आयपीएल २०२१ स्पर्धेतील प्लेऑफमध्ये चेन्नई, दिल्ली आणि बंगळुरू या तीन संघांनी स्थान मिळवलं आहे. तर चौथ्या स्थानासाठी मुंबई, कोलकाता, पंजाब आणि राजस्थान या चार संघात चुरस आहे. त्यामुळे या संघांची जर तरची लढाई सुरु आहे. मुंबई इंडियन्सने मंगळवारी राजस्थान रॉयल्सला ८ गडी राखून मात दिली आणि प्लेऑफमधील आशा कायम ठेवल्या आहे. या सामन्या नाथन कूल्टर नाइल, जीमी नीशम, जसप्रीत बुमरा आणि इशान किशनने चांगली कामगिरी केली. इशान किशनने २५ चेंडूत अर्धशतक झळकावलं. तसेच मुंबईला ७० चेंडू आणि ८ गडी राखून विजय मिळवून दिला.

मुंबईच्या विजयी कामगिरीनंतर संघ व्यवस्थापनाने इशान किशन सहित तीन खेळाडूंचा ड्रेसिंग रुममध्ये प्लेअर ऑफ द मॅच किताब देऊन सन्मान केला. भारताचा माजी क्रिकेटपटून मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने इशानच्या जर्सीवर बॅज लावला. इशान व्यतिरिक्त वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि जीमी नीशम यांचा प्लेअर ऑफ मॅच म्हणून गौरव करण्यात आला.

“हा एक चांगला सामना होता. आमच्या संघासाठी हा विजय महत्त्वाचा होता. या सामन्यातील चांगल्या कामगिरीमुळे आत्मविश्वास दुणावला आहे. त्यामुळे पुढच्या सामन्यात याचा नक्कीच फायदा होईल”, असं इशान किशनने सांगितलं. तर बुमरानेही मिळालेल्या सन्मानाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. “या विजयामुळे मी खूश आहे. एका वेळी एक सामना पुढे घेत जाऊया. आपण काय नियंत्रित करू शकतो यावर लक्ष केंद्रित करु शकतो आणि चांगल्यासाठी प्रयत्नशील राहतो’, असं जसप्रीत बुमराने सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई

  • मुंबईने त्यांच्या अंतिम सामन्यात हैदराबादला पराभूत केलं तर स्पर्धेत टिकून राहण्यासाठी केकेआरला शेवटचा सामना जिंकावाच लागेल.
  • मुंबई सध्या पाचव्या स्थानी आहे. मात्र नेट रनरेटच्या बाबतीत ते केकेआरपेक्षा फारच मागे आहेत. दोन्ही संघांमधील नेट रनरेटचं अंतर फारच जास्त असल्याने त्यांना केकेआरच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागणार आहे.
  • एका अंदाजानुसार सध्या केकेआर आणि मुंबईमधील नेट रनरेटचं अंतर भरुन काढण्यासाठी मुंबईला हैदराबादविरुद्धचा सामना ११ षटकं शिल्लक असतानाच किंवा ९० हून अधिक धावांच्या फरकाने जिंकावा लागणार आहे.
  • अर्थात स्वत:चा शेवटचा सामना जास्तीत जास्त मोठ्या फरकाने जिंकण्यासोबतच त्यांना राजस्थान केकेआरला पराभूत करेल यासाठी देव पाण्यात ठेवावे लागणार आहेत. असं झालं तरच मुंबईला प्लेऑफमध्ये खेळता येईल.
  • मात्र केकेआरने त्यांचा अंतिम सामना जिंकला तर मुंबई आणि केकेआरचे गुण समान होतील पण नेट रनरेटच्या जोरावर केकेआर प्लेऑफमध्ये जाईल.