चेन्नईचा फिरकीपटू इम्रान ताहीरने आयपीएलच्या बाराव्या हंगामात अनोखा विक्रम आपल्या नावे जमा केला आहे. मुंबईविरुद्धच्या अंतिम सामन्याच ताहीरने भेदक मारा करत मुंबईच्या धावगतीवर अंकुश लावला. पहिल्यांदा गोलंदाजी करताना ताहीरने मुंबईच्या दोन फलंदाजांना माघारी धाडलं. या कामगिरीसह ताहीर एका आयपीएल हंगामात सर्वाधिक बळी घेणारा फिरकीपटू ठरला आहे. ताहीरने इशान किशन आणि सूर्यकुमार यादवचा बळी घेतला.

अवश्य वाचा – IPL 2019 Final : कार्तिकला मागे टाकत महेंद्रसिंह धोनी सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक

इम्रान ताहीरने हरभजन सिंह आणि सुनील नरीन यांच्या नावावर संयुक्तरित्या असलेल्या २४ बळींचा विक्रम मोडला.

आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक बळी घेणारे फिरकीपटू पुढीलप्रमाणे –

इम्रान ताहीर – २६ बळी (२०१९)

सुनील नरीन/हरभजन सिंह – २४ बळी (२०१३)

युजवेंद्र चहल – २३ बळी (२०१५)

सुनील नरीन – २२ बळी (२०१३)

दरम्यान आक्रमक सुरुवातीनंतर मुंबईचा डाव पुरता कोलमडला. मधल्या फळीत हार्दिक पांड्या आणि पोलार्डने केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर १४९ धावांपर्यंत मजल मारली.