India vs New Zealand 1st T20I Highlights Score Updates India vs New Zealand 1st T20I Squad | Loksatta

IND vs NZ 1st T20 Highlights: न्यूझीलंडचा भारतावर २१ धावांनी शानदार विजय; वाशिंग्टन सुंदरची झुंजार खेळी व्यर्थ

India vs New Zealand 1st T20I Highlights Updates: न्यूझीलंडने २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात १७७ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाला, निर्धारित २० षटकांत ९ बाद १५५ धावाच करता आल्या. ज्यामुळे न्यूझीलंड संघाने २१ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली

IND vs NZ 1st T20I Highlights Match Updates in Marathi
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० लाइव्ह अपडेट

India vs New Zealand 1st T20 Highlights Score Updates: भारत आणि न्यूझीलंड संघात तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला टी-२० सामना एमएस धोनीचे होम ग्राउंड असलेल्या झारखंड स्टेट क्रिकेट असोसएशन मैदानावर खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या होत्या. त्यामुळे भारतीय संघाला १७७ धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रत्युतरात भारतीय संघाला निर्धारित २० षटकांत ९ बाद १५५ धावाच करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंड संघाने २१ धावांनी शानदार विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

नाणेफेक हारल्यानंतर न्यूझीलंडने २० षटकांत ६ गडी गमावून १७६ धावा केल्या. डेव्हॉन कॉनवेने ५२ आणि डॅरिल मिशेलने नाबाद ५९ धावा केल्या. भारतीय संघ २० षटकात विकेट गमावून केवळ १५५ धावा करू शकला. भारताकडून सूर्यकुमार यादवने ४७ आणि वॉशिंग्टन सुंदरने ५० धावा केल्या. अर्शदीप सिंगने २०व्या षटकात दिलेल्या २७ धावांनी न्यूझीलंडचा आत्मविश्वास उंचावला.

त्यानंतर पाहुण्यांच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना पळताभुई थोडी केली. ३ फलंदाज १५ धावांवर माघारी परतले होते आणि ‘मिस्टर ३६०’ अशी ओळख असणाऱ्या सूर्यकुमार यादव हार्दिक पांड्या यांनी सामन्यात पकड घेतली होती. पण, ४ चेंडूंनी सामना फिरला अन् त्यानंतर भारताचा डाव गडगडला. वॉशिंग्टन सुंदरने दोन विकेट्ससह अर्धशतकी खेळी करून भारताच्या विजयासाठी पुरेपूर प्रयत्न केला.

Live Updates

India vs New Zealand 1st T20 Highlights Match Updates in Marathi: भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० हायलाइट्स अपडेट

22:36 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: न्यूझीलंडचा भारतावर २१ धावांनी विजय; वाशिंगटन सुंदरची झुंजार खेळी व्यर्थ

१७७ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाला, निर्धारित २० षटकांत ९ बाद १५५ धावाच करता आल्या. त्यामुळे न्यूझीलंड संघाने २१ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली.

22:31 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: भारतीय संघाला नववा धक्का

वाशिंग्टन सुंदरने २७ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. भारतीय संघाकडून खेळली ही सर्वात मोठी खेळी आहे.

22:30 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: वाशिंगटन सुंदरचे टी-२० क्रिकेटमधील पहिले अर्धशतक

वाशिंग्टन सुंदरने २६ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. भारतीय संघाकडून खेळली ही सर्वात मोठी खेळी आहे.

22:26 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: भारतीय संघाला ६ चेंडूत ३३ धावांची गरज

१९ षटकांच्या समाप्तीनंतर भारताची धावसंख्या ८ बाद १४४

22:15 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: टीम इंडियाला सातवा झटका

भारतीय संघांच्या अडचणी संपायच्या नाव घेत नाही. शिवम मावी २ धावा काढून धावबाद

22:12 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ:टीम इंडियाच्या अडचणीत वाढ

दीपक हुड्डाच्या रुपाने संघाला सहावा झटका

दीपक हुड्डा १० धावांचे योगदान देऊन बाद झाला.

