India vs Sri Lanka, Asia Cup 2025: आशिया चषक २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला २०३ धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेकडून पथुम निसंकाने दमदार शतकी खेळी केली. शेवटच्या षटकात तो १०७ धावांवर बाद होऊन माघारी परतला. श्रीलंकेनेही २० षटकांअखेर २०२ धावा केल्याने हा सामना बरोबरीत सुटला. त्यामुळे सामन्याचा निकाल हा सुपर ओव्हरमध्ये लागला. सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करताना श्रीलंकेला अवघ्या २ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय फलंदाजांनी पहिल्याच चेंडूवर ३ धावा घेत हा सामना जिंकला.

Live Updates

Asia Cup 2025 IND vs SL Highlights: आशिया चषकातील सुपर ४ फेरीतील शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने श्रीलंकेवर विजय मिळवला आहे. 

00:33 (IST) 27 Sep 2025

IND vs SL Live: सुपर ओव्हरमध्ये पहिल्याच चेंडूवर भारताचा विजय

या सामन्यात भारतीय संघाला सुपर ओव्हरमध्ये ३ धावा करायच्या होत्या. पहिल्याच चेंडूवर भारतीय संघाने ३ धावा करत हा सामना जिंकला.

00:25 (IST) 27 Sep 2025

India vs Srilanka Live Update: श्रीलंकेचा संघ सुपर ओव्हरमध्ये २ धावांवर ऑलआऊट

सुपर ओव्हरमध्ये फलंदाजी करताना श्रीलंकेचा संघ २ धावांवर ऑलआऊट झाला आहे. भारताला विजयासाठी ३ धावा करायच्या आहेत.

00:18 (IST) 27 Sep 2025

IND vs SL Live Updates: सुपर ओव्हरला सुरूवात

सुपर ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर कुसल परेरा झेलबाद होऊन माघारी परतला आहे.

00:13 (IST) 27 Sep 2025

India vs Srilanka Live Score: सुपर ओव्हर! भारत- श्रीलंका सामना बरोबरीत

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना बरोबरीत सुटला आहे.

00:12 (IST) 27 Sep 2025

India vs Srilanka Live: सुपर ओव्हर! भारत- श्रीलंका सामना बरोबरीत

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना बरोबरीत सुटला आहे. शेवटच्या चेंडूवर ३ धावांची गरज असताना श्रीलंकेच्या फलंदाजांनी २ धावा घेतल्या. तिसरी धाव घेण्याची संधी होती. पण श्रीलंकेच्या फलंदाजाने मागे वळून पाहिलंच नाही.

00:05 (IST) 27 Sep 2025

India vs Srilanka Live: पहिल्याच चेंडूवर पडली विकेट

श्रीलंकेला पहिल्याच चेंडूवर मोठा धक्का बसला आहे. १२ धावांची गरज असताना हर्षितच्या पहिल्याच चेंडूवर पथुम निसंका १०७ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.

00:03 (IST) 27 Sep 2025

India vs Srilanka Live Update: श्रीलंकेला जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात १२ धावांची गरज

हा सामना जिंकण्यासाठी श्रीलंकेला शेवटच्या षटकात १२ धावा करायच्या आहेत.

23:57 (IST) 26 Sep 2025

India vs Srilanka Live: श्रीलंकेला १२ चेंडूत २३ धावांची गरज

श्रीलंकेकडे इतिहासाला गवसणी घालण्याची संधी आहे. हा सामना जिंकण्यासाठी १२ चेंडूत २३ धावा करायच्या आहेत .

23:54 (IST) 26 Sep 2025

India vs Srilanka Live Score: पथुम निसंकाचं दमदार शतक! श्रीलंकेचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर

श्रीलंकेकडून धावांचा पाठलाग करताना पथुम निसंकाने ५२ चेंडूत षटकार मारून आपलं शतक पूर्ण केलं आहे. श्रीलंकेला विजयासाठी १८ चेंडूत ३३ धावांची गरज आहे.

