scorecardresearch

LSG vs RCB: विराटला बाद केल्यानंतर आवेश खाननं केलेली ‘ती’ कृती चर्चेत; Viral Video वरुन दोन गट, पाहा नेमकं घडलं काय

‘एलिमिनेटर’ सामन्यात विराटने २४ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या. यामध्येही त्याला केवळ दोनच चौकार मारता आले

virat kohli avesh khan
हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतोय (फोटो सौजन्य आयपीएल टी२० डॉट कॉमवरुन साभार)

आयपीएलच्या २०२२ च्या पर्वामधील पहिल्या एलिमिनेटर सामन्यामध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुने लखनऊ सुपर जायंट्सवर १४ धावांनी विजय मिळवला. रजत पटिदारच्या (५४ चेंडूंत नाबाद ११२) कारकीर्दीतील पहिल्या शतकामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरुला २०० हून अधिक धावा करता आल्या. या सामन्यामध्ये माजी कर्णधार विराट कोहली संघासाठी मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. मात्र दुसऱ्या बाजूने पाटिदारने दमदार फटकेबाजी केल्याने कोहली आणि पाटिदार यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६६ धावांची भागिदारी रचत मोठ्या धावसंख्येचा पाया घालून दिला. विराट मोठी खेळी करणार असं वाटत असतानाच आवेश खानने विराटला बाद केलं. मात्र विराटला बाद केल्यानंतर आवेशने ज्या आवेशात सेलिब्रेशन केलं त्यावरुन आता दोन गट पडल्याचं चित्र दिसत आहे. आवेशचं हे सेलिब्रेशन सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय.

नक्की पाहा >> शिखर धवनला वडिलांकडून मारहाण, आधी कानाखाली मारली मग लाथा बुक्क्यांनी मारहाण केली; Viral झाला घरातील ‘तो’ Video

‘आयपीएल’मधील या ‘एलिमिनेटर’ सामन्यात विराटने २४ चेंडूंमध्ये २५ धावा केल्या. यामध्येही त्याला केवळ दोनच चौकार मारता आले. विराटचा स्ट्राइक रेटही अगदी १०० च्या जवळपास होता. मात्र करो या मरो सामन्यामध्ये विराटची ही खेळी संथ म्हणावी अशीच होती. विराट सेट होण्याचा प्रयत्न करत असतानाच आवेशने अनपेक्षित टप्प्याचा फायदा घेत विराटला बाद केलं. मोहसीनने अगदी सीमारेषेजवळ विराटचा झेल घेत नवव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर त्याला पव्हेलियनचा रस्ता दाखवला. मात्र विराट बाद झाल्यानंतर आवेशने केलेल्या सेलिब्रेशनने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं.

नक्की वाचा >> हेटमायरच्या पत्नीबद्दल सुनिल गावस्करांचं वादग्रस्त वक्तव्य; RR vs CSK सामन्यात कॉमेन्ट्रीदरम्यान म्हणाले, “मोठा प्रश्न हा आहे की…”

आवेशने विराटला बाद केल्यानंतर त्याला खुन्नस देणारं सेलिब्रेशन केलं. विराट आवेशच्या गोलंदाजीवर षटकार मारण्यासाठी गेला आणि थेट शॉर्ट थर्ड मॅनच्या हातात झेल देवून बसला. एवढा चांगला फटका मारुनही आपण झेलबाद झालोय यावर विराटचा विश्वासच बसत नव्हता. तो काही वेळ क्रिजवरच उभा होता. मोहसीनने विराटचा झेल पकडल्यानंतर काही वेळ क्रिज थांबून विराट मैदानाबाहेर जाण्यासाठी चालू लागला असता दुसऱ्या बाजूला म्हणजेच बॉलर्स एण्डला आवेश विराटकडे बघून जोरजोरात टाळ्या वाजवू लागला. आवेश थेट विराटवर नजर रोखून टाळ्या वाजवत सेलिब्रेशन करत होता. आवेशची ही कृती पाहून तो विराटला डिवचण्याचा प्रयत्न करत असल्यासारखं वाटत होतं. अशाच प्रतिक्रिया अनेकांनी दिल्यात.

नक्की वाचा >> IPL: सलग दुसऱ्या वर्षी अर्जूनला मुंबईच्या संघात स्थान न मिळाल्याबद्दल सचिन स्पष्टच बोलला; म्हणाला, “मला याबद्दल…”

या व्हिडीओवरुन मतमतांतरे असल्याचं दिसून येत आहे. अनेकांनी विराटसारख्या मोठ्या खेळाडूसोबत आवेशने असं वागायला नको होतं असं म्हटलंय. तर काहींनी विराटसारख्या खेळाडूला अशाच पद्धतीने तो करतो तसं खुन्नस देणाऱ्या सेलिब्रेशनने निरोप दिला पाहिजे असं म्हटलंय. अनेकांना या व्हिडीओवरुन आधीच्या पर्वामधील विराट विरुद्ध सुर्यकुमार खुन्नसवालं प्रकरण आठवलं आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२२ ( Ipl ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Ipl 2022 lsg vs rcb eliminator watch avesh khans hostile send off for virat kohli after dismissing him scsg

ताज्या बातम्या