scorecardresearch

Premium

IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सची मोठी अपडेट, आगामी आयपीएलमध्ये ऋषभ पंत खेळणार ‘या’ स्वरुपात; जाणून घ्या

IPL 2024 on Rishabh Pant: आयपीएल लिलावापूर्वी ऋषभ पंतबाबत एक मोठी अपडेट समोर आले आहे. एका रिपोर्टनुसार, पंत आयपीएल २०२४ मध्ये खेळताना दिसणार आहे.

Big update regarding Rishabh Pant he will enter the field as an impact player in IPL 2024
आयपीएल लिलावापूर्वी ऋषभ पंतबाबत एक मोठी अपडेट समोर आले आहे. सौजन्य- (ट्वीटर)

IPL 2024 on Rishabh Pant: भारतीय संघ आणि दिल्ली कॅपिटल्सचा स्टार यष्टीरक्षक ऋषभ पंत गेल्या अनेक महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. दरम्यान, आयपीएल लिलावापूर्वी त्याच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रेव्ह स्पोर्टच्या रिपोर्टनुसार, दिल्ली कॅपिटल्स आगामी आयपीएलमध्ये ऋषभ पंतचे स्वागत करण्याच्या तयारीत आहे. मात्र, त्याच्या संपूर्ण आयपीएल खेळण्याबद्दल शंका आहेत. त्याचे पुनरागमन कसे करायचे? यावर फ्रँचायझीने एक तोडगा काढला आहे. दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी त्याचा एक प्रभावशाली खेळाडू म्हणजेच इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापर करण्याचा विचार करीत आहे.

दिल्ली कॅपिटल्सच्या सूत्रांनी रेव्हस्पोर्टला सांगितले की, “आम्हाला ऋषभ पंतच्या पुनरागमनाची अपेक्षा असून ड्रेसिंग रूममध्ये पुन्हा त्याच्यासारखा कर्णधार असणे हे संघाच्या हिताचे आहे.” सूत्रांनी पुष्टी केली आहे की फ्रँचायझी ऋषभ पंतबाबत घाई करू इच्छित नाही. दिल्ली कॅपिटल्स ऋषभ पंतच्या रिकव्हरीसाठी पूर्ण प्रयत्न करू इच्छित आहे आणि बहुतेक सामन्यांमध्ये त्याचा प्रभावशाली खेळाडू म्हणून वापर करण्याचा विचार करत आहे.

team india kl rahul bcci
IND Vs ENG : केएल राहुल पाचव्या कसोटीलाही मुकणार, संघात दिग्गज खेळाडूचं पुनरागमन; अशी असेल टीम इंडिया
Performance of Pankaj Mohit from Wadala slum in Pro Kabaddi League mumbai
प्रो कबड्डी लीग मध्ये वडाळ्याच्या झोपडपट्टीतील पंकज मोहितेची कामगिरी; पुणेरी पलटणचा आधारस्तंभ
KL Rahul IPL 2024 Shoot Video Viral
VIDEO : ‘हे कोण लिहितंय…’, आयपीएल शूटमध्ये केएल राहुलचा संयम सुटला, स्क्रिप्टवरुन कर्मचाऱ्यावर संतापला
england cricketer dan lawrence
Ind vs Eng: सहकारी श्रमपरिहारात दंग, हा मूनलायटिंगमध्ये सक्रिय

ऋषभ पंत सध्या यष्टीरक्षक म्हणून खेळण्यास तयार नाही. तो यष्टिरक्षण करण्यास सक्षम आहे की नाही हे त्याच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. या बातमीतून समोर येणारी मोठी अपडेट म्हणजे दिल्ली कॅपिटल्स पंतला प्रभावशाली खेळाडू म्हणून वापरण्याचा आग्रह धरणार आहे. यात ते कितपत यशस्वी ठरतात हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.

ऋषभ पंत २०२२ सालापासून क्रिकेटच्या मैदानात उतरलेला नाही

२०२२ मध्ये, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत कार अपघाताचा बळी ठरला, ज्यामुळे त्याला क्रिकेटच्या मैदानापासून दूर राहावे लागले. २०२२ मध्ये एका अपघातात पंतला गंभीर दुखापत झाली होती, त्यानंतर मुंबईत त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि गेल्या काही महिन्यांपासून तो पुनरागमन करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. आता तो केव्हा पुनरागमन करू शकेल आणि पुनरागमन केल्यास तो पूर्ण तंदुरुस्त असेल की नाही हे येणाऱ्या काळातच समजणार आहे.

हेही वाचा: AUS vs PAK: ट्रॅविस हेडच्या नव्या निर्णयाने ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली; म्हणाला, “कसोटीत सलामीवीर होण्यास…”

ऋषभ पंतची कारकीर्द अशी आहे

जर ऋषभ पंतच्या कारकिर्दीवर नजर टाकली तर त्याने ३३ कसोटी सामन्यांव्यतिरिक्त ३० वन डे आणि ६६ टी-२० सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. याशिवाय ऋषभ पंतने आयपीएलमध्ये ९८ सामने खेळले आहेत. ऋषभ पंतने ३३ कसोटी सामन्यात ४३.६७च्या सरासरीने २२७१ धावा केल्या आहेत. तर ३० एकदिवसीय सामन्यांमध्ये ऋषभ पंतने ३४.६च्या सरासरीने ८६५ धावा केल्या आहेत. त्याच वेळी, ऋषभ पंतने भारतासाठी ६६ टी-२० सामन्यांमध्ये ३४.६१च्या सरासरीने ९८७ धावा केल्या आहेत. ऋषभ पंतने कसोटी सामन्यात ५ शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने वन डे फॉरमॅटमध्ये एकदा शतकाचा टप्पा ओलांडला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2024 big update on rishabh pant delhi capitals team will get this responsibility in upcoming ipl avw

First published on: 11-12-2023 at 18:17 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×