India vs Australia Match Highlights: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा सामना हेरीटेज बँक स्टेडियममध्ये पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने २० षटकांअखेर ८ गडी बाद १६७ धावा केल्या. भारताने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी १६८ धावांचे आव्हान ठेवले होते. भारतीय संघाकडून सलामीला आलेल्या अभिषेक शर्माने २८, शुबमन गिलने ४६, शिवम दुबेने २२,सूर्यकुमार यादवने २० धावांची खेळी केली. शेवटी अक्षर पटेलने नाबाद २१ धावांची खेळी करून संघाची धावसंख्या १६७ धावांवर पोहोचवली.
ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी १६८ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार मिचेल मार्शने सर्वाधिक ३० धावांची खेळी केली. तर मॅट शॉर्टला २५ धावा करता आल्या. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर अक्षर पटेल, शिवम दुबेने प्रत्येकी २-२ गडी बाद केले. तर जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंगने प्रत्येकी १-१ गडी बाद केला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण डाव ११९ धावांवर आटोपला. यासह भारताने हा सामना ४८ धावांनी आपल्या नावावर केला.
IND vs AUS Live: वॉशिंग्टन सुंदरची हॅट्रीक थोडक्यात हुकली!
वॉशिंग्टन सुंदरने आधी मार्कस स्टोइनिस आणि त्यानंतर बार्टलेटला बाद करत माघारी धाडलं
IND vs AUS Live: ऑस्ट्रेलियाचे ६ तंबूत! टीम इंडिया मतबूत स्थितीत
वरूण चक्रवर्तीने आपल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलला बाद केलं आहे.
IND vs AUS Live: ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत! टीम इंडिया मतबूत स्थितीत
अर्शदीप सिंगने ऑस्ट्रेलियाला पाचवा धक्का दिला आहे. जोश फिलीपी बाद होऊन परतला आहे.
IND vs AUS Live: शिवम दुबे ऑन फायर! स्फोटक फलंदाज टीम डेव्हिड परतला माघारी
शिवम दुबेने ऑस्ट्रेलियाच्या चौथ्या फलंदाजाला माघारी पाठवलं आहे. टीम डेव्हिड १२ धावा करत माघारी परतला आहे.
IND vs AUS Live: मिचेल मार्श परतला माघारी
शिवम दुबेने भारतीय संघाला सर्वात मोठं यश मिळवून दिलं आहे. मिचेल मार्श अवघ्या ३० धावांवर माघारी परतला आहे.
IND vs AUS Live: अक्षर पटेलचा दणका! ऑस्ट्रेलियाला दुसरा मोठा धक्का
अक्षर पटेलने भारतीय संघाकडून दमदार गोलंदाजी केली आहे. त्याने जोश इंग्सिसला अवघ्या १२ धावांवर बाद करत माघारी धाडलं आहे.
IND vs AUS Live: ऑस्ट्रेलियाला पहिला मोठा धक्का! शॉर्ट स्वस्तात परतला माघारी
अक्षर पटेलने भारतीय संघाला पहिलं यश मिळवून दिलं आहे. शॉर्ट २० धावा करत माघारी परतला आहे.
IND vs AUS Live: दुसऱ्या डावाची सुरूवात!
भारतीय संघाने पहिल्या डावात २० षटकांअखेर ८ गडी बाद १६७ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी १६८ धावांची गरज आहे.
IND vs AUS Live Score: वॉशिंग्टन सुंदर स्वस्तात परतला माघारी
भारतीय फलंदाजांना या डावात हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. वॉशिंग्टन सुंदर देखील स्वस्तात माघारी परतला आहे. सुंदरला अवघ्या १२ धावा करता आल्या आहेत.
IND vs AUS Live Updates: भारताचे ५ फलंदाज तंबूत
तिलक वर्मा ५ धावांवर परतला माघारी! भारताचे ५ फलंदाज तंबूत
IND vs AUS Live Score: सूर्यकुमार पुन्हा एकदा स्वस्तात माघारी! टीम डेव्हिडने बाऊंड्री लाईनवर घेतला भन्नाट कॅच
भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवला चांगली सुरूवात मिळाली होती. पण तो २० धावा करून टीम डेव्हिडच्या हातून झेलबाद होऊन माघारी परतला आहे.
IND vs AUS Live Score: भारतीय संघाला तिसरा धक्का!
भारतीय संघाला तिसरा धक्का बसला आहे. सलामीला आलेला शुबमन गिल ४६ धावांवर माघारी परतला आहे.
IND vs AUS Live Score: भारतीय संघाला पहिला मोठा धक्का
भारतीय संघाला पहिला धक्का बसला आहे. सलामीला आलेला अभिषेक शर्मा २८ धावा करत माघारी परतला आहे.
IND vs AUS Live Updates: भारतीय संघाच्या ५० धावा पूर्ण
भारतीय संघाने ७ व्या षटकात ५० धावांचा पल्ला गाठला आहे.
शुबमन गिल-अभिषेक शर्माची फटकेबाजी
कर्णधार शुबमन गिल आणि त्याची सहकारी अभिषेक शर्मा यांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे. जोश हेझलवूडच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियाचा संघ अनुनभवी आहे.
मॅक्लवेलचं ऑस्ट्रेलिया संघात पुनरागमन
ऑस्ट्रेलियाला त्यांच्या घरच्या मैदानावर चीतपट करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे. ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने या सामन्यासाठी संघात चार बदल केले असून, भारतीय संघात कोणतेही बदल नाहीत. ग्लेन मॅक्सवेल, जोशुआ फिलीप, अॅडम झंपा आणि बेन ड्वारिशिअस यांना संघात घेतलं आहे. भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी कुलदीप यादवला संघातून रिलीज केलं आहे.
