Indian Premier League 2024 Opening Ceremony in Chennai, 22 March 2024: इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२४ ची ओपनिंग सेरेमनी २२ मार्च रोजी चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर होणार आहे. या सेरेमनीला अक्षय कुमार, टायगर श्रॉफ यांसारखे स्टार्सची उपस्थिती आणि त्यांचे परफॉर्मन्स पाहायला मिळणार आहेत. आपल्या सुंदर आवाजाने मंत्रमुग्ध करण्यासाठी ए.आर. रहमान आणि सोनू निगम ही या सेरेमनीसाठी चेन्नईमध्ये असतील.

– quiz

IPL च्या अधिकृत एक्सवर (पूर्वीचे ट्विटर) ओपनिंग सेरेमनीची घोषणा केली. एकापेक्षा एक या कलाकारांचे फोटो पोस्ट केले आहेत. आयपीएलची ओपनिंग सेरेमनी २२ मार्चला संध्याकाळी ६.३० वाजता सुरू होणार आहे. अक्षय, टायगर, रहमान आणि सोनू या कार्यक्रमात परफॉर्म करणार असल्याची घोषणा करणारे पोस्टर देखील शेअर केले. अक्षय आणि टायगर सध्या अली अब्बास जफर दिग्दर्शित बडे मियाँ छोटे मियाँ या चित्रपटात एकत्र काम करत आहेत.

पहिला सामना गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये होणार आहे. गेल्या वर्षीच्या ओपनिंद सेरेमनीमध्ये रश्मिका मंधाना, तमन्ना भाटिया आणि गायक अरिजित सिंग यांनी कार्यक्रमात परफॉर्म केले होते. रश्मिका तिच्या ग्रीन रुममध्ये जिमिकी पोन्नूला डान्स करतानाचा व्हिडिओही व्हायरल झाला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रहमान आणि सोनू बॉलीवूड गाण्यांव्यतिरिक्त देशभक्तीपर गाण्यांवरही सादरीकरण करतील. ओपनिंग सेरेमनी किती वेळ असेल याबद्द्ल माहिती देताना ते म्हणाले, “अक्षय आणि टायगरच्या यांच्या परफॉर्मन्स कालावधी सुमारे ३० मिनिटांचा असेल. सोनू आणि रहमान एकत्र काही बॉलीवूड हिट्स देखील सादर करतील. या परफॉर्मन्सव्यतिरिक्त यापूर्वी कधीही न पाहिलेला एआर (ऑगमेंटेड रिॲलिटी)चे प्रदर्शन देखील असेल जे ओपनिंग सेरेमनीचे खास वैशिष्ट्य आहे.”