IPL 2024 Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Highlights : लखनऊ सुपर जायंट्सने चेन्नई सुपर किंग्जचा एकतर्फी ८ गडी राखून पराभव केला. प्रथम खेळताना, सीएसकेने रवींद्र जडेजाच्या ५७ धावांच्या अर्धशतकी खेळीमुळे आणि शेवटी एमएस धोनीच्या २८ धावांच्या वादळी इनिंगमुळे १७६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या एलएसजी संघाने सुरुवातीपासूनच आपले वर्चस्व कायम राखले. लखनऊचे दोन्ही सलामीवीर केएल राहुल (८२) आणि क्विंटन डी कॉक (५४) यांनी अर्धशतके झळकावली. या दोघांच्या १३४ धावांच्या भागीदारीच्या जोरावर लखनऊने एक षटक शिल्लक असताना दोन गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा करून विजय मिळवला.

Live Updates

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Highlights : आतापर्यंत आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स संघांत चार सामने खेळले गेले आहेत. ज्यापैकी लखनऊने दोन आणि चेन्नईने एक सामना जिंकला असून १ अनिर्णीत राहिला आहे. अशा प्रकारे लखनऊ सुपरजायंट्सने चेन्नई सुपर किंग्जवर वर्चस्व गाजवले आहे.

23:24 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : राहुल-क्विंटन चेन्नईला पडले भारी, लखनऊचा चेन्नईवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय

कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर लखनऊ सुपरजायंट्सने चेन्नई सुपरजायंट्सचा आठ गडी राखून पराभव केला. लखनऊला गेल्या दोन सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले होते, पण संघाने आपल्या घरच्या मैदानावर विजय मिळवला. लखनऊसाठी केएल राहुलने ५३ चेंडूत ८२ धावांची खेळी केली, तर डी कॉकने ४३ चेंडूत ५४ धावा केल्या.

रवींद्र जडेजाच्या नाबाद ५७ धावांच्या खेळीच्या जोरावर चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात राहुल आणि डी कॉक यांनी पहिल्या विकेटसाठी १३४ धावांची भागीदारी केली, ज्याच्या जोरावर लखनऊने एक षटक शिल्लक असताना दोन गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा करून विजय मिळवला.

23:08 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : लखनऊला मोठा धक्का, राहुल ८२ धावा करून बाद

लखनऊला मोठा धक्का बसला आहे. केएल राहुल ५३ चेंडूत ८२ धावा करून बाद झाला. पाथीरानाने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. रवींद्र जडेजाने त्याचा एका हाताने झेल टिपला. लखनऊ संघाने १७.१ षटकात २ गडी गमावले

23:01 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : केएल राहुलची शानदार फटकेबाजी

कर्णधार केएल राहुलने सीएसकेविरुद्ध शानदार फलंदाजी सुरू ठेवली आहे. तो निकोलस पूरनसह डावाचे नेतृत्व करत आहे. लखनऊला आता विजयासाठी १८ चेंडूत १६ धावांची गरज असून नऊ विकेट्स शिल्लक आहेत.

22:47 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : अर्धशतकानंतर डी कॉक बाद

डी कॉकने शानदार फलंदाजी करत आपले अर्धशतक पूर्ण केले. मात्र यानंतर तोही बाद झाला. डी कॉक ४३ चेंडूत ५४ धावा करून बाद झाला. मुस्तफिझूर रहमानने डी कॉकला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. लखनऊने १५ षटकांत १३४ धावा केल्या आहेत. आता विजयासाठी ४३ धावांची गरज आहे.

22:37 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : लखनऊला विजयासाठी ६४ धावांची गरज

लखनऊला विजयासाठी ४२ चेंडूत ६४ धावांची गरज आहे. संघाने १३ षटकात ११३ धावा केल्या आहेत. राहुल आणि डी कॉक यांच्यात शतकी भागीदारी झाली आहे. राहुल ६५ धावा करून खेळत आहे. डी कॉक ४३ धावा करून खेळत आहे.

22:26 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : केएल राहुलने अर्धशतक झळकावताच लखनऊची धावसंख्या शंभरी पार

लखनऊचा कर्णधार केएल राहुलने सीएसकेविरुद्ध शानदार फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. त्याने क्विंटन डी कॉकसोबत पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण केली आहे. राहुल आणि डी कॉकने दमदार फलंदाजी करत ११ षटकात बिनबाद बाद १०३ धावा केल्या. लखनऊला आता विजयासाठी ५४ चेंडूत ७४ धावा करायच्या आहेत.

