आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६० व्या लढतीत पंजाब किंग्जने बंगळुरु संघावर ५४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पंजाबने विजयासाठी दिलेले २१० धावांचे लक्ष्य गाठताना बंगळुरु संघाची दमछाक झाली. वीस षटकांपर्यंत बंगळुरु संघ १५५ धावा करु शकला. पंजाबच्या लियाम लिव्हिगस्टोन आणि जॉनी बेअरस्टो या फलंदाजांनी धडाकेबाज खेळी केल्यामुळेच पंजाबला विजयापर्यंत पोहोचता आलं. या विजयानंतर प्लेऑफर्यंत पोहोचण्यासाठी पंजाबला पुढचे दोन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

हेही वाचा >> काय पण नशीब! विराट कोहली कसा बाद झाला बघाल, तर तुम्ही पण हेच म्हणाल

पंजाबने दिलेल्या २१० धावांचे लक्ष्य गाठताना बंगळुरु संघाची दमछाक झाली. सलामीला आलेली फॅफ डू प्लेसिस (१०) आणि विराट कोहली (२०) ही जोडी खास कामगिरी करु शकली नाही. सलामीचे हे दोन्ही फलंदाज स्वस्तात बाद झाल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज चांगली खेळी करतील अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनीदेखील निराशा केली. रजत पाटीदारने २६ धावा केल्या. तो राहुल चहरच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर महिपाल लॉमरोर (६) स्वस्तात बाद झाला.

हेही वाचा >> जॉनी बेअरस्टोपुढे बंगळुरुच्या गोलंदाजांनी टेकले हात, अवघ्या २१ चेंडूमध्ये झळकावले अर्धशतक

चौथ्या विकेटसाठी आलेल्या ग्लेन मॅक्सवेलने संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र ३५ धावांवर असताना तो हरप्रित ब्रारच्या चेंडूवर झेलबाद झाला. त्यानंतर बंगळुरुचा फिनिशर म्हणून ओळख असलेल्या दिनेश कार्तिकचाही आज निभाव लागला नाही. त्याने अवघ्या ११ धावा केल्या. त्यानंतर शेवटच्या फळीतील फलंदाजही निराशाजनक कामगिरी करत तंबुत परतले. परिणामी वीस षटके संपेपर्यंत बंगळुरु संघ ९ गडी बाद १५५ धावा करु शकला. परिणामी पंजाब किंग्ज संघाचा ५४ धावांनी विजय झाला.

हेही वाचा >> क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडूचा विराटला मोलाचा सल्ला; म्हणाला “तू काय केलं होतं हे विसर, तुझं वय…”

तर यापूर्वी बंगळुरु संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पंजाब किंग्जने फलंदाजीसाठी उतरत सुरुवातीपासूनच धडाकेबाज खेळी केली. सलामीला आलेल्या जॉनी बेअरस्टोने २९ चेंडूंमध्ये सात षटकार आणि चार चौकार लगावत ६६ धावा केल्या. तर शिखर धनवने २१ धावा करत बेअरस्टोला साथ दिली. या जोडीने ६० धावांची भागिरादी केली. दुसऱ्या विकेटासाठी आलेल्या भानुका राजपक्षेने (१) मात्र निराशा केली.

हेही वाचा >> Video : चेन्नईच्या लाजिरवाण्या पराभवानंतर युवराज सिंगने घेतली सुरेश रैनाची फिरकी, खास व्हिडीओ व्हायरल

तिसऱ्या विकेटसाठी आलेल्या लियाम लिव्हिंगस्टोने तुफान फटकेबाजी करत ४२ चेंडूंमध्ये ७० धावा केल्या. परिणामी पंजाब संघाने मोठी धावसंख्या उभारली. लिव्हिंगस्टोन बाद झाल्यानंतर पंजाबचे शेवटच्या फळीतील फलंदाज खास कामगिरी करु शकले नाहीत. शेवटच्या फळीतील जितेश शर्माने ९ तर हरप्रित बाबर आणि ऋषी धवनने सात धावा केल्या. राहुल चहर (नाबाद) फक्त दोन धावा करुन शकला.

हेही वाचा >> जडेजाने आयपीएल सोडल्यानंतर धोनीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला ‘त्याची जागा…’

दरम्यान, गोलंदाजी विभागात आज पंजाब संघ सरस ठरला. पहिल्या पावर प्लेपासूनच पंजाबने बंगळुरु संघाला हादरवून टाकले. ४० धावा होईपर्यंत बंगळुरुचे तीन फलंदाज बाद झाले होते. कसिगो रबाडाने विराट कोहली, शाहबाज अहमद आणि हर्षल पटेल या दिग्गज फलंदाजांचा बळी घेतला. तर ऋषी धवन आणि राहुल चहर या जोडीने प्रत्येकी दोन बळी घेतले. हरप्रित बाबर आणि अर्षदीप सिंग यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. ज्यामुळे बंगळुरु संघला १५५ धावांपर्यंतच मजल मारता आली.