भारतीय संघाला २० चेंडूत ५८ धावांची गरज

22:05 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: टीम इंडियाला विजयसाठी ३० चेंडूत ६७ धावांची गरज

पंधरा षटकांच्या समाप्तीनंतर भारताची धावसंख्या ५ बाद ११०

21:57 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: भारतीय संघाला मोठा झटका; सूर्या पाठोपाठ कर्णधार हार्दिक पांड्याही बाद

मायकल ब्रेसवेलने हार्दिक पांड्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले

मायकल ब्रेसवेलने हार्दिक पांड्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने २१ धावा केल्या. टीम इंडियाची धावसंख्या १२.२ षटकात ५ बाद ८९ अशी आहे. विजयासाठी ४६ चेंडूत ८८ धावांची गरज आहे. वॉशिंग्टन सुंदर ६ धावा करून क्रीजवर. दीपक हुडा नवीन फलंदाज म्हणून क्रीजवर.

21:50 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: भारतीय संघाला चौथा धक्का; सूर्यकुमारचे अर्धशतक हुकले

११.४ षटकांनंतर भारताने ४ गडी गमावून ८४ धावा केल्या आहेत.

सूर्यकुमार यादवने ३४ चेंडूत ४७ धावांचे योगदान दिले. ज्यामध्ये त्याने ६ चौकार आणि २ गगनचुंबी षटकार लगावले.

21:47 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: हार्दिक-सूर्यामध्ये अर्धशतकी भागीदारी

११ षटकांनंतर भारताने ३ गडी गमावून ७५ धावा केल्या आहेत. भारताला १५ धावांवर तिसरा धक्का बसला होता. त्यानंतर कर्णधार हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांनी डाव सांभाळला. दोघांनी आतापर्यंत ४१ चेंडूत ५९ धावांची भागीदारी केली आहे. सूर्या सध्या 27 चेंडूत ३९ तर हार्दिक १६ चेंडूत २० धावांवर फलंदाजी करत आहे.

21:40 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: दहा षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या ३ बाद ७४

दहा षटकांच्या समाप्तीनंतर भारतीय संघाची धावसंख्या ३ बाद ७४

सूर्यकुमार यादव ३९ (२७)

हार्दिक पांड्या २० (१५)

21:35 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: टीम इंडियाला विजयासाठी ६६ चेंडूत ११४ धावांची गरज आहे.

नऊ षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या ३ बाद ६३

सूर्यकुमार यादव २९ (२३)

हार्दिक पांड्या १९ (१४)

21:29 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: आठ षटकानंतर भारतीय संघाचे अर्धशतक पूर्ण

आठ षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या ३ बाद ५२

सूर्यकुमार यादव १९ (१८)

हार्दिक पांड्या १८ (१३)

21:20 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: पावरप्लेच्या समाप्तीनंतर भारत ३ बाद ३३

भारताची धावसंख्या सहा षटकांनंतर ३ बाद ३३ अशी आहे. सध्या सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पांड्या क्रीजवर आहेत.

21:16 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: भारताला तीन मोठे धक्के

१७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. संघाने १५ धावांत तीन विकेट गमावल्या आहेत. तिसऱ्या षटकात जेकब डफीने राहुल त्रिपाठीला कॉनवेकरवी झेलबाद केले. त्रिपाठीला खातेही उघडता आले नाही. यानंतर चौथ्या षटकात मिचेल सँटनरने शुबमन गिलला फिन ऍलनकरवी झेलबाद केले. शुभमन सहा चेंडूत सात धावा करून बाद झाला. भारताची धावसंख्या पाच षटकांनंतर ३ बाद ३३ अशी आहे. सध्या सूर्यकुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पंड्या क्रीजवर आहेत. इशान किशन चार धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.

21:10 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: राहुल त्रिपाठीच्या पाठोपाठ शुबमन गिलदेखील बाद

तीन षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या ३ बाद १२

शुबमन गिल ७ चेंडूत ६ धावा काढून बाद झाला. त्याला मिचेल सँटरने झेलबाद केले.

21:05 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: भारतीय संघाला राहुल त्रिपाठीच्या रुपाने दुसरा झटका

भारतीय संघाला राहुल त्रिपाठीच्या रुपाने दुसरा झटका बसला आहे.

राहुल त्रिपाठीला भोपळाही फोडता आला नाही.

21:01 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: दोन षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या १ बाद १०

दोन षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या १ बाद १०

इशान किशनकडू ४ धावांवर पहिल्या गड्याच्या रुपाने बाद झाला.

