटीवर सांगितले की, “हार्दिक परतल्यावर काय होईल हा प्रश्न आहे, पण बीसीसीआयला वाटते की जर रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपद स्वीकारले तर तो टी-२० विश्वचषकात कर्णधारपद सांभाळेल. जर रोहित सहमत नसेल तर सूर्यकुमार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-२० सामन्यांचे नेतृत्व करेल.”

हेही वाचा: IPL 2024: आर. अश्विनने हार्दिक पंड्याबाबत केला मोठा खुलासा; म्हणाला,“मुंबई इंडियन्समध्ये जाण्यासाठी त्याने…”

के.एल. राहुलच्या टी-२० मध्ये पुनरागमन करण्याबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो

विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेत मर्यादित षटकांच्या सामन्यांमधून माघार घेत बोर्डाकडे विश्रांतीची विनंती केली आहे. जोपर्यंत कोहलीचा विषय आहे, तो आयपीएलमध्ये कसा खेळतो यावर सर्व काही अवलंबून असेल आणि के.एल. राहुलच्या बाबतीतही तेच होईल. आगामी हंगामात राहुल लखनऊ सुपर जायंट्सकडून कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाजाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचा फॉर्म पाहूनच त्याच्या टी-२० कारकिर्दीबाबत निर्णय घेतला जाईल. दुसरा प्रश्न वर्कलोड मॅनेजमेंटचा देखील आहे कारण दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारताला ११ दिवसात सहा मर्यादित षटकांचे सामने खेळायचे आहेत, ज्यात ५० षटकांचे तीन सामने आहेत.

वर्कलोड मॅनेजमेंटवरही भर दिला जाईल

दुसरीकडे, पाच दिवसांच्या अंतरानंतर (२६ डिसेंबर) दोन्ही देशांमधील कसोटी मालिका सुरू होणार आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, “पुढील सहा महिन्यांत आयसीसी स्पर्धा होणार असल्याने बीसीसीआय नेहमीच मर्यादित षटकांच्या फॉरमॅटला प्राधान्य देते. ज्यामध्ये विश्वचषकानंतर वन डेला प्राधान्य आहे आणि टी-२० विश्वचषकापर्यंत पाच एकदिवसीय सामने पुरेसे आहेत. त्यामुळे जर रोहितने टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले तर तो कसोटी सामन्यांसाठी ताजेतवाने होण्यासाठी विश्रांती घेऊ शकतो. याबाबत संघ व्यवस्थापन निर्णय घेईल.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ind vs sa will rohit sharma be the t20 captain on south africa tour bccis convince begins avw

First published on: 30-11-2023 at 11:11 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×