CSK vs MI, IPL 2024 Highlights: आयपीएलमधील एल क्लासिको सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सवर २० धावांनी विजय मिळवला. मुंबईतील वानखेडेवर स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात रोहित शर्माने झंझावाती शतरक झळकावले पण संघाला मात्र विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. या मोसमातील चेन्नईचा हा चौथा विजय असून मुंबई इंडियन्सचा चौथा पराभव आहे. या सामन्यात सीएसकेने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत २०६ धावा केल्या.

प्रत्युत्तरात मुंबईचा संघ २० षटकांत केवळ १८६ धावा करू शकला आणि सीएसकेने २० धावांनी सामना जिंकला. मुंबईसाठी रोहित शर्माने अप्रतिम खेळी खेळली. रोहितने १२ वर्षांनंतर आयपीएलमध्ये शतक झळकावले आहे. या सामन्यात रोहितने १०५ धावा केल्या. चेन्नईच्या विजयात या एमएस धोनीचे सलग ३ षटकार, पाथिरानाचे ४ विकेट, ऋतुराज (६९) आणि शिवम दुबेची (६६) शानदार खेळी यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
ABP Sea voters Survey
Opinion Poll : महाराष्ट्रात महायुतीला मिळणार ४८ पैकी अवघ्या ‘इतक्या’ जागा? कुठल्या जागेवर कुणाची आघाडी?
raj thackray mns latest news
“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम”, मनसेला गळती; सात शिलेदारांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
Live Updates

Mumbai Indians vs Chennai Super Kings Highlights: मुंबई इंडियन्स वि चेन्नई सुपर किंग्समधील सामन्यात चेन्नईने मुंबईचा २० धावांनी पराभव केला. ऋतुराजची चेन्नई ही पंड्याची मुंबईवर चांगलीच भारी पडली.

23:29 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: चेन्नईचा मुंबईवर २० धावांनी दणदणीत विजय, रोहितची शतकी खेळी ठरली व्यर्थ

चेन्नई सुपर किंग्जने रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा २० धावांनी पराभव केला. रोहित शर्माने दमदार फलंदाजी करत शतक झळकावले. तरी तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. प्रथम फलंदाजी करताना चेन्नईने २०६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबई संघ २० षटकांत ६ गडी गमावून केवळ १८६ धावा करू शकला.

https://twitter.com/IPL/status/1779568880652034156

23:23 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: रोहित शर्माने ६१ चेंडूत झळकावलं शतक

रोहित शर्माने चौकारांसह शतक पूर्ण केले. तो ६१ चेंडूत १०० धावा केल्यानंतर खेळत आहे. मुंबईला विजयासाठी २९ धावांची गरज आहे.

https://twitter.com/IPL/status/1779568100721176971

23:13 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: टीम डेव्हिड, शेफर्ड आऊट

मुस्तफिजूरच्या १७व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर डेव्हिड बाद झाला तर पाथिरानाने भेदक गोलंदाजी करत विस्फोटक शेफर्डला क्लीन बोल्ड केले.मुंबईला विजयासाठी १२ चेंडूत ४७ धावांची गरज आहे.

22:53 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: १५ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या

तिलक वर्माच्या विकेटनंतर हार्दिक पंड्या मैदानात आला आहे. रोहित हार्दिकच्या जोडीने ३ बाद १३२ धावा केल्या आहेत. रोहित ७७ धावा तर हार्दिक १ धावा करत मैदानात आहे.

22:47 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: तिलक वर्मा झेलबाद

रोहित शर्मासोबत ५० अधिक धावांची भागीदारी रचत संघाचा डाव पुढे नेणारा तिलक वर्मा झेलबाद. पाथिरानाच्या १४व्या षटकातील पाचव्या चेंडूवर मोठा फटका खेळताना शार्दुल ठाकूरकडून झेलबाद झाला. मागे धावत जात शार्दुलने एक शानदार झेल टिपला. मुंबईची धावसंख्या सध्या ३ बाद १३० धावा केल्या.

22:37 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: रोहित शर्मा - ५०० षटकार लगावणारा पहिला भारतीय फलंदाज

रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५०१ षटकार लगावले आहेत. टी-२० मध्ये ५०० षटकार लगावणारा रोहित शर्मा हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी वेस्ट इंडिडच्या फलंदाजांनी ही कामगिरी केली आहे.