शुबमन गिल ६(४)

20:56 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: शुबमन गिल आणि इशान किशनकडून भारतीय डावाची सुरुवात

पहिल्या षटकानंतर भारतीय संघाची धावसंख्या बिनबाद ५

शुबमन गिल १

इशान किशनकडू ४

20:47 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: न्यूझीलंडने २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या

अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार बरसला. तो चेंडू नो बॉल होता आणि डॅरेल मिशेलने फ्री हिटवर पुन्ही षटकार लगावला. पुढच्या चेंडूवर त्याला डॅरेल मिशेलने पुन्हा षटकार लगावला. तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला. पुढच्या चेंडूवर एकही धाव आली नाही. शेवटच्या षटकात २७ धावा झाल्या. डॅरेल मिशेल ५९ आणि ईश सोधी ० धावांवर नाबाद राहिले. न्यूझीलंडने २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या.

20:36 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: न्यूझीलंड संघाला १४९ धावांवर सहावा झटका

१९ षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंड संघाला १४९ धावांवर सहावा झटका

20:31 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: न्यूझीलंडला पाचवा धक्का

१८व्या षटकात १३९ धावांवर न्यूझीलंडला चौथा धक्का बसला. अर्शदीप सिंगने डेव्हॉन कॉनवेला दीपक हुडाकडून झेलबाद केले. कॉनवे ३५ चेंडूत ५२ धावा करून बाद झाला. कॉनवेने आपल्या खेळीत सात चौकार आणि एक षटकार लगावला. या षटकात किवी संघाला पाचवा धक्का बसला. इशान किशनने मायकेल ब्रेसवेलला विकेटच्या मागे धावबाद केले. न्यूझीलंडची धावसंख्या १८ षटकांत ५ बाद १४१ अशी आहे. सध्या कर्णधार मिचेल सँटनर आणि डॅरिल मिशेल क्रीजवर आहेत.

20:26 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: अर्शदीप सिंगने टीम इंडियाला चौथे यश मिळवून दिले

अर्शदीप सिंगने टीम इंडियाला चौथे यश मिळवून दिले. त्याने डेव्हॉन कॉनवेला ५२ धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. न्यूझीलंडने १७.२ षटकांत ४ बाद १३९ धावा केल्या. डॅरेल मिशेल ३१ आणि मायकेल ब्रेसवेल नवीन फलंदाज म्हणून क्रीजवर आहेत.

20:18 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: १६ षटकांच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ३ बाद १२३

डेव्हॉन कॉनवेने आपल्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील ९ वे अर्धशतक झळकावले. त्याने ३१ चेंडूत ७ चौकार आणि १ षटकार लगावत ५० धावा केल्या.

डॅरेल मिचेल २३ (१७)

20:12 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: १५ षटकाच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ३ बाद ११७

१५ षटकाच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ३ बाद ११७

डेव्हॉन कॉनवे ४८(२९)

डॅरेल मिचेल १७ (२०)

20:06 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: न्यूझीलंडने ओलांडला १०० धावांचा टप्पा

१३ व्या षटकात १०३ धावांवर न्यूझीलंडला तिसरा धक्का बसला. कुलदीप यादवने ग्लेन फिलिप्सला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. फिलिप्सने डेव्हन कॉनवेसोबत तिसऱ्या विकेटसाठी ४७ चेंडूत ६० धावांची भागीदारी केली. फिलिप्स २२ चेंडूत १७ धावा करून बाद झाला. सध्या डॅरिल मिशेल एक धाव आणि कॉनवे २८ चेंडूत २७ धावा करून क्रीजवर आहे. १३ षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या ३ बाद १०४ आहे.

20:01 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: न्यूझीलंडला ग्लेन फिलिप्सच्या रुपाने तिसरा धक्का

ग्लेन फिलिप्स २२ चेंडूत १७ धावांचे योगदान देऊन बाद झाला. तो कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर सूर्याच्या हाती झेलबाद झाला.