23:51 (IST) 26 Sep 2025

India vs Srilanka Live: श्रीलंकेला जिंकण्यासाठी २० चेंडूत ४० धावांची गरज

श्रीलंकेचा संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला आहे. श्रीलंकेला जिंकण्यासाठी २० चेंडूत ४० धावांची गरज

23:43 (IST) 26 Sep 2025

India vs Srilanka Live:श्रीलंकेला तिसरा मोठा धक्का! असलंका बाद होऊन परतला माघारी

कुलदीप यादवने श्रीलंकेला तिसरा मोठा हादरा दिला आहे. असलंका बाद होऊन माघारी परतला आहे.

23:30 (IST) 26 Sep 2025

India vs Srilanka Live Score Update: वरूण चक्रवर्तीने मोडली १२७ धावांची भागीदारी! श्रीलंकेला दुसरा मोठा धक्का

या सामन्यात २०३ धावांचा पाठलाग करत असलेल्या श्रीलंकेकडून कुसल परेरा आणि पथुम निसंका यांनी १२७ धावांची भागीदारी केली. वरूण चक्रवर्तीने परेराला बाद करत ही भागीदारी मोडून काढली आहे.

23:23 (IST) 26 Sep 2025

IND vs SL Live Score: पथुम निसंकाकडून हर्षित राणाच्या षटकात धावांचा पाऊस

पथुम निसंकाने हर्षित राणाच्या ११ व्या षटकात फलंदाजी करताना १६ धावा वसूल केल्या. यासह श्रीलंकेने ११ षटकांअखेर १३० धावा केल्या आहेत.

23:08 (IST) 26 Sep 2025

India vs Srilanka Live Score: कुसल परेराचं अर्धशतक पूर्ण

पथुम निसंकाने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर आता कुसल परेराने देखील २५ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे .

23:05 (IST) 26 Sep 2025

India vs Srilanka Live Updates: पथुम निसंकाचं अर्धशतक पूर्ण

धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेकडून पथुम निसंकाने २५ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

22:54 (IST) 26 Sep 2025

IND vs SL: भारताने उभारली आशिया चषक टी-२० इतिहासातील दुसरी सर्वाेच्च धावसंख्या, अभिषेक-तिलक-संजूची बॅट तळपली

India Asia Cup T20 2nd Highest Total: भारताने आशिया चषक २०२५ मध्ये स्पर्धेतील दुसरी सर्वात मोठी धावसंख्या उभारली आहे. अभिषेक शर्मा व तिलक-संजूच्या भागीदारीच्या जोरावर भारताने ही धावसंख्या उभारली. ...अधिक वाचा
22:52 (IST) 26 Sep 2025

India vs Srilanka Live Updates: श्रीलंकेच्या ६० धावा पूर्ण

धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेला सुरूवातीलाच पहिला मोठा धक्का बसला होता. दरम्यान सुरूवातीची ५ षटकं झाल्यानंतर श्रीलंकेने ६० धावा पूर्ण केल्या आहेत.

22:27 (IST) 26 Sep 2025

IND vs SL Live Updates: भारताच्या खात्यात पहिली विकेट

हार्दिक पंड्याच्या पहिल्याच षटकात भारताला पहिली विकेट मिळाली आहे. पंड्याच्या षटकातील चौथ्या चेंडूवर पथुम निसांका खातंही न उघडता माघारी परतला. शुबमन गिलने कमालीचा झेल टिपला.

22:01 (IST) 26 Sep 2025

India vs Srilanka Live Score: भारतीय संघाने आशिया कप 2025मध्ये उभारली सर्वोच्च धावसंख्या; शर्मा-वर्मा जोडीची दमदार खेळी

या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाने २०२ धावांचा डोंगर उभारला आहे. ही या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आहे.

21:37 (IST) 26 Sep 2025

India vs SL Live: भारताचा निम्मा संघ तंबूत! संजू पाठोपाठ हार्दिक परतला माघारी

संजू सॅमसन बाद झाल्यानंतर भारतीय संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. हार्दिक पंड्या २ धावांवर माघारी परतला आहे.

