IPL 2024, Gujarat Titans vs Mumbai Indians: रोहित शर्माला सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करता फार कमी वेळेस पाहिलं असेल. कारण कर्णधार असलेला रोहित हा कायम ३० यार्ड सर्कलमध्येच क्षेत्ररक्षण करताना दिसतो. पण मुंबई इंडियन्स वि गुजरात टायटन्सच्या हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखाली सामन्यात मात्र रोहितला सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षणासाठी पाठवण्यात आले. हे पाहून चाहत्यांनी हार्दिकला सोशल मिडियावर इतकं ट्रोल आहे की व्हिडीओ,फोटोचा आणि कमेंट्सचा पूर आला आहे.

इंडियन प्रीमियर लीग २०२४चा चौथा सामना रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गतवर्षीचे उपविजेते गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात खेळला गेला. या हायव्होल्टेज सामन्यात गुजरातने मुंबई इंडियन्सवर सहज विजय मिळवला. गुजरातने मुंबईचा ६ धावांनी पराभव केला. तर पहिल्यांदाच मुंबई इंडियन्सचा कर्णधार झालेल्या हार्दिक पंड्यावर जोरदार टीका झाली. संपूर्ण स्टेडियममध्ये चाहते त्याच्याविरूध्द नारेबाजी करताना दिसले.

Ashutosh Sharma's Reaction After Defeat
‘त्या प्रशिक्षकांना मी आवडत नसे, ते मला संघात घेत नसत. यामुळे मी नैराश्यात गेलो’, आशुतोष शर्माचा संघर्ष
IPL 2024 Gujarat Titans vs Delhi Capitals Match Updates in Marathi
IPL 2024: ‘तू वेडा आहेस का?’ लाइव्ह मॅचमध्ये आपल्याच संघातील खेळाडूवर कुलदीप यादव भडकला, पंतने असं शांत केलं प्रकरण; पाहा VIDEO
Sourav Ganguly's reaction to Hardik
IPL 2024: हार्दिक पंड्याची हुर्यो उडवणाऱ्यांवर सौरव गांगुली संतापला; म्हणाला, ‘त्याला फ्रँचायझीने नियुक्त केले असून…’,
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष

आयपीएल २०२४ हंगामासाठी, एमआयने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवत संघाचा नवा कर्णधार म्हणून हार्दिक पंड्याची निवड केली. चाहत्यांना हा निर्णय अजिबात पटलेला नाही, त्यामुळे अहमदाबादमध्ये त्याच्यावर जोरदार टीका झाली. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीदरम्यान हार्दिकने रोहित शर्मासोबतही असा प्रकार केला, ज्यामुळे चाहत्यांचा संताप शिगेला पोहोचला आहे.

रोहित शर्माला बाऊंड्रीवर फिल्डिंगला पाठवल्याने कर्णधार हार्दिक होतोय ट्रोल

मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पंड्या माजी कर्णधार रोहित शर्माच्या क्षेत्ररक्षणात बदल करताना दिसला. त्याने ३० यार्ड सर्कलमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माला थेट सीमारेषेवर पाठवले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओही व्हायरल होत आहे. हार्दिकने रोहितला हातवारे करून सीमारेषेवर जाण्यास सांगितले. मागे पुढे पाहिल्यानंतर रोहितने त्याला विचारले, ‘मी जाऊ का?’ आणि मग तिथून होकार मिळताच तो सीमारेषेजवळ जाऊन पोहोचला. इतक्यावरच पंड्या थांबला नाही. त्याने रोहितला इथून तिथून दोन तीन वेळेस नाचवले. हे पाहून चाहत्यांच्या नजरेतून हार्दिक पंड्या अधिक उतरला. सोशल मिडियावर हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी त्याला प्रचंड ट्रोल केले आहे. कमेंट्सचा तर लोकांनी पाऊस पाडला आहे.

तर घडलं असं की, गेराल्ड कोएत्झी मुंबई इंडियन्ससाठी गुजरात टायटन्सच्या डावातील शेवटचे षटक (२०वे) टाकत होता. या षटकात हार्दिक गोलंदाजासह क्षेत्ररक्षण सेट करत होता. ज्यामध्ये हार्दिकने ३० यार्ड सर्कलमध्ये उभ्या असलेल्या रोहित शर्माला सीमारेषेवर जाण्यास सांगितले. रोहित, जो बऱ्याचदा ३० यार्डाच्या सर्कलमध्ये उभा असतो त्याला लाँग ऑनकडे जातो. सीमारेषेवर गेल्यावरही पंड्याने रोहितला २-३ वेळा त्याच्या जागेवरून हलवले. रोहितसोबतचे हे वागणे चाहत्यांना अजिबात आवडले नाही. पंड्याला सोशल मीडियावरही खूप ट्रोल करण्यात आले.