Irfan Pathan Reply on Yuvraj Singh Tweet: भारत आणि श्रीलंका यांच्यातील ३ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना तिरुवनंतपुरम येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेचा ३१७ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव करत मालिका ३-० ने जिंकली. भारताकडून सलामीवीर शुबमन गिलशिवाय विराट कोहलीने नाबाद शतक झळकावले. विराट कोहलीने ११० चेंडूत १६६ धावांची खेळी केली. त्याचवेळी हा सामना पाहण्यासाठी काही चाहते स्टेडियमवर पोहोचले. यामागे २ कारणे असल्याचे बोलले जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने एकदिवसीय सामन्यांच्या भवितव्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. त्याच्या चिंतेवर माजी अष्टपैलू इरफान पठाणने गंमतीशीर प्रतिक्रिया दिली आहे. रविवारी भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहली आणि शुबमन गिल यांनी शतके झळकावली. युवराजने दोन्ही खेळाडूंचे अभिनंदन केले आणि तिरुवनंतपुरम येथील ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियममध्ये कमी उपस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली.

‘एकदिवसीय क्रिकेट संपत आहे का?’

तिरुवनंतपुरम एकदिवसीय सामना पाहण्यासाठी काही चाहते स्टेडियमवर पोहोचले. यामागे दोन कारणे दिली जात आहेत. कारण भारतीय संघाने मालिका आधीच जिंकली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चाहते स्टेडियममध्ये कमी पोहोचले. त्याचवेळी, तिकिटांचे दर खूप महाग होते, त्यामुळे चाहत्यांनी फारसा रस दाखवला नाही, असेही बोलले जात आहे. या सामन्यादरम्यान चाहत्यांची कमी संख्या पाहून भारताचा माजी दिग्गज युवराज सिंगनेही चिंता व्यक्त केली. “एकदिवसीय क्रिकेट संपत आहे का”, असे ट्विट त्याने केले.

स्टेडियममध्ये निम्म्याहून कमी प्रेक्षक आले होते

भारताने श्रीलंकेविरुद्धच्या तिन्ही एकदिवसीय सामन्यांमध्ये एकतर्फी कामगिरी केली आणि पाहुण्या संघाला कुठेही उभे राहू दिले नाही. विराट कोहलीने पहिल्या एकदिवसीयतही शतक झळकावले. मात्र, दुसऱ्या सामन्यात त्याला चालता आले नाही आणि भारताने तो सामना केवळ चार विकेटने जिंकला. रविवारी झालेल्या शेवटच्या सामन्यात ग्रीनफिल्ड स्टेडियमवर मोठ्या प्रमाणात जागा रिकाम्या होत्या. ३८,००० क्षमतेच्या स्टेडियममध्ये केवळ १७,००० लोक आल्याचा अधिकृत दावा करण्यात आला.

हेही वाचा: ICC Test Ranking: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलपूर्वी टीम इंडियासाठी आनंदाची बातमी, T20 नंतर टेस्टमध्येही नंबर-१; ऑस्ट्रेलियालासमोर मोठे आव्हान

पाजी आप मैदान पर वापस लौट आईये, फैंस भी लौट आएंगे’

युवराज सिंगच्या ट्विटवर इरफान पठाणने उत्तर दिले. म्हणाला की, “पाजी तुम्ही मैदानावर परतलात तर चाहतेही परत येतील.” दोन्ही खेळाडूंचे हे ट्विट खूप व्हायरल होत आहे. पण माझ्यासाठी स्टेडियम जवळपास अर्धे रिकामे असणे हे अडचणीचे कारण आहे. एकदिवसीय क्रिकेट संपणार आहे का? युवराज सिंगच्या ट्विटवर इरफान पठाणने दिलेले उत्तर चांगलेच व्हायरल होत आहे.

कोलकातामध्ये सर्वाधिक प्रेक्षकसंख्या

केरळ क्रिकेट असोसिएशनचे मीडिया मॅनेजर कृष्णा प्रसाद यांनी पीटीआयला सांगितले की, “आमच्याकडे कधीच अर्धे रिकामे स्टेडियम नव्हते. याची अनेक कारणे आहेत. आजकाल एकदिवसीय सामन्यांमध्ये आपल्याला फारसा रस दिसत नाही”. ते म्हणाले की याशिवाय, कोलकाता येथील दुसऱ्या सामन्यात मालिका जवळपास संपली होती आणि त्यामुळे अनेकांनी या औपचारिक सामन्यासाठी स्टेडियममध्ये न येण्याचा निर्णय घेतला असेल. तीन सामन्यांच्या मालिकेत फक्त ईडन गार्डन्सवर ५०,००० पेक्षा जास्त गर्दी दिसली. गुवाहाटीलाही सर्व तिकिटे विकण्यात अपयश आले.”

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs sl irfans hilarious reply to yuvraj singh who says odi cricket is coming to an end says be ready with pads avw
First published on: 17-01-2023 at 18:23 IST