IPL 2024 and Haridk Pandya: दोन वर्षे गुजरात टायटन्सचे कर्णधार असलेला हार्दिक पंड्या आयपीएल २०२४ पूर्वी मुंबई इंडियन्समध्ये परतला असून त्याबाबत तसा करार करण्यात आला आहे. यूएईमध्ये १९ डिसेंबर रोजी होणाऱ्या मिनी-लिलावापूर्वी हा सर्वात मोठा चर्चेचा मुद्दा ठरला आहे. या सगळ्या दरम्यान भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने हार्दिकला त्यांच्या संघात समाविष्ट करण्यासाठी मुंबईने किती पैसे मोजले याबाबत अंदाज व्यक्त केला आहे.

मुंबईत येण्यासाठी हार्दिकला किती पैसे मिळाले?

आर. अश्विन त्याच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना म्हणाला, “मी तुम्हाला व्यापार कराराबद्दल सांगेन कारण, मी स्वतः त्यात सहभागी झालो आहे. एखाद्या खेळाडूला हस्तांतरित केलेल्या रकमेच्या १० ते ५० टक्के पर्यंत पैसे मिळू शकतात. उदाहरणार्थ, माध्यमात जाहीर केल्याप्रमाणे, हार्दिक पंड्यासाठी मुंबई इंडियन्सने गुजरातबरोबर १५ कोटी रुपयांचा करार केला असावा. हे संघांबाबातीत आता, खेळाडूने स्वतःला मिळणारी रक्कम अजून जाहीर केलेली नाही, जी हस्तांतरित करताना भरावी लागते ती आत्तापर्यंतच्या बातम्यांनुसार अघोषित रक्कम आहे. मुंबई इंडियन्समध्ये जाण्यासाठी त्याला माझ्या अंदाजे १५ कोटींपेक्षा अधिक रक्कम मिळाली असावी,” अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनेलवरील व्हिडीओमध्ये म्हटले आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

हेही वाचा: IND vs SL: भारत करणार श्रीलंकेचा दौरा, वन डे आणि टी-२० मालिकेत होणार सहभागी; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम

हार्दिकने गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून दिले आहे

गुजरात टायटन्सबरोबरच्या दोन वर्षात, हार्दिक पंड्याने २०२२ मधील त्याच्या पहिल्या आयपीएल हंगामात त्याच्या संघाला विजेतेपद मिळवून दिले. दुसऱ्या हंगामात टायटन्सने आयपीएल २०२३च्या अंतिम फेरीत प्रवेश केला आणि फायनलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पराभूत स्पर्धेचे उपविजेते ठरले. कर्णधार म्हणून आयपीएलमधील यशानंतर पंड्या भारताचा टी-२० कर्णधार बनला पण आता शुबमन गिलची गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हार्दिक पंड्याच्या उदयात मुंबई इंडियन्सचा मोठा वाटा आहे. त्याला २०१५ मध्ये फ्रँचायझीने अनकॅप्ड खेळाडू म्हणून १० लाख रुपयांच्या मूळ किमतीत घेतले होते. २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० मध्ये मुंबई इंडियन्सच्या विजेतेपदांमध्ये त्याने महत्त्वाची भूमिका बजावली. पहिल्या हंगामानंतर त्याला भारतीय संघात स्थान मिळाले.

हेही वाचा: राहुल द्रविडची पुन्हा प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर गंभीरचे सूचक विधान; म्हणाला, “विश्वचषक पराभवाचा…”

हार्दिक पंड्याने मुंबई इंडियन्ससाठी गुजरात टायटन्सचे कर्णधारपद का सोडले?

आता प्रश्न असा आहे की, गुजरातने हार्दिक पंड्याला कर्णधारपद दिले होते, तोही चांगली कामगिरी करत होता. पण एमआयमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळण्यासाठी त्याने गुजरातचा संघ का सोडला? यावर येत्या काही दिवसात कळेल. आयपीएल २०२४मध्ये हार्दिक पंड्या एमआयचे कर्णधारपद भूषवू शकत नसला अशी जरी शक्यता वर्तवली तरी त्याने या हंगामाच्या शेवटी किंवा पुढील हंगामापासून या संघाचे कर्णधारपद स्वीकारले पाहिजे, असे फ्रेंचायझीचे मत आहे. स्वतःवरील दबाव कमी करण्यासाठी रोहित एमआयचे कर्णधारपद सोडू शकतो, त्यानंतर हार्दिकला ही जबाबदारी दिली जाऊ शकते आणि यामुळेच हार्दिकने गुजरातचे कर्णधारपद सोडले आहे. मात्र, ही सध्या फक्त एक चर्चा असून याबाबत ठोस अशी अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Story img Loader