India vs West Indies 2nd Test Pitch Report Weather Report: वेस्टइंडिजचा संघ २ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमधील पहिला कसोटी सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने वेस्टइंडिजवर एकतर्फी विजयाची नोंद केली. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय संघ विजय मिळवून मालिका २- ० ने खिशात घालण्याच्या प्रयत्नात असणार आहे. दरम्यान मालिकेतील दुसरा सामना केव्हा, कुठे आणि कधी रंगणार? जाणून घ्या.
केव्हा, कधी, कुठे होणार भारत आणि वेस्टइंडिज दुसरा कसोटी सामना?
भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला १० ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. हा सामना दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर पार पडणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार,सकाळी ९:३० वाजता सुरू होईल. तर नाणेफेक ९ वाजता होईल. पहिला सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्याला प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. विराट आणि रोहितशिवाय भारतीय संघ मायदेशात पहिलाच कसोटी सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. आता दुसऱ्या सामन्यात विराटच्या होमग्राऊंडवर, विराटशिवाय सामना पाहण्यासाठी क्रिकेट चाहते गर्दी करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
खेळपट्टी कशी असणार?
या मालिकेतील पहिल्या सामन्यात वेस्टइंडिजचे फलंदाज २ सत्र देखील फलंदाजी करू शकले नव्हते. ही खेळपट्टी बनवण्यासाठी काळ्या मातीचा वापर केला असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे फिरकी गोलंदाजांना मदत मिळू शकते. भारतीय संघातील फिरकी गोलंदाज कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि वॉशिंग्टन सुंदर वेस्टइंडिजच्या फलंदाजांवर भारी पडू शकतात. त्यामुळे या सामन्याचा निकालही तिसऱ्या किंवा चौथ्या दिवशी लागू शकतो.
हवामान कसं असेल?
दिल्लीत क्रिकेट खेळण्यासाठी अनुकूल हवामान असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अॅक्यूवेदरने दिलेल्या वृत्तानुसार, सकाळी सामना सुरू होईल त्यावेळी तापमान २७ डिग्री सेल्सिएस इतका असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर दुपारच्या वेळी तापमान २९ डिग्री सेल्सिएस इतका असू शकतो, असा अंदात वर्तवण्यात आला आहे.
या सामन्यासाठी कशी असेल प्लेइंग ११?
शुभमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), नितीश रेड्डी, रवींद्र जडेजा (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज