आयपीएलमध्ये २०२२ मध्ये बुधवारी दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजी केली आणि यावेळी रविचंद्रन अश्विनने दमदार फलंदाजी करत संघासाठी आश्चर्यकारक कामगिरी केली. या सामन्यात रविचंद्रन अश्विनने अर्धशतक ठोकले, जे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक होते.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रविचंद्रन अश्विनने ३८ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावा केल्या. अश्विनने प्रथम यशस्वी जैस्वाल सोबत ४३ धावा आणि नंतर देवदत्त पडिक्कल सोबत ५३ धावांची भागीदारी केली. या आयपीएलमध्ये रविचंद्रन अश्विन अनेक वेळा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आला आहे, ज्यामध्ये त्याने वेगवान धावा केल्या आहेत किंवा विरोधी संघाची रणनीती अपयशी ठरवण्याच प्रयत्न केला आहे.

बटलर बाद झाल्यानंतर आर अश्विन तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आला, त्याने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले. अश्विनने ३७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पॉवरप्लेमध्ये अश्विनविरुद्ध गोलंदाजी करावी लागेल, याची कल्पनाही दिल्लीच्या संघाने केली नसेल. पण तसेच झालं आणि त्याने याचा फायदा उठवला. मधल्या षटकांमध्ये त्याला फारशा धावा करता आल्या नसल्या तरी पॉवरप्लेच्या ओव्हर्सनंतर त्याने फटकेबाजी करत अर्धशतक पूर्ण केले.

रविचंद्रन अश्विनच्या या अर्धशतकाने एक विशेष विक्रमही केला आहे. सर्वाधिक डावानंतर पहिले अर्धशतक ठोकणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. रविचंद्रन अश्विनने ७२ व्या डावात आयपीएलचे पहिले अर्धशतक केले. या यादीत सर्वात पुढे आहे रवींद्र जडेजा ज्याने १३२ व्या डावात आयपीएलचे पहिले अर्धशतक केले.

पहिल्या अर्धशतकासाठी सर्वाधिक सामने खेळलेले खेळाडू (आयपीएल)

•   रवींद्र जडेजा १३२

•   रविचंद्रन अश्विन ७२

•   हरभजन सिंग ६१

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

•   स्टीव्हन स्मिथ ३१