Chennai Super Kings vs Punjab Kings IPL Latest Score Update: रविवारी (दि. ३० एप्रिल) क्रिकेटप्रेमींना डबल हेडर सामन्याचा आनंद लुटता येणार आहे. आयपीएल २०२३च्या ४१व्या सामन्यात आज चेन्नई सुपर किंग्जचा सामना पंजाब किंग्जशी होत आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला जात असून पंजाबविरुद्ध चेन्नई संघाचा यापूर्वीचा विक्रम चांगला राहिला नाही. अशा स्थितीत धोनीचा संघ पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. चेन्नईच्या चेपॉक मैदानावर आज दोन किंग्समध्ये जबरदस्त सामना होत असून चेन्नईने पंजाबसमोर २०१ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. सीएसकेने पंजाबविरुद्धचे मागील तीनही सामने गमावले आहेत.

चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईची सुरुवात शानदार झाली ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे यांच्यात ८६ धावांची भक्कम भागीदारी झाली जी सिकंदर रझाने तोडली. चेन्नईच्या डावाची १० षटके संपण्याआधी त्यांनी ही भागीदारी केली होती. त्यावर चेन्नईसाठी धोनीने शेवटच्या दोन चेंडूत दोन षटकार मारून संघाची धावसंख्या चार विकेट्सवर २०० धावांपर्यंत पोहोचवली. चेन्नईकडून डेव्हॉन कॉनवेने सर्वाधिक नाबाद ९२ धावा केल्या. ऋतुराज गायकवाडने ३७ आणि शिवम दुबेने २८ धावा केल्या. पंजाबकडून अर्शदीप सिंग, सॅम करन, राहुल चहर आणि सिकंदर रझा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

चेन्नईच्या एम.ए. चिदंबरम स्टेडिअम येथील या सामन्यात पंजाब किंग्स संघात एक बदल आहे. तो बदल म्हणजेच हरप्रीत सिंग भाटिया याला ताफ्यात सामील करण्यात आले आहे. चेन्नई आणि पंजाब संघ एकूण २७ वेळा आमनेसामने आले आहेत. यातील १५ सामने चेन्नईने तर १२ सामने पंजाबने जिंकले आहेत. चेपॉकमध्ये दोन्ही संघ सहा वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी चार सामने चेन्नईने तर दोन सामने पंजाबने जिंकले आहेत. या दोघांमधील गेल्या पाच सामन्यांपैकी पंजाबने शेवटच्या तीन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्याचवेळी चेन्नईने त्यापूर्वी दोन सामने जिंकले होते.

हेही वाचा: Ritika Sajdeh: “तू माझ्या नवऱ्याला चोरलस आणि…”, रोहित शर्माच्या वाढदिवसाच्या दिवशी हे काय बोलली रितिका

दोन्ही संघ खालीलप्रमाणे आहेत

चेन्नई सुपर किंग्ज: डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू, रवींद्र जडेजा, मोईन अली, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/यष्टीरक्षक), तुषार देशपांडे, महिष टेकशाना, मथिशा पाथिराना.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंजाब किंग्स: शिखर धवन (कर्णधार), अथर्व तायडे, लियाम लिव्हिंगस्टोन, सिकंदर रझा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम करण, शाहरुख खान, हरप्रीत ब्रार, कागिसो रबाडा, राहुल चहर, अर्शदीप सिंग.