19:57 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: १२ षटकाच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या २ बाद ९६

१२ षटकाच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या २ बाद ९६

डेव्हॉन कॉनवे ४१(२५)

ग्लेन फिलिप्स १६ (२०)

19:49 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: १० षटकाच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या २ बाद ७९

१० षटकाच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या २ बाद ७९

डेव्हॉन कॉनवे ३१(१९)

ग्लेन फिलिप्स ९ (१४)

19:44 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: उमरान मलिकचे पहिले षटक चांगलेच महागात पडले

उमरान मलिकचे पहिले षटक चांगलेच महागात पडले. त्याने १६धावा दिल्या. न्यूझीलंडने ८ षटकांत २ बाद ७०धावा केल्या. डेव्हॉन कॉनवे २७ आणि ग्लेन फिलिप्स ५ धावा केल्यानंतर क्रीजवर आहेत.

19:41 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: आठ षटकाच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या २ बाद ७०

आठ षटकाच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या २ बाद ७०

डेव्हॉन कॉनवे २६

ग्लेन फिलिप्स ५

19:36 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: सुंदरने न्यूझीलंडला दिले दोन धक्के

वॉशिंग्टन सुंदरने पाचव्या षटकात अप्रतिम गोलंदाजी करत दोन गडी बाद केले. त्याने प्रथम फिन ऍलन आणि डेव्हॉन कॉनवे यांची ४३ धावांची सलामी भागीदारी मोडली. ओव्हरच्या दुसऱ्या चेंडूवर सुंदरने अॅलनला सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. २३ चेंडूंत चार चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने ३५धावा करून ऍलन बाद झाला. यानंतर मार्क चॅपमन शेवटच्या चेंडूवर झेलबाद झाला. चॅपमनला खातेही उघडता आले नाही. पाच षटकांनंतर न्यूझीलंडची धावसंख्या दोन बाद ४३ अशी आहे. डेव्हॉन कॉनवे आणि ग्लेन फिलिप्स सध्या क्रीजवर आहेत.

19:31 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: न्यूझीलंड संघाला दुसरा धक्का

मार्क चॅपमॅन भोपळाही न फोडता तंबूत परतला. त्याचा वाशिंग्टनने अप्रतिम झेल पकडला.

पाच षटकाच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या २ बाद ४४

19:27 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: न्यूझीलंड संघाला पहिला धक्का

न्यूझीलंड संघाला पहिला फिन ऍलनच्या ३५(२३) रुपाने बसला.

वाशिंग्टन सुंदरने भारतीय संघाला पहिले यश मिळवून दिले

19:24 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: चार षटकाच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या बिनबाद ३६

चार षटकाच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या बिनबाद ३६

फिन ऍलन २९

डेव्हॉन कॉनवे ५

19:21 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: वाशिंग्टन सुंदरच्या षटकांत फक्त ३ धावा आल्या

तीन षटकाच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या बिनबाद २६

वाशिंग्टन सुंदरच्या षटकांत फक्त ३ धावा आल्या

फिन ऍलन १६

डेव्हॉन कॉनवे ४

19:18 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: हार्दिक पांड्यानंतर अर्शदीप सिंगचे षटकही महागात

हार्दिक पांड्यानंतर अर्शदीप सिंगचे षटकही महागात पडले. न्यूझीलंड संघाने २ षटकात एकही विकेट न देता २३ धावा केल्या आहेत. फिन ऍलन १६ आणि डेव्हॉन कॉनवे ४धावा करून खेळत आहेत. अर्शदीप सिंगच्या षटकात ११ धावा आल्या.

19:15 (IST) 27 Jan 2023
दोन षटकाच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या बिनबाद २३

दोन षटकाच्या समाप्तीनंतर न्यूझीलंडची धावसंख्या बिनबाद २३

फिन ऍलन १६

डेव्हॉन कॉनवे ४

19:08 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: फिन ऍलन आणि डेव्हॉन कॉनवेकडून न्यूझीलंडच्या डावाची शानदार सुरुवात

हार्दिक पांड्याच्या पहिल्या षटकांत न्यूझीलंडकडून १२ धावा वसूल

फिन ऍलन ११(६)

19:01 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: उमरान-अर्शदीपच्या खांद्यावर वेगवान गोलंदाजीची मदरा

पहिल्या सामन्यादरम्यान भारतीय संघाच्या वेगवान गोलंदाजीची मदारअर्शदीप सिंग आणि उमरान मलिक यांच्या खांद्यावर आहे. उमरानमध्ये ताशी १५५ किलोमीटर वेगाने गोलंदाजी करण्याची क्षमता आहे. त्याच वेळी, डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप अत्यंत घातक स्विंग गोलंदाजीसाठी ओळखला जातो.

