Delhi chance to break Punjab’s record : आयपीएल २०२४ चा नववा सामना राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर दोन्ही संघ आमनेसामने आहेत. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्ली कॅपिटल्ससाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. दिल्लीचा संघ मोसमातील पहिल्या विजयाच्या शोधात आहे. त्याच वेळी, दिल्लीला विशेष यादीत पंजाब किंग्ज संघाला मागे टाकण्याची संधी आहे.

दिल्लीने नाणेफेक जिंकून गोलंदाजी निवडली –

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. दुखापतीमुळे गेल्या सामन्यातून बाहेर असलेला इशांत शर्मा या सामन्यात दिसणार नाही. त्याचवेळी शाई होपला पाठीच्या समस्येनेही ग्रासले आहे. त्यामुळे या दोघांच्या जागी मुकेश कुमार आणि ॲनरिक नॉर्टजे यांना संधी मिळाली आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स संघात कोणताही बदल न करता खेळायला उतरली. तसेच आजचा सामना ऋषभ पंतचा १००वा आयपीएल सामना आहे.

दिल्ली कॅपिटल्स इतिहास रचण्याच्या जवळ –

आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सने आतापर्यंत २३९ सामने खेळले आहेत. या कालावधीत दिल्ली कॅपिटल्सने १०५ सामने जिंकले असून १२८ सामने गमावले आहेत. पंजाब किंग्जनेही आतापर्यंत १०५ सामने जिंकले आहेत. अशा परिस्थितीत, जर दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा पराभव केला, तर आयपीएलमध्ये १०५ हून अधिक सामने जिंकणारा तो ५ वा संघ ठरेल.

हेही वाचा – IPL 2024 : हेनरिचला ‘क्लास’ खेळीसाठी सनरायझर्स हैदराबादकडून मिळाले खास ‘गिफ्ट’, PHOTO होतोय व्हायरल

आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारे संघ –

मुंबई इंडियन्स – १३८ विजय
चेन्नई सुपर किंग्ज – १३३ विजय
कोलकाता नाईट रायडर्स – १२० विजय
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु – ११५ विजय
पंजाब किंग्ज -१०५ विजय
दिल्ली कॅपिटल्स – १०५ विजय

दोन्ही संघाची प्लेइंग इलेव्हन –

दिल्ली कॅपिटल्स: डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, रिकी भुई, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, सुमित कुमार, कुलदीप यादव, एनरिक नॉर्टजे, खलील अहमद, मुकेश कुमार.

हेही वाचा – IPL 2024 : हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर हार्दिक पंड्याने दिली प्रतिक्रिया, सांगितले मुंबईच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, शिमरॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, युजवेंद्र चहल, संदीप शर्मा, आवेश खान.