Fast bowler Jofra Archer has joined Mumbai Indians: इंडियन प्रीमियर लीग २०२३ या स्पर्धेला ३१ मार्चपासून सुरूवात होत आहे. या प्रसिद्ध लीगची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी मुंबई इंडियन्स फ्रँचायझीच्या संघात एक धडाकेबाज गोलंदाजाची एंट्री झाली आहे. तो दुसरा तिसरा कोणी नसून इंग्लंडचा घातक वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आहे. ज्याचे संघात जोरदार स्वागत झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जोफ्रा आर्चरची संघातील उपस्थिती मुंबईच्या चाहत्यांसाठी दिलासा देणारी आहे. आर्चर रविवारी संघात सामील झाला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर आयपीएल २०२० नंतर पुनरागमन करत आहे. शेवटच्या वेळी तो आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खेळला होता. पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करून जोफ्रा आर्चरच्या संघात सामील झाल्याची पुष्टी केली.

फ्रेंचायझीने मुंबई इंडियन्सची जर्सी घातलेल्या जोफ्रा आर्चरचा फोटो शेअर केला आहे. या फोटोत तो पाठ दाखवत आहे. मुंबई इंडियन्सने या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ‘कोण आला रे.’ हा फोटो फोटो पाहून मुंबई इंडियन्सचे सर्व चाहतेही खूप उत्साहित झाले आहेत. जोफ्रा संघातील टीम डेव्हिडने या फोटोवर टिप्पणी केली, ‘जोफ टाइम.’

आर्चर आगामी मोसमात मुंबई इंडियन्सकडून प्रथमच खेळताना दिसणार आहे. आर्चर मागील सीझन खेळणार नाही, हे जाणून देखील मुंबईने इंग्लंडचा स्टार गोलंदाजाला भरघोस रकमेत विकत घेतले होते. दुखापतीमुळे तो आयपीएल २०२२ मध्ये खेळू शकला नाही. आर्चरला मुंबई इंडियन्सने ८ कोटींना विकत घेतले. आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सची कामगिरी गेल्या मोसमात खूपच वाईट होता. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघ गुणतालिकेत १०व्या स्थानावर राहिला होता.

आयपीएल २०२२ मध्ये, मुंबई इंडियन्स संघाने सुरुवातीचे सलग ८ सामने गमावले होते. गोलंदाजीसोबतच फलंदाजीतही संघ कमकुवत दिसत होता. यंदा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार नसल्याने आयपीएलच्या आगामी हंगामात संघाच्या अडचणी वाढणार आहेत. परंतु जोफ्रा आर्चरच्या येण्याने मुंबई इंडियन्स संघाला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. बुमराहच्या गैरहजेरीत वेगवान गोलंदाजीची कमान जोफ्राच्या खांद्यावर असणार आहे.

हेही वाचा – IPL 2023: डेव्हिड वॉर्नरने शेअर केलेल्या डान्सच्या VIDEO वर पत्नी कँडीने विचारला मजेशीर प्रश्न; म्हणाली, ‘तू माझ्यासाठी…’

मुंबई इंडियन्स संघ –

कॅमेरॉन ग्रीन, रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन, टीम डेव्हिड, सूर्यकुमार यादव, जोफ्रा आर्चर, डेवाल्ड ब्रेविस, टिळक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, पियुष चावला, अर्जुन तेंडुलकर, रमणदीप सिंग, शम्स मुलानी, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकेन, आकाश मधवाल, अर्शद खान, राघव गोयल, डुआन यान्सन, ट्रिस्टन स्ट्रब्स आणि विष्णू विनोद

मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fast bowler jofra archer has joined mumbai indians for the ipl 2023 season vbm
First published on: 26-03-2023 at 19:37 IST