India vs England ICC Cricket World Cup 2023 Match Updates:लखनऊच्या एकना स्टेडियमवर रविवारी (२९ ऑक्टोबर) भारताने इंग्लंडविरुद्ध संस्मरणीय विजय मिळवला. त्यांनी २० वर्षांनंतर विश्वचषकात इंग्लंडचा पराभव केला. टीम इंडियाने २००३ मध्ये त्याच्याविरुद्ध शेवटचा विजय मिळवला होता. त्यानंतर २०११ मध्ये बंगळुरूमध्ये दोन्ही संघांमधील सामना बरोबरीत सुटला होता. त्याच वेळी, २०१९ मध्ये भारतीय संघ बर्मिंगहॅममध्ये पराभूत झाला. या सामन्यानंतर भारताचे माजी खेळाडू संजय मांजरेकर यांनी टीम इंडियाच्या विश्वचषक जिंकण्याबाबत मोठे विधान केले आहे.

इंग्लंडवर १०० धावांनी दणदणीत विजय मिळवल्यानंतर संजय मांजरेकर यांनी टीम इंडिया आणि इतर संघातील फरक काय आहे, ते समजून सांगितला आहे. मांजरेकर म्हणाले, “भारतीय संघ आणि इतर संघामध्ये खूप अंतर आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात टीम इंडियाने क्रिकेट एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे. भारताची फलंदाजी ही इतर संघापेक्षा एक खूप आक्रमक आहे. ज्या पद्धतीने टीम इंडियाची गोलंदाजी आहे त्यातून एक कळते की, दव असो या कमी धावसंख्या रोखायची असो, एक सक्षम गोलंदाजीचा ताफा रोहितकडे आहे. मोहम्मद शमी म्हणजे भारताची जुनी फरारी आहे, तिला कधीही गॅरेज ती तिचं काम करणारच. आज पहिल्यांदाच भारताने या विश्वचषकात धावांचे रक्षण केले. त्यामुळे मी टीम इंडिया २०११च्या विश्वचषकाची पुनरावृत्ती करणार, असे वाटत आहे.”

Delhi beat Gujarat by 4 runs Shubman Gill reacts to defeat
DC vs GT : दिल्लीविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार शुबमन गिल संतापला, ‘या’ खेळाडूला धरले जबाबदार
IPL 2024 Punjab Kings vs Mumbai Indians Match Updates in Marathi
IPL 2024: आशुतोष शर्माची आयपीएलमध्ये ऐतिहासिक कामगिरी, १७ वर्षांच्या इतिहासात ही कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय खेळाडू
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Shubman Gill Angry At Third Umpire's Decision
RR vs GT : तिसऱ्या पंचांच्या ‘त्या’ निर्णयानंतर शुबमन गिल मैदानावरील पंचांवर संतापला, VIDEO होतोय व्हायरल

या विजयासह भारताचे दोन गुण झाले आहेत. त्याचे आता सहा सामन्यांत १२ गुण झाले आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला पहिल्या स्थानावरून दूर केले. दुसरीकडे, इंग्लंडचे सहा सामन्यांतून केवळ दोन गुण आहेत. त्यांना पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. गतविजेता संघ आता विश्वचषकातून बाहेर होण्याच्या मार्गावर आहे. गुणतालिकेत तो तळाच्या १०व्या स्थानावर आहे.

हेही वाचा: IND vs ENG: टीम इंडियाचा विजयी षटकार अन् गतविजेते बाहेर! भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे इंग्लंड चारीमुंड्या चीत, १०० धावांनी शानदार विजय

इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने ५० षटकांत नऊ गडी गमावून २२९ धावा केल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडचा डाव ३४.५ षटकांत १२९ धावांत गारद झाला. भारताच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडच्या फलंदाजांना टिकू दिले नाही. न्यूझीलंडविरुद्ध पाच विकेट्स घेणाऱ्या मोहम्मद शमीने या सामन्यातही घातक गोलंदाजी करत चार विकेट्स आपल्या नावावर केल्या. अनुभवी जसप्रीत बुमराहने तीन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादवला दोन आणि रवींद्र जडेजाला एक यश मिळाले.

इंग्लंडच्या तीन फलंदाजांना खातेही उघडता आले नाही

भारतीय गोलंदाजांनी सातत्याने विकेट घेत इंग्लंडला दडपणाखाली ठेवले. जो रूट आणि बेन स्टोक्स या दिग्गजांशिवाय मार्क वुडलाही खाते उघडता आले नाही. इंग्लंडसाठी लियाम लिव्हिंगस्टोन हा एकमेव फलंदाज होता ज्याने २० धावांचा टप्पा ओलांडला. त्याने सर्वाधिक २७ धावा केल्या. डेव्हिड मलानने १६, डेव्हिड विलीने नाबाद १६, मोईन अलीने १५, जॉनी बेअरस्टोने १४, आदिल रशीदने १३, जोस बटलर आणि ख्रिस वोक्सने प्रत्येकी १०-१० धावा केल्या.

हेही वाचा: IND vs ENG: कोहली शून्यावर बाद झाल्यानंतर इंग्लंडच्या बार्मी आर्मीने केले ट्रोल, भारतीय चाहत्यांनी दिले चोख प्रत्युत्तर

भारताचा विश्वचषकातील ५९वा विजय

विश्वचषकात भारताचा हा एकूण ५९वा विजय आहे. या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वाधिक विजयांच्या बाबतीत त्याने न्यूझीलंडला मागे सोडले. न्यूझीलंडने ५८ सामने जिंकले आहेत. आता फक्त ऑस्ट्रेलिया भारताच्या पुढे आहे. त्याने ७३ सामने जिंकले आहेत.इंग्लंडने लज्जास्पद विक्रम केला. इंग्लंड संघाने विश्वचषकाच्या इतिहासात एक लाजिरवाणा विक्रम केला आहे. विश्वचषकात पहिल्यांदाच सलग चार सामने हरले आहेत. दुसऱ्यांदा गतविजेता संघ विश्वचषकात सलग चार सामने हरला आहे. इंग्लंडपूर्वी ऑस्ट्रेलियाने १९९२ मध्ये सलग चार सामने गमावले होते. १९८७ मध्ये विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांनी गतविजेते म्हणून प्रवेश केला होता.

भारतीय गोलंदाजांनी सहा फलंदाजांना बाद केले

या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. त्याने इंग्लंडच्या सहा फलंदाजांना क्लीन बोल्ड केले. टीम इंडियाने यापूर्वी १९९६ मध्ये शारजाहमध्ये श्रीलंकेच्या सहा फलंदाजांना आणि १९९३ मध्ये कोलकात्यात वेस्ट इंडिजच्या सहा फलंदाजांना क्लीन बॉलिंग केले होते.