21:32 (IST) 26 Sep 2025

India vs Srilanka Live Updates: भारताचे टॉप ४ फलंदाज तंबूत! संजू सॅमसन बाद होऊन परतला माघारी

भारतीय संघाला चौथा मोठा धक्का बसला आहे. तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांची जोडी जमलेली असताना संजू सॅमसन ३९ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.

21:21 (IST) 26 Sep 2025

IND vs SL Live: संजू सॅमसन- तिलक वर्माची जोडी जमली

भारतीय संघाला सुरूवातीला ३ मोठे धक्के बसले. पण संजू सॅमसन आणि तिलक वर्माने मिळून डाव सांभाळला आहे.

21:18 (IST) 26 Sep 2025

IND vs SL: एक नंबर! शुबमन गिलला बाद करण्यासाठी महिश तीक्ष्णाने डाईव्ह मारत घेतला भन्नाट कॅच; पाहा Video

Asia Cup 2025, Maheesh Theekshana Catch: भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात शुबमन गिलला बाद करण्यासाठी महिश तीक्ष्णाने भन्नाट झेल घेतला आहे. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे. ...सविस्तर बातमी
21:08 (IST) 26 Sep 2025

India vs Srilanka Live Updates: भारतीय संघाच्या १०० धावा पूर्ण

भारतीय संघाने १० षटकात १०० धावांचा पल्ला गाठला आहे. संजू सॅमसन आणि तिलक वर्माची जोडी मैदानावर आहे.

20:59 (IST) 26 Sep 2025

India vs Srilanka Live Score: भारतीय संघाला तिसरा मोठा धक्का! अर्धशतक झळकावल्यानंतर अभिषेक शर्मा बाद

भारतीय संघाला तिसरा मोठा धक्का बसला आहे. अभिषेक शर्मा ६१ धावांवर बाद होऊन माघारी परतला आहे.

20:48 (IST) 26 Sep 2025

India vs Srilanka Live Updates: कर्णधार सूर्या पुन्हा फेल

भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव पुन्हा फ्लॉप ठरला आहे. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात तो अवघ्या १२ धावांवर माघारी परतला आहे.

20:45 (IST) 26 Sep 2025

IND vs SL Live Score: अभिषेक शर्माचं अर्धशतक पूर्ण

अभिषेक शर्माने गेल्या २ सामन्यातील कामगिरी या सामन्यातही सुरु ठेवली आहे. श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात त्याने २२ चेंडूत आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे.

20:30 (IST) 26 Sep 2025

India vs Srilanka Live Score: भारतीय संघाच्या ५० धावा पूर्ण

भारतीय संघाला दुसऱ्या षटकात मोठा धक्का बसला. गिल बाद होऊन माघारी परतला. पण अभिषेकने फटकेबाजी सुरू ठेवली आहे. भारतीय संघाने ४.३ षटकात ५० धावा पूर्ण केल्या आहेत.

20:13 (IST) 26 Sep 2025

India vs Srilanka Live Score: भारतीय संघाला पहिला धक्क! दुसऱ्या षटकात शुबमन गिलची पडली विकेट

भारतीय संघाला दुसऱ्याच षटकात मोठा धक्का बसला आहे. शुबमन गिल अवघ्या ४ धावा करत माघारी परतला आहे.

19:40 (IST) 26 Sep 2025
IND vs SL Live Score: या सामन्यात अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

भारत (Playing XI): अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, हर्षित राणा, कुलदीप यादव, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती

श्रीलंका (Playing XI): पथुम निसंका, कुसल मेंडिस (यष्टीरक्षक), कुसल परेरा, चरीथ असलंका (कर्णधार), जानिथ लियानागे, कमिंदू मेंडिस, दसन शनाका, वानिंदू हसरंगा, दुश्मंथा चमीरा, माहेश थिक्षना, नुवान तुषारा

ind vs sl

आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सुपर -४ फेरीतील शेवटचा सामना भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पार पडला. (फोटो- जनसत्ता)