22:16 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : केएल राहुल अर्धशतकाच्या जवळ

केएल राहुल त्याच्या अर्धशतकाच्या जवळ आहे. तो ४६ धावा करून खेळत आहे. डी कॉक ३४ धावा करून खेळत आहे. लखनऊने ९व्या षटकात ९ धावा केल्या. संघाने कोणतेही नुकसान न करता ८४ धावा केल्या आहेत. त्यांना विजयासाठी ९३ धावांची गरज आहे.

22:13 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : लखनऊला विजयासाठी १०२ धावांची गरज आहे

लखनऊला विजयासाठी ७२ चेंडूत १०२ धावांची गरज आहे. लखनऊन संघाने ८ षटकांत ७५ धावा केल्या आहेत. राहुल ४४ धावा करून खेळत आहे. डी कॉक २७ धावा करून खेळत आहे.

22:09 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : राहुल-डी कॉकने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली

लखनऊच्या धावसंख्येने ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. डी कॉक आणि राहुल यांच्यातील अर्धशतकी भागीदारी पूर्ण झाली. राहुल २० चेंडूत ३४ धावा केल्यानंतर खेळत आहे. डी कॉक १६ चेंडूत १८ धावा करून खेळत आहे. लखनऊने ६ षटकांत ५४ धावा केल्या आहेत. आता विजयासाठी १२३ धावांची गरज आहे.

21:59 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : राहुल-डि कॉक सीएसकेसाठी अडचणी वाढवू शकतात

लखनऊच्या डावातील ५ षटके झाली असून अजून एकही विकेट पडली नाही. सीएसकेसाठी ते कठीण होऊ शकते. लखनऊने ५ षटकांत ४३ धावा केल्या. डी कॉक १८ धावा करून खेळत आहे. राहुल २३ धावा करून खेळत आहे. सीएसकेचे गोलंदाज ही जोडी फोडू शकलेले नाहीत.

21:41 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK: लखनऊच्या फलंदाजीला सुरूवात

लखनऊच्या डावाला सुरूवात झाली असून डीकॉक आणि केएल राहुलची जोडी मैदानात आहे. दीपक चहरच्या पहिल्या षटकात एलएसजीने ३ धावा केल्या.

21:22 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : चेन्नईने लखनऊला दिले १७७ धावांचे लक्ष्य

अष्टपैलू रवींद्र जडेजाचे नाबाद अर्धशतक आणि महेंद्रसिंग धोनीच्या शानदार खेळीच्या जोरावर चेन्नई सुपरजायंट्सने लखनऊ सुपरजायंट्ससमोर विजयासाठी १७७ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या. सीएसकेसाठी जडेजाने ४० चेंडूत पाच चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने नाबाद ५७ धावा केल्या. त्याचबरोबर धोनीने नऊ चेंडूत तीन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने नाबाद २८ धावा केल्या. तसेच धोनीने यष्टीरक्षक फलंदाज आयपीएलमध्ये ५००० धावाही पूर्ण केल्या. लखनऊकडून क्रुणाल पांड्याने सर्वाधिक दोन विकेट्स घेतल्या.

21:01 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : मोईन अली बाद

फिरकीपटू रवी बिश्नोईने मोईन अलीची वेगवान खेळी संपुष्टात आणली. मोईनने बिश्नोईला लागोपाठ तीन चेंडूत तीन षटकार ठोकले, पण यानंतर त्याने पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पण तो झेलबाद झाला. मोईन बाद झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनी क्रिजवर आला असून त्याच्यासोबत जडेजाही उपस्थित आहे. मोईनच्या वेगवान खेळीच्या जोरावर सीएसकेने 18 षटके संपल्यानंतर 6 बाद 142 धावा केल्या आहेत.

20:59 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : जडेजाने अर्धशतक झळकावले

सीएसकेचा अष्टपैलू रवींद्र जडेजाने लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध अर्धशतक झळकावले आहे. 34 चेंडूत अर्धशतक पूर्ण केल्यानंतर जडेजाने आपल्याच शैलीत आनंद साजरा केला. सीएसकेने 17 षटक संपल्यानंतर 5 बाद 123 धावा केल्या आहेत. जडेजा 36 चेंडूत 53 धावा केल्यानंतर क्रीजवर उपस्थित आहे आणि मोईनने 15 चेंडूत 12 धावा केल्या आहेत.

20:46 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : चेन्नई सुपर किंग्जची धावसंख्या शंभरी पार

चेन्नई सुपर किंग्जने 15 षटकांत 5 गडी गमावून 100 धावांचा टप्पा ओलांडला आहे. सध्या रवींद्र जडेजा 29 चेंडूत 40 धावा करून खेळत आहे. मोईन अली 7 धावा करून खेळत आहे. लखनऊकडून गोलंदाजी करताना क्रुणालने 3 षटकात 16 धावा देत 2 विकेट्स घेतल्या आहेत.

