IPL 2024, GT vs MI Team Predicted Playing 11, Players List, Pitch Report Updates: आयपीएलचे ५ वेळा जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्सचा संघ गुजरात टायटन्सविरूध्द अहमदाबादमध्ये आपला पहिला सामना खेळणार आहे. वनडे विश्वचषकानंतर क्रिकेट मैदानावर उतरणाऱ्या हार्दिक पांड्यावर सर्वांच्या नजरा असतील. यासोबतच पांड्या मुंबई संघाचे नेतृत्त्व करतानाही दिसणार आहे. तर गुजरात टायटन्सची धुरा शुबमन गिलच्या खांद्यावर असेल.

दोन्ही संघ नवीन कर्णधारांसह यंदाच्या हंगामात उतरणार आहेत. पहिल्याच सामन्यात विजय मिळवत मोहिमेची सुरूवात विजयाने करण्यावर दोन्ही संघाचे लक्ष असेल. हार्दिक पांड्यावर रोहितप्रमाणेच मुंबईचे नेतृत्त्व करण्याची मोठी जबाबदारी पार पाडायची आहे, हार्दिकला अनुभव असला तरी हे मोठे आव्हानच असणार आहे. तर शुबमन गिलला सुध्दा गुजरातच्या माजी कर्णधाराने जसे यश मिळवले होते त्याचप्रमाणे कामगिरी करण्याची जबाबदारी असणार आहे.

IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals today match sport news
दिल्लीची आज गुजरातशी गाठ
Mumbai Indians Kieron Pollard and Tim David Fined 20 Percent Match Fees for Breaching IPL Code of Conduct
IPL 2024: पोलार्ड आणि टीम डेव्हिडवर आयपीएलकडून कारवाई, मुंबई-पंजाबमधील लाईव्ह सामन्यातील ‘ही’ चूक पडली महागात
rohit sharma virat kohli
ipl 2024, MI vs RCB: इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट: सलग दुसऱ्या विजयाचे लक्ष्य! मुंबई इंडियन्ससमोर आज वानखेडेवर रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुचे आव्हान
Today Mumbai Indians vs Delhi Capitals match in Indian Premier League IPL MI VS DC 2024 sport news
Ipl match, DC vs MI: मुंबईला विजयी लय सापडणार? आज घरच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सचे आव्हान; हार्दिक, सूर्यकुमारकडे लक्ष

GT vs MI: हेड टू हेड

आतापर्यंत मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स आयपीएलमध्ये ४ वेळा आमनेसामने आले आहेत. मुंबई इंडियन्सने २ सामने जिंकले आहेत. तर गुजरात टायटन्सने २ सामने जिंकले आहेत. गुजरात टायटन्सविरुद्ध मुंबई इंडियन्सची सर्वोच्च धावसंख्या २१८ इतकी आहे. तर मुंबई इंडियन्सविरुद्ध गुजरात टायटन्सची सर्वोच्च धावसंख्या २३३ आहे.

IPL 2024 GT vs MI: पिच रिपोर्ट

नरेंद्र मोदी स्टेडियमवरील मैदानावर आतापर्यंत १० आयपीएल सामने खेळले गेले आहेत. ज्यामध्ये प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने ६ वेळा विजय मिळवला आहे. तर धावांचा पाठलाग करणाऱ्या संघाने ४ वेळा विजय मिळवला आहे. या मैदानावर अनेकदा मोठ्या धावसंख्येचे सामने पाहायला मिळाले आहे. या मैदानावर फलंदाजी करणे सोपे आहे. याशिवाय खेळपट्टी गोलंदाजांनाही मदत करते. विशेषत: सुरुवातीच्या षटकांमध्ये वेगवान गोलंदाज आव्हानात्मक ठरू शकतात.

GT vs MI Playing 11: मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्सची प्लेईंग इलेव्हन

मुंबई इंडियन्सला टी-२० चा अव्वल फलंदाज सूर्यकुमार यादवची कमी भासणार आहे. मुंबईसाठी हा सूर्यकुमारची जागा भरून काढणं फार अवघड असणार आहे. मधल्या फळीत वेगवान फलंदाजी करणाऱ्या सूर्याच्या जागी विष्णू विनोद हा एक पर्याय संघाकडे आहे. तर हार्दिक पांड्या कोणत्या क्रमांकावर फलंदाजी करणार हे देखील महत्त्वाचे असेल. पूर्वी मुंबईच्या संघात असताना तो खालच्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत मॅचफिनिशरची भूमिका बजावत असे. तर गुजरातसाठी तो मधल्या फळीत फलंदाजीसाठी यायचा.

गुजरात टायटन्ससाठी हार्दिक पांड्याची जागा भरून काढायची आहे, त्याच्या जागी अझमतुल्ला ओमरझाईला संधी दिली जाऊ शकते, जो एक अष्टपैलू खेळाडू आहे. त्याचसोबत गेल्या हंगामातील सर्वाधिक विकेट्स घेणारा मोहम्मद शमी यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडला आहे, त्याची जागी कोणाला खेळवणार हा मोठा प्रश्न संघासमोर असेल. सध्या उमेश यादव त्याचा पर्याय असू शकतो. तो शमीइतका प्रभावी नसला तरी नवीन चेंडू स्विंग करण्याची ताकद त्याच्याकडे आहे.

मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा, इशान किशन (विकेटकिपर), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णधार), नेहल वढेरा, टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्झी, पीयूष चावला, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल

सबस्टीट्यूट: विष्णू विनोद

गुजरात टायटन्सची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

शुभमन गिल (कर्णधार), वृद्धिमान साहा (विकेटकिपर), साई सुदर्शन, विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, राशिद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, उमेश यादव, स्पेन्सर जॉन्सन

सबस्टीट्यूट: अभिनव मनोहर