22:33 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: मुंबईने गाठला १०० धावांचा पल्ला

रोहित शर्माच्या शानदार अर्धशतकांसह आणि तिलक वर्माच्या फटकेबाजीसह मुंबईने १०० धावांचा पल्ला गाठला. ११ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या २ बाद १०८ धावा आहे. रोहित ६६ तर तिलक वर्मा १९ धावांवर खेळत आहे.

22:21 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: रोहित शर्माचे शानदार अर्धशतक

मुंबई इंडियन्सचा सलामीवीर रोहित शर्माने विस्फोटक अंदाजात फलंदाजी करत ३० चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. रोहितने २ षटकार आणि ७ चौकारांच्या साथीने ५० धावा पूर्ण केल्या.

https://twitter.com/IPL/status/1779553601511403662

22:17 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: सूर्या खाते न उघडता झेलबाद

पाथिरानाच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्या मोठा फटका खेळायला गेला आणि बाऊंड्री लाईनजवळ झेलबाद झाला. मुस्तफिजूर रहमानचा तोला गेला असला तरी त्याने झेल मात्र सावधगिरीने टिपला.

22:15 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: पाथिरानाच्या पहिल्याच चेंडूवर मुंबईला धक्का

आठव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मैदानात सेट झालेला इशान किशन फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. बाद होण्यापूर्वी इशानने १५ चेंडूत १ षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीने २३ धावा केल्या.

22:07 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: पॉवरप्ले

रोहित आणि इशान किशनच्या फटकेबाजीच्या जोरावर एकही विकेट न गमावता ६३ धावा केल्या. रोहित शर्माने २५ चेंडूत ४२ धावा तर इशान किशन ११ चेंडूत २१ धावा करत मैदानात कायम आहे.

22:04 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: मुंबईची धावसंख्या

५ षटकांनंतर मुंबईची धावसंख्या बिनबाद ५३ धावा आहे. ५ षटकांतच मुंबईने ५० धावांचा टप्पा गाठला आहे. रोहित आणि इशानने चेन्नईच्या प्रत्येक गोलंदाजाची शाळा घेतली.

21:45 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: मुंबईच्या फलंदाजीला सुरूवात

रोहित शर्मा आणि इशान किशन मुंबईच्या डावाची सुरूवात करत आहेत. रोहितने पहिल्या दोन्ही षटकांमध्ये चौकार लगावले असून मुंबईने आतापर्यंत १३ धावा केल्या आहेत.

21:26 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: २० षटकांत २०६ धावा

चेन्नईने मुंबईला विजयासाठी २०७ धावांचे आव्हान दिले आहे. धोनीने अखेरच्या षटकात षटकारांची हॅट्रिक लगावत संघाची धावसंख्या २०६ वर नेऊन ठेवली. डॅरिल मिचेल बाद झाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर आलेल्या धोनीने ४ चेंडूत २० धावा करत एक विस्फोटक खेळी केली.

शिवम दुबेच्या ६६ धावांच्या फटकेबाजीनंतर धोनीने तुफानी खेळी केली आणि धावांसाठी झगडत असलेल्या संघाला जणू धावांची संजीवनी दिली. चेन्नईची सुरूवात चांगली झाली नसली तरी ऋतुराजच्या ६९ धावांच्या खेळीने आणि नंतर शिवम दुबेच्या ६६ धावांच्या खेळीने संघाने झटपट धावा केल्या. डॅरिल मिचेलने १७ धावा करत बाद झाला. त्यानंतर धोनीने मैदानावर येत आपली जादू दाखवली. मुंबईकडून हार्दिक पंड्याने दोन विकेट्स घेतले पण सर्वाधिक धावा त्यानेच दिल्या.३ षटकांत त्याने ४३ धावा दिल्या.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1779540790961967394

21:18 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: मुंबईच्या गोलंदाजांची शानदार गोलंदाजी

ऋतुराजच्या विकेटनंतर चेन्नईच्या धावांना ब्रेक लागला आहे. ऋतुराज बाद झाल्यानंतर संघाची धावसंख्या १६ षटकांनंतर १५१ धावा होती. तर १८व्या षटकांनंतर संघाने केवळ १७३ धावा केल्या आहेत.

20:55 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: ऋतुराज गायकवाड झेलबाद

हार्दिक पंड्याच्या १६व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर नबीकडून झेलबाद झाला. ऋतुराजने बाद होण्यापूर्वी ४० चेंडूत ५ षटकार आणि ५ चौकारांसह ६९ धावा करत एक शानदार खेळी केली.