20:37 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : सीएसकेचा डाव फसला

लखनऊ सुपरजायंट्सविरुद्ध सीएसकेचा डाव अडखळला आहे. प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या चेन्नईच्या समीर रिझवीनेही आपली विकेट गमावली. समीरला क्रुणाल पंड्याने बाद केले. समीर पाच चेंडूत एक धाव काढून बाद झाला. या सामन्यातील क्रुणालची ही दुसरी विकेट आहे.

20:30 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : शिवम दुबे बाद

लखनऊच्या गोलंदाजांनी सीएसकेला आणखी एक धक्का देत शिवम दुबेला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. दुबे चौथा फलंदाज म्हणून आठ चेंडूंत तीन धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. चेन्नईने समीर रिझवीला प्रभावशाली खेळाडू म्हणून मैदानात उतरवले आहे. त्याच्यासोबत रवींद्र जडेजा क्रीझवर उपस्थित आहे. चेन्नईने 11.1 षटकात 4 गडी गमावून 87 धावा केल्या आहेत.

20:23 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : चेन्नईने 10 षटकात केल्या 81 धावा

चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील 10 षटके पूर्ण झाली आहेत. संघाने 3 विकेट गमावून 81 धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा 18 चेंडूत 27 धावा करून खेळत आहे. त्याने 4 चौकार मारले आहेत. शिवम दुबे 1 धाव घेऊन खेळत आहे.

20:18 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : चेन्नईला तिसरा धक्का, अजिंक्य रहाणे बाद

क्रुणाल पंड्याने रहाणेला क्लीन बोल्ड केले. रहाणे 24 चेंडूत 36 धावा करून बाद झाला. चेन्नईने 8.1 षटकात 3 गडी गमावून 68 धावा केल्या आहेत. रवींद्र जडेजा 15 धावा करून खेळत आहे.

20:02 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : चेन्नईने ओलांडला 50 धावांचा टप्पा ओलांडला

चेन्नई सुपर किंग्जने 50 धावांचा टप्पा ओलांडला आहे. संघाने 6 षटकांत 2 गडी गमावून 51 धावा केल्या आहेत. अजिंक्य रहाणे 16 चेंडूत 26 धावा करून खेळत आहे. रवींद्र जडेजा 8 धावा करून खेळत आहे.

19:55 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : चेन्नईला दुसरा धक्का, ऋतुराज झेलबाद

चेन्नई सुपर किंग्जची दुसरी विकेट पडली. कर्णधार ऋतुराज गायकवाड 13 चेंडूत 17 धावा करून बाद झाला. यश ठाकूरने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. चेन्नईने 4.2 षटकात 2 गडी गमावून 33 धावा केल्या आहेत. रहाणे 16 धावा करून खेळत आहे.

19:48 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : चेन्नईकडून रहाणे-ऋतुराज फलंदाजी करत आहेत

चेन्नई सुपर किंग्ज स्पर्धेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करत आहे. तिसऱ्या षटकात संघाने 13 धावा केल्या. हेन्रीच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर अजिंक्य रहाणेने षटकार ठोकला. रहाणे 11 धावा करून खेळत आहे. ऋतुराज गायकवाड 9 धावा करून क्रीजवर आहे. चेन्नईने 3 षटकात 1 गडी गमावून 20 धावा केल्या.

19:38 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : मोहसीन खानने चेन्नईला दिला पहिला धक्का, रचिन रवींद्रचा उडवला त्रिफळा

वेगवान गोलंदाज मोहसीन खानने सलामीवीर रचिन रवींद्रला बाद करून लखनौला पहिले यश मिळवून दिले. पहिले षटक टाकण्यासाठी आलेल्या मोहसीनने पहिल्याच चेंडूवर रचिनला बाद करून एलएसजीला चांगली सुरुवात करून दिली. रचिन खाते न उघडताच पॅव्हेलियनमध्ये परतला. रचीन बाद झाल्यानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाड मैदानात आला.

19:15 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : पाहा दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन

लखनऊ सुपरजायंट्स: क्विंटन डी कॉक, केएल राहुल (यष्टीरक्षक, कर्णधार), दीपक हुडा, मार्कस स्टॉइनिस, निकोलस पूरन, आयुष बडोनी, कृणाल पंड्या, मॅट हेन्री, रवी बिश्नोई, मोहसिन खान, यश ठाकूर.

चेन्नई सुपर किंग्ज : ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, मोईन अली, शिवन दुबे, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (यष्टीरक्षक), दीपक चहर, तुषार देशपांडे, मुस्तफिझूर रहमान, मथीशा पाथिराना.