18:57 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: दोन्ही संघांचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानात सज्ज

भारत आणि न्यूझीलंड संघांचे खेळाडू राष्ट्रगीतासाठी मैदानात आले आहेत.

18:48 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: भारत आणि न्यूझीलंड संघाची आकडेवारी

भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत एकूण २२ टी-२० सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने १०, तर किवी संघाने नऊ सामने जिंकले आहेत. तीन सामने बरोबरीत आहेत. दोन्ही संघ भारतात ८ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील टीम इंडियाने ५ वेळा, तर न्यूझीलंडने ३ सामने जिंकले. रांचीमध्ये भारत आणि न्यूझीलंड संघ एकदाच आमनेसामने आले आहेत. २०२१ मध्ये झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने ७ विकेट्सने विजय मिळवला होता.

18:43 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: पृथ्वी शॉ आणि युझवेंद्र चहल संधी मिळाली नाही

भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. पृथ्वी शॉ आणि युझवेंद्र चहल यांना आज भारतीय संघात संधी देण्यात आलेली नाही.

18:39 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: पाहा, न्यूझीलंड संघाची प्लेइंग इलेव्हन

पहिल्या टी-२० सामन्यासाठी अशी आहे प्लेइंग इलेव्हन

18:37 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: नाणेफेक जिंकून टीम इंडियाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय; पाहा दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन

भारतीय संघाची प्लेइंग इलेव्हन

18:34 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: नाणेफेक जिंकून भारतीय संघाचा प्रथम गोलंदाजीचा निर्णय

भारतीय संघाचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

18:31 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाची शानदार कामगिरी

हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारताची आतापर्यंतची कामगिरी प्रभावी आहे. त्याने ८ टी-२० सामन्यांमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले असून भारताने ६ सामने जिंकले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. एक सामना बरोबरीत संपला तर एका सामन्याचा निकाल लागला नाही. हार्दिकच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयर्लंड, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध द्विपक्षीय टी-२० मालिका जिंकल्या आहेत. मिशन २०२४ टी-२० विश्वचषक पाहता, भारतीय संघाला विजयाची मालिका कायम ठेवायची आहे.

18:24 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: भारतीय संघात पुनरागमन केल्यानंतर पृथ्वी शॉने प्रतिक्रिया दिली.

भारतीय संघाचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ खूप महिन्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे.

18:14 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: या मैदानावरील भारताचे विक्रम

JSCA क्रिकेट स्टेडियमवर आतापर्यंत ३ टी-२० सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी २ सामन्यात दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणारे संघ जिंकले आहेत. टी-२० मध्ये त्याची सरासरी धावसंख्या १५६ धावा आहे. भारताची सर्वोत्तम धावसंख्या भारताने केलेल्या १९६ धावा आहे.

18:10 (IST) 27 Jan 2023
IND vs NZ: रांची खेळपट्टीचा रिपोर्ट

झारखंडची राजधानी रांची येथे बांधण्यात आलेल्या या क्रिकेट स्टेडियममध्ये नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावते. जिथे संघांना नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करायला आवडते. खेळपट्टी गोलंदाजांना चांगली मदत करते, पण फलंदाजांनी सुरुवातीला चेंडूची लाईन आणि लेन्थ समजून खेळणे पसंत केले, तर शेवटी मोठे फटके मारून धावसंख्या मोठी उभारता येऊ शकतो.

India vs New Zealand 1st T20 Highlights Match Updates in Marathi: भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० हायलाइट्स अपडेट

India vs New Zealand 1st T20I Highlights Updates: न्यूझीलंडने २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात १७७ धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या भारतीय संघाला, निर्धारित २० षटकांत ९ बाद १५५ धावाच करता आल्या. ज्यामुळे न्यूझीलंड संघाने २१ धावांनी विजय मिळवत तीन सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली

First published on: 27-01-2023 at 17:26 IST
Next Story
‘मी त्याच्यापेक्षा चांगला खेळाडू पाहिला नाही’ Ricky Ponting बनला Suryakumar Yadav चा चाहता; सांगितली ‘ही’ मोठी गोष्ट