India vs West Indies Day 2 Live Score: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचा थरार दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर सुरू आहे. या सामन्यातील सुरुवातीच्या दोन्ही दिवशी भारतीय फलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. भारतीय संघाने पहिला डाव ५ गडी बाद ५१८ धावांवर घोषित केला. दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत वेस्टइंडिजला ४ गडी बाद १४० धावा करता आल्या होत्या. आता तिसऱ्या दिवशी वेस्ट इंडिजचा संघ मोठी धावसंख्या उभारण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

वेस्ट इंडिजची पिछाडी शंभरच्या आत

फॉलोऑन मिळाल्यानंतर वेस्ट इंडिजने चिवटपणे प्रतिकार करत पिछाडी भरून काढली. जॉन कॅम्पबेल आणि शे होप यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा कॅम्पबेल ८७ तर होप ६६ धावांवर खेळत आहेत. वेस्ट इंडिजचा संघ अजूनही ९७ धावांनी पिछाडीवर आहे.

कॅम्पबेल-होपची शतकी भागीदारी

फॉलोऑनची नामुष्की ओढवलेल्या वेस्ट इंडिजने दुसऱ्या डावात चिवट झुंज दिली आहे. जॉन कॅम्पबेल आणि शे होप यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी साकारत वेस्ट इंडिजच्या डावाला आकार दिला.

वेस्ट इंडिजने ओलांडला शंभरीचा टप्पा

पहिल्या डावात घसरगुंडी उडालेल्या वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्या डावात भारतीय फिरकीपटूंचा तुलनेने चांगला सामना करत शंभर धावांचा टप्पा ओलांडला आहे. कॅम्पबेलच्या अर्धशतकाच्या बळावर वेस्ट इंडिजने शंभरी पार केली आहे.

वॉशिंग्टनने केलं अथेन्झला त्रिफळाचीत

वॉशिंग्टन सुंदरच्या फिरकीविरुद्ध अॅलिक अथेन्झ त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. चहापानासाठी खेळ थांबला तेव्हा वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात ३५/२ धावा झाल्या आहेत.

शुबमन गिलचा अफलातून झेल, तेजनारायण चंद्रपॉल तंबूत

फॉलोऑनची नामुष्की ओढवलेल्या वेस्ट इंडिज संघाने दुसऱ्या डावातही विकेट गमवायला सुरुवात केली आहे. मोहम्मद सिराजच्या उसळत्या चेंडूवर पूल करण्याचा तेजनारायण चंद्रपॉलचा प्रयत्न फसला. कर्णधार शुबमन गिलने धावत जाऊन सुरेख झिल टिपला.

कुलदीप यादवचा ‘पंच’, भारताने वेस्ट इंडिजला दिला फॉलोऑन

भारतीय फलंदाजांनी दमदार फलंदाजी केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी वेस्ट इंडिजचा डाव संपुष्टात आणला आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना कुलदीप यादवने सर्वाधिक ५ गडी बाद केले आहेत. वेस्ट इंडिजचा डाव २४८ धावांवर आटोपला आहे.

लंचब्रेक

वेस्ट इंडिजने लंचपर्यंत ८ गडी बाद २१७ धावा केल्या आहेत.

वेस्ट इंडिजचे ८ फलंदाज तंबूत! फॉलोऑन टाळण्यासाठी अजूनही इतक्या धावांची गरज

मोहम्मद सिराजने वेस्ट इंडिजला ८ वा धक्का दिला आहे. वेस्ट इंडिजला फॉलोऑन टाळण्यासाठी अजूनही १४३ धावांची गरज आहे.

वेस्ट इंडिजचा निम्मा संघ तंबूत! टीम इंडियाची सामन्यावर मजबूत पकड

वेस्ट इंडिजला पाचवा धक्का बसला आहे. कर्णधार शे होपला कुलदीप यादवने त्रिफळाचित करत माघारी धाडलं आहे. तो अवघ्या ३६ धावा करत माघारी परतला.

वेस्ट इंडिजला सहावा मोठा धक्का

वेस्ट इंडिजला तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीलाच मोठा धक्का बसला आहे. कुलदीप यादवने इमलाकला पायचित करत माघारी धाडलं आहे. तो २१ धावा करत माघारी परतला. वेस्टइंडिजला ६ गडी बाद १६३ धावा करता आल्या आहेत.