20:54 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: शिवम दुबेचे दणदणीत अर्धशतक

शिवम दुबेने तुफानी फलंदाजी करत २८ चेंडूत २ षटकार आणि ७ चौकारांच्या मदतीने ५० धावा केल्या. दुबेने या सामन्यातही आपली लय कायम राखत शानदार खेळी करत आहे. १६ व्या षटकानंतर चेन्नईची धावसंख्या ३ बाद १५१ धावा आहे.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1779531838253670428

20:48 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: रोमारियोची दुबे-ऋतुराजकडून धुलाई

१४ व्या षटकात दुबे आणि ऋतुराजने रोमारियो शेफर्डची धुलाई करत २२ धावा कुटल्या. दुबेने दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवर दणदणीत षटकार लगावले, पुढच्या चेंडूवर चौकार लगावला. तर एक डॉट बॉलनंतर गायकवाडने चौकार लगावत षटकांची सांगता केली.

20:40 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: ऋतुराजचे शानदार अर्धशतक

ऋतुराज तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला येत त्याने ३२ चेंडूत ५२ धावा करत शानदार अर्धशतक झळकावले. यासह १३ षटकांनंतर २ बाद ११० धावा इतकी धावसंख्या आहे.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1779528709273440630

20:37 (IST) 14 Apr 2024
चेन्नईची धावसंख्या १०० पार

चेन्नई सुपर किंग्सची धावसंख्या १२ षटकांनंतर १०० पार गेली आहे. ऋतुराज आणि शिवम दुबे संधी मिळताच शानदार फटकेबाजी करत आहेत. ऋतुराज ४६ धावा तर शिवम दुबे २७ धावांवर खेळत आहेत.

20:28 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: १० षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या

१०व्या षटकात हार्दिक पंड्याची शिवम दुबेने ३ चौकार मारत धुलाई केली. ऋतुराज आणि शिवम दुबेने १० षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या २ बाद ८० धावा केली आहे. ऋतुराज ३६ धावा तर शिवम दुबे १५ धावांसह क्रिझवर आहेत.

20:16 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: मुंबईच्या खात्यात दुसरी विकेट

फिरकीपटू श्रेयस गोपालच्या गोलंदाजीवर रचिन रवींद्र इशान किशनकरवी झेलबाद झाला. गोपालच्या आठव्या षटकातील चौथ्या चेंडूवर रचिनने दणदणीत षटकार खेचला. पाचव्या चेंडूवरही रचिनच्या बॅटची हलकी कड घेत चेंडू इशानच्या हातात गेला. फक्त इशानने रचिन झेलबाद झाल्याचे अपील केले पण पंचांनी बाद दिले नाही.

पण इशानने आवाज ऐकल्याने तो बाद असल्याचे सतत अपील केले, ज्यामुळे कर्णधाराने रिव्ह्यू घेतला आणि डीआरएसमध्ये बॅटला चेंडू लागल्याने रचिनला बाद दिले. मुंबईच्या खेळाडूंनी इशानचे कौतुक केले. रचिन १६ चेंडूत २१ धावा करत बाद झाला.

https://twitter.com/MIPaltanFamily/status/1779520985357783254

20:01 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: चेन्नईची पॉवरप्लेनंतर धावसंख्या

चेन्नईने पॉवरप्लेमध्ये १ बाद ४८ धावा केल्या आहेत. ऋतुराज २९ धावा तर रचिन १२ धावांसह मैदानात कायम आहेत. मोहम्मद नबी, गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह आणि आकाश मढवाल यांनी गोलंदाजी केली. कोएत्झीला रहाणेच्या रूपात १ विकेट घेण्यात यश मिळाले.

19:52 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: ४ षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या

चेन्नईकडून ऋतुराज-रचिनची जोडी मैदानात आहे. मुंबई इंडियन्सने पॉवरप्लेमध्ये आपली पकड मजबूत ठेवली आहे. ४ षटकांनंतर चेन्नईची धावसंख्या १ बाद २४ आहे.

19:39 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: रहाणे झेलबाद, चेन्नईला पहिला धक्का

ऋतुराजऐवजी सलामीला आलेला अजिंक्य रहाणे दुसऱ्याच षटकात झेलबाद झाला. गेराल्ड कोएत्झीच्या दुसऱ्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात पंड्याकडून आऊट झाला. रहाणेने बाद होण्यापूर्वी ८ चेंडूत ५ धावा केल्या.

