IND vs WI 1st ODI India Beat West Indies by 5 Wickets: भारत आणि वेस्ट इंडिज संघातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना गुरुवारी केन्सिंग्टन ओव्हल येथे खेळला गेला. या सामन्यात टीम इंडियाने वेस्ट इंडिज ५ विकेट्स राखून निसटता विजय मिळवला. त्याचबरोबर तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताकडून इशान किशनने अर्धशतक झळकावले. इशानने ४६ चेंडूत ५२ धावा केल्या. त्याने ७ चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचवेळी कुलदीप यादव आणि रवींद्र जडेजा यांनी गोलंदाजीत आपली ताकद दाखवून दिली. कुलदीपने ४ आणि जडेजाने ३ बळी घेतले. तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.

११५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने बॅटिंग ऑर्डरमध्ये बरेच प्रयोग केले. रोहित शर्मा आणि विराट कोहली फलंदाजीला येण्याच्या मूडमध्ये नव्हते. इशान आणि गिलने डावाची सुरुवात केली. सूर्यकुमार तिसऱ्या क्रमांकावर आला. हार्दिक चौथ्या क्रमांकावर तर जडेजा पाचव्या क्रमांकावर आहे. शार्दुलने सहाव्या क्रमांकावर फलंदाजी केली. मात्र, भारताच्या पाच गडी बाद झाल्याने कर्णधार रोहित (१२) आणि रवींद्र जडेजाला (१६) फलंदाजीला उतरून सामना संपवावा लागला. वेस्ट इंडिजकडून गुडाकेश मोतीने दोन, जेडेन सेल्स आणि यानिकने प्रत्येकी एक गडी बाद केला.

विंडीज संघाची सुरुवात खूपच खराब झाली –

पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर विंडीज संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या दोन धावा करून हार्दिक पांड्याचा बळी ठरलेल्या काईल मेयर्सच्या रूपाने संघाने ७ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. यानंतर ४५ धावांवर संघाला दोन धक्के बसले, त्यात मुकेश कुमारने अथानाजला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याचवेळी शार्दुल ठाकूरने ब्रँडन किंगला त्याच्या वैयक्तिक १७ धावांवर त्याच्या सर्वोत्तम चेंडूवर बोल्ड केले.

येथून शिमरॉन हेटमायर आणि कर्णधार शाई होप यांच्यात ४३ धावांची भागीदारी पाहायला मिळाली. ही भागीदारी मोडून काढत रवींद्र जडेजाने ८८ धावांवर हेटमायरच्या रूपाने विंडीज संघाला चौथा धक्का दिला. ९६ च्या स्कोअरवर संघाला पाचवा धक्का रोवमन पॉवेलच्या रूपाने बसला. रवींद्र जडेजाच्या फिरकी गोलंदाजीसमोर झुंजणाऱ्या विंडीजच्या फलंदाजांसाठी कुलदीप यादवची फिरकी खेळणे आणखी कठीण ठरले.

हेही वाचा – ICC T20 World Cup 2023: विश्वचषकासाठी आयर्लंडचा संघ ठरला पात्र, इटलीला करावे लागणार ‘हे’ काम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

९९ धावांवर विंडीज संघाने डॉमिनिक ड्रेक्सच्या रूपाने आपली ७वी विकेट गमावली. यानंतर, ११४ धावांवर, कर्णधार शाई होपच्या रूपाने संघाला ९वा धक्का बसला, जो ४३ च्या वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात विंडीज संघाचा डाव ११ धावांवरच मर्यादित राहिला.कुलदीप यादवने ३ षटके गोलंदाजी करताना दोन मेडन षटकांसह अवघ्या ६ धावांत ४ बळी घेतले. दुसरीकडे, रवींद्र जडेजाने ६ षटकांत ३७ धावा देत ३ बळी घेतले. याशिवाय हार्दिक पांड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनीही १-१ विकेट घेतली.