India vs West Indies: IND vs WI 4th ​​T20 Shubman Gill: भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिलने त्याच्यावर होणाऱ्या खराब फलंदाजीबाबत मौन सोडले आहे. तो म्हणाला की, “टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फॉर्ममध्ये परत येण्यासाठी त्याने ‘मूलभूत गोष्टींवर’ लक्ष केंद्रित केले आणि तो ज्या पद्धतीने धावा करत होता त्याचा अवलंब केला.” २३ वर्षीय गिल फलंदाज वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या तीन टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये दुहेरी आकडा देखील गाठू शकला नाही. या सामन्यात त्याने तीन, सात आणि सहा धावा केल्या पण चौथ्या सामन्यात ४७ चेंडूत ७७ धावा करत धमाकेदार खेळी केली आणि मी फॉर्मात परतलो आहे, असा संदेश टीकाकारांना दिला. भारताने हा सामना नऊ विकेटने जिंकला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चौथ्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यानंतर पत्रकारांशी बोलताना गिल म्हणाला, “पहिल्या तीन सामन्यांमध्ये मी १० धावांपर्यंत म्हणजेच दुहेरी आकडा देखील गाठू शकलो नाही. आज विकेट थोडी चांगली होती, त्यामुळे मला त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा होता. त्यानंतर, जेव्हा आम्हाला चांगली सुरुवात मिळाली, तेव्हा आम्हाला थोडा आत्मविश्वास मिळाला आणि मग आम्ही वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला.”

हेही वाचा: Snake on ground: क्रिकेटच्या मैदानावर अचानक सापाने मारली एन्ट्री अन् खेळाडूने असे काही केले की…; हा थरारक Video एकदा पाहाच

स्टार फलंदाज शुबमन म्हणाला, “टी२० फॉरमॅट असा आहे की, जेव्हा तुमच्याकडे तीन किंवा चार सामने असतात तेव्हा तुमचा चांगला शॉट क्षेत्ररक्षकाने अडवला किंवा झेल पकडला की तुम्ही बाद होतात. झटपट धावा करताना फारसा विचार करायला जास्त वेळ नसतो. सर्व फॉरमॅटमध्ये खेळताना अ‍ॅडजस्ट करण थोडसं अवघड असत, त्यामुळे लय सापडायला वेळ लागतो.”

गिल पुढे म्हणाला, “तुमच्या बेसिकवर काम करणे महत्त्वाचे आहे. जेव्हा तुम्ही सातत्याने धावा करत असता तेव्हा तुम्ही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करता. तुम्ही कुठे चुकत आहात हे शोधून काढावे लागेल. मला विश्वास आहे की या तीन सामन्यांमध्ये मी कोणतीही चूक केली नाही. माझी सुरुवात चांगली झाली पण मोठ्या स्कोअरमध्ये रूपांतर करू शकलो नाही.”

हेही वाचा: Kuldeep Yadav: “इंडिया में आपसे बडा…” कुलदीपच्या चमकदार कामगिरीमागे ऋषभ अन् पाँटिंगची मोलाचा भूमिका? कसे ते घ्या जाणून

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ रविवारी कॅरेबियन संघाविरुद्ध मालिकेतील पाचवा आणि शेवटचा टी२० सामना खेळणार आहे. हा सामना जिंकून भारतीय संघ टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याच्या पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी करेल. पाकिस्तानच्या या विक्रमाबद्दल बोलायचे झाले तर त्यांनी आतापर्यंत झिम्बाब्वेला टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २० वेळा पराभूत केले आहे. त्याचवेळी, मालिकेतील चौथा सामना जिंकल्यानंतर, भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध टी२० फॉर्मेटमध्ये १९वा विजय नोंदवला. संघाने पाचवा टी२० सामना जिंकल्यास या विक्रमाची संयुक्तपणे पाकिस्तानची बरोबरी होईल.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ind vs wi shubman gill broke his silence about poor form told how he came back avw
First published on: 13-08-2023 at 18:48 IST