19:35 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: रचिनसोबत अजिंक्य रहाणे सलामीला

चेन्नई सुपर किंग्सचा संघ नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीला उतरला आहे. चेन्नईकडून नेहमी ऋतुराज गायकवाड सलामीला उतरतो. पण आजच्या वानखेडेवरील सामन्यात ऋतुराजऐवजी अजिंक्य रहाणे सलामीला उतरला आहे. अजिंक्यने पहिल्याच षटकात चांगलाच चौकार लगावला. पहिल्या षटकानंतर चेन्नईची धावसंख्या ६ धावा आहे.

19:20 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: धोनीचा २५०वा सामना

चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार आणि विस्फोटक फलंदाज एम एस धोनी सीएसकेसाठी आपला २५० वा सामना आज खेळत आहे.

https://twitter.com/ChennaiIPL/status/1779504222406693310

19:10 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: चेन्नई सुपर किंग्स प्लेईंग इलेव्हन

रचिन रवींद्र, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), अजिंक्य रहोणे, डॅरिल मिचेल, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), शार्दुल ठाकूर, मुस्तफिजूर रहमान, तुषार देशपांडे

इम्पॅक्ट सब्स्टीट्यूट - मथीशा पाथीराना, निशांत सिंधू, मिचेल सँटनर, मोईन अली, शेख रशीद

https://twitter.com/ChennaiIPL/status/1779507636893077581

19:09 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: मुंबई इंडियन्स प्लेईंग इलेव्हन

रोहित शर्मा, इशान किशन(विकेटकीपर), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), टीम डेव्हिड, मोहम्मद नबी, रोमारियो शेफर्ड, श्रेयस गोपाल, गेराल्ड कोएत्झी, जसप्रीत बुमराह, आकाश मधवाल

इम्पॅक्ट सब्स्टीट्यूट - सूर्यकुमार यादव, डेवाल्ड ब्रेविस, नमन धीर, नेहल वढेरा, हार्विक देसाई

https://twitter.com/mipaltan/status/1779507356793184392

19:01 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: नाणेफेक

मुंबई इंडियन्स वि चेन्नई सुपर किंग्सविरूद्धच्या सामन्यात मुंबई संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईच्या संघात एकही बदल झालेला नाही, गेल्या सामन्यातील सारख्याच प्लेईंग इलेव्हनसह खेळणार आहे. तर चेन्नईच्या संघात मथीशा पथिराना महिश तीक्ष्णाच्या जागी प्लेईंग इलेव्हनमध्ये परतला आहे.

https://twitter.com/mipaltan/status/1779502679271882975

18:40 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: या विक्रमावर धोनीच्या नजरा

मुंबईविरूद्धच्या आजच्या सामन्यात एमएस धोनीची नजर एका खास विक्रमावर असेल. धोनी या सामन्यात २५ धावा करू शकल्यास तो आयपीएलच्या एल क्लासिको सामन्यात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरेल.

18:33 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: दोन्ही संघ मैदानात दाखल

मोठ्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्जचे संघ वानखेडेच्या मैदानात दाखल झाले आहेत. दोन्ही संघांचे खेळाडू बसमधून मैदानात पोहोचले आहेत आणि सामन्यासाठी सज्ज होत आहेत.

https://twitter.com/mipaltan/status/1779490589526102069

17:39 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: मुंबईच्या कर्णधारांचा सीएसकेविरूद्धचा रेकॉर्ड

चेन्नई वि मुंबई यांच्यातील सामन्यात रोहित व्यतिरिक्त, इतर कर्णधारांनी १३ सामन्यांमध्ये संघाची कमान सांभाळली आहे. यामध्ये मुंबईने ७ सामने गमावले आहेत, तर ६ सामने जिंकले आहेत.

17:32 (IST) 14 Apr 2024
MI vs CSK: दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड

मुंबई इंडियन्स वि चेन्नई सुपर किंग्समध्ये आतापर्यंत ३६ सामने खेळले गेले आहेत. यापैकी २० सामने मुंबईने जिंकले आहेत तर चेन्नईला १६ सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. मुंबई इंडियन्सशिवाय कोणत्याही संघाने चेन्नईला सर्वाधिक वेळा पराभूत केले नाही.

Chennai Super Kings vs Mumbai Indians Live Updates in Marathi

MI vs CSK, IPL 2024 Highlights: मुंबई इंडियन्सला चेन्नई सुपर किंग्सने २० धावांनी पराभूत केले. वानखेडेवर झालेल्या य सामन्यात रोहितचे शानदार शतक मात्र व्यर्थ ठरले.