India vs West Indies 1st Test: दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने वेस्ट इंडिजचा एक डाव आणि १४१ धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याने पहिल्या डावात १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ५ विकेट्स गमावत ४२९ धावा केल्या. टीम इंडियाला २७१ धावांची आघाडी मिळाली. वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावात १३० धावांत गारद झाला. अशा प्रकारे टीम इंडियाने सामना जिंकला.

अश्विनच्या फिरकीसमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी टाकली नांगी

रविचंद्रन अश्विनने अप्रतिम गोलंदाजी करत वेस्ट इंडिजचा संघ १३० धावांत गुंडाळला. पहिल्या डावात पाच विकेट्स घेतल्यानंतर अश्विनने दुसऱ्या डावात तब्बल सात विकेट्स घेतले. या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. त्याने पहिल्या डावात १५० धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने पहिल्या डावात ५ विकेट्स गमावत ४२९ धावा केल्या. टीम इंडियाला २७१ धावांची आघाडी मिळाली. वेस्ट इंडिजचा संघ दुसऱ्या डावात १३० धावांत गारद झाला. अशा प्रकारे टीम इंडियाने सामना जिंकला.

दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजचा एकही फलंदाज क्रीझवर टिकू शकला नाही. त्याच्याकडून अलिक नाथनागेने सर्वाधिक २८ धावा केल्या. जेसन होल्डरने नाबाद २० धावा केल्या. जोमेल वॅरिकन १८, अल्झारी जोसेफने १३ आणि जोशुआ डी सिल्वाने १३ धावा केल्या. रॅमन रेफरने ११ धावा केल्या. क्रेग ब्रॅथवेट आणि तागे नारायण चंदरपॉल प्रत्येकी ७ धावा करून बाद झाले. जर्मेन ब्लॅकवूडला ५ आणि रहकीम कॉर्नवॉलला केवळ ४ धावा करता आल्या. केमार रोचला खातेही उघडता आले नाही. भारताकडून अश्विनशिवाय रवींद्र जडेजाने दोन विकेट्स घेत मोलाची साथ दिली. मोहम्मद सिराजला पहिला ब्रेकथ्रू मिळाला.

रोहित आणि यशस्वीने शतक ठोकले

तत्पूर्वी, यशस्वी जैस्वाल, कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांनी भारतासाठी शानदार खेळी खेळली. यशस्वीने १७१ धावा केल्या. ही त्याची पदार्पणाची कसोटी होती. त्याचवेळी कर्णधार रोहितने १०४ धावांची खेळी केली. विराट कोहली शतकही करू शकला नाही आणि ७६ धावा करून बाद झाला. रवींद्र जडेजा नाबाद ३७ आणि इशान किशनने एक धाव काढली. शुबमन गिलने सहा आणि अजिंक्य रहाणेने तीन धावा केल्या. वेस्ट इंडिजकडून केमार रोच, अल्झारी जोसेफ, रहकीम कॉर्नवॉल, जोमेल वॅरिकन आणि अॅलिक अथानेज यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हेही वाचा: ICC Revenue Share: BCCI होणार मालामाल! नवीन वितरण मॉडेलनुसार आयसीसी रेव्हेन्यूच्या तब्बल ३८.५% शेअर मिळणार, मात्र पाकिस्तानचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तिसऱ्या दिवशी दुसऱ्या सत्रात भारतीय संघाचा डाव घोषित झाला तेव्हा दिवसाचा खेळ संपण्यास जवळपास ५० षटके शिल्लक होती. यानंतर आपल्या फिरकीची जादू दाखवत अश्विनला विंडीज संघाचा दुसरा डाव गुंडाळण्यास जास्त वेळ लागला नाही. ५८ धावसंख्येपर्यंत वेस्ट इंडिजचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. यानंतर संपूर्ण संघ १३० धावांवर बाद झाला. अश्विनने कारकिर्दीत ३४व्यांदा एका डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला, आणि दोन्ही डावात मिळून ८व्यांदा सामन्यात १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. या सामन्यात १७१ धावांच्या खेळीसाठी यशस्वीला सामनावीराचा किताब देण्यात आला आहे.