19:12 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : लखनऊने नाणेफेक जिंकली, गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय

लखनऊचा कर्णधार केएल राहुलने चेन्नईविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लखनऊने या सामन्यासाठी संघात एक बदल केला आहे. या सामन्यासाठी लखनऊने शामर जोसेफच्या जागी मॅट हेन्रीला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट केले आहे. सीएसकेने या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. या सामन्यात शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहरला संधी देण्यात आली आहे, तर डॅरिल मिशेलला बाहेर ठेवण्यात आले आहे.

18:49 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : पुन्हा एकदा धोनीवर असणार सर्वांच्या नजरा

‘इम्पॅक्ट प्लेयर’ नियमामुळे, क्रुणाल पंड्या सातव्या क्रमांकावर येत आहे आणि सहा सामन्यांत तो फक्त ४१ चेंडू खेळू शकला. त्यांचा पुरेपूर वापर न केल्याचे परिणामही संघाला भोगावे लागले आहेत. कर्णधार राहुल देखील केवळ २०४ धावा करू शकला आणि तो त्याच्या सर्वोत्तम फॉर्ममध्ये नाही. निकोलस पूरनने सहा सामन्यांत १९ षटकार मारले असून त्याच्याकडून ही लय कायम राखण्याची अपेक्षा असेल. त्याचवेळी चाहत्यांच्या नजरा पुन्हा एकदा मुंबईविरुद्धच्या सामन्यात ४ चेंडूत तुफानी २० धावा करणाऱ्या महेंद्रसिंह धोनीवर असतील.

18:32 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : रहाणे-रचिनचा फॉर्म सीएसकेसाठी चिंतेचा विषय

चेन्नई सुपर किंग्जसाठी या हंगामात त्यांचे आघाडीचे दोन फलंदाज रचिन रवींद्र आणि अजिंक्य रहाणे यांचा फॉर्म चिंतेचा विषय आहे. रचिनने सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये चांगली फलंदाजी केली,, परंतु त्यानंतर तो पूर्णपणे अपयशी ठरला, तर रहाणेला शेवटच्या सामन्यात सलामीला पाठवण्यात आले आणि तो तेथेही काही विशेष करू शकला नाही. रचिन आणि रहाणेचे बाहेर पडणे या संघासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण ते लवकर बाद झाल्याने खालच्या फळीतील फलंदाजांवर दबाव येतो.

18:04 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : चेन्नईचे गोलंदाज उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत

लखनऊचे फलंदाज अपेक्षेप्रमाणे कामगिरी करू शकले नाहीत आणि ते चेन्नईच्या फॉर्मात असलेल्या गोलंदाजांचा कसा सामना करतात हे पाहायचे आहे. यॉर्कर बॉलिंगमध्ये मास्टर असलेल्या मथीशा पाथिरानासाठी डेथ ओव्हर्समध्ये खेळणे खूप कठीण आहे. तर मुस्तफिजुर रहमानमध्ये किमान तीन भिन्नता आहेत. एकानासारख्या स्टेडियमवर जिथे चेंडूवर पकड चांगली असते, तिथे रवींद्र जडेजा खूप प्रभावी ठरू शकतो. लखनऊमध्ये महिष तिक्षणाच्या रूपाने अतिरिक्त फिरकीपटू मैदानात उतरवला जाऊ शकतो.

17:31 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : दोन्ही संघांचे गुणतालिकेतील स्थान

आयपीएल २०२४ मध्ये सध्या चेनई संघ ६ सामन्यातील ४ विजयासह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर लखनऊ संघ ६ सामन्यात ३ विजय मिळवून पाचव्या स्थानावर आहे.

17:29 (IST) 19 Apr 2024
LSG vs CSK : लखनऊ विरुद्ध चेन्नई हेड टू हेड रेकॉर्ड

दोन्ही संघांच्या आकडेवारीवर नजर टाकली, तर चेन्नई आणि लखनऊमध्ये आतापर्यंत एकूण तीन सामने झाले आहेत. एक सामना चेन्नईने आणि एक सामना लखनऊने जिंकला आहे, तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. एकना स्टेडियमवर दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत फक्त एकच सामना झाला असून तो पावसामुळे वाया गेल्यामुळे निकाल लागू शकला नाही.

Lucknow Super Giants vs Chennai Super Kings Highlights, IPL 2024 : या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना सीएसके संघाने जडेजा-धोनीच्या खेळीच्या जोरावर ६ बाद १७६ धावा केल्या होत्या. मात्र प्रत्युत्तरात एलएसजीने राहुल आणि डी कॉकच्या १३४ धावांच्या भागीदारीच्या जोरावर दोन गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा करून विजय मिळवला.