IPL 2025 Gujarat Titans vs Rajasthan Royals Highlights: अष्टपैलू कामगिरी करत गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्स संघावर घरच्या मैदानावर ५८ धावांनी मोठा विजय नोंदवला. गुजरातच्या गोलंदाजांनी मोठ्या चतुराईने आणि उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोठं योगदान दिलं आहे. तर साई सुदर्शनने ८२ धावांची दमदार खेळी करत संघाला २१७ धावांच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचून दिला. ठराविक अंतराने विकेट्स गमावल्याने राजस्थान रॉयल्सचा संघ सामन्यात टिकू शकला नाही आणि २०० धावा करण्यापूर्वीच सर्वबाद झाला.

Live Updates

IPL 2025 Gujarat Titans vs Rajasthan Royals Highlights: आयपीएल २०२५ गुजरात टायटन्स वि. राजस्थान रॉयल्स सामन्याचे हायलाईट्स

23:10 (IST) 9 Apr 2025

GT vs RR Live: एकाच षटकात दोन विकेट

प्रसिध कृष्णाने उत्कृष्ट गोलंदाजी करत संघाच्या विजयात मोठी भूमिका बजावत आहे. १६व्या षटकात प्रसिध कृष्णाने जोफ्रा आर्चर आणि अर्धशतकी खेळी केलेल्या शिमरॉन हेटमायरला झेलबाद केलं.

22:52 (IST) 9 Apr 2025

GT vs RR Live:राजस्थानला सहावा धक्का

राजस्थान रॉयल्सच्या शुभम दुबेला राशिद खानने पायचीत करत संघाला अजून एक विकेट मिळवून दिली आहे. तर राशिद खानच्या खात्यात दुसरी विकेट गेली आहे.

22:48 (IST) 9 Apr 2025

GT vs RR Live: संजू सॅमसन झेलबाद

राजस्थान रॉयल्सचा निम्मा संघ तंबूत परतला असून संघाने महत्त्वाची विकेट गमावली. १३व्या षटकात प्रसिद्ध कृष्णाने संजू सॅमसनला झेलबाद करत राजस्थानच्या विजयाच्या आशांना मोठा धक्का दिला आहे. यासह आता राजस्थानला ४२ चेंडूत ९९ धावांची गरज आहे.

22:35 (IST) 9 Apr 2025

GT vs RR Live: राजस्थानला विजयासाठी किती धावांची गरज

राजस्थान रॉयल्सने १० षटकांत ८५ धावा करत ४ विकेट्स गमावले आहेत. संजू सॅमसन आणि शिमरॉन हेटमायर सध्या मैदानावर आहेत. तर आता राजस्थानला विजयासाठी १० षटकांत म्हणजेच ६० चेंडूत १३३ धावांची गरज आहे.

22:25 (IST) 9 Apr 2025
GT vs RR Live: ध्रुव जुरेल झेलबाद

राशिद खानच्या आठव्या षटकातील चौथ्या चेंडूवर मोठा फटका खेळण्याच्या नादात झेलबाद झाला. राशिद खानची यंदाच्या आयपीएलमधील ही फक्त दुसरी विकेट आहे. यासह राजस्थानने ८ षटकांत ४ बाद ७४ धावा केल्या आहेत.

22:22 (IST) 9 Apr 2025

GT vs RR Live: राजस्थानला तिसरा धक्का

संजू सॅमसन आणि रियान पराग यांनी उत्कृष्ट फलंदाजी करत संघाचा डाव सावरला होता. पण गुजरातचा नवा गोलंदाज कुलवंत खेजरोलियाला गोलंदाजी दिली आणि त्याने पहिल्याच षटकात विकेट घेतली. खेजरोलियाला यंदाच्या पहिल्याच सामन्यात खेळण्याची संधी मिळाली आणि त्याने पहिल्याच षटकात रियान परागची मोठी विकेट मिळवली.

22:13 (IST) 9 Apr 2025

GT vs RR Live: संजू-रियानने सावरला संघाचा डाव

संजू सॅमसन रियान पराग यांनी पॉवरप्लेमध्ये चांगली फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला आहे. यासह राजस्थानने पॉवरप्लेमध्ये २ विकेट्स गमावत ५७ धावा केल्या आहेत.

21:56 (IST) 9 Apr 2025

GT vs RR Live: २ विकेट्स राजस्थानने गमावले

अरशद खानने दुसऱ्या षटकात यशस्वी जैस्वालला झेलबाद करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला. तर पुढच्याच षटकात मोहम्मद सिराजने नितीश राणाला बाद करत संघाला मोठे धक्के दिले. यासह संघ ३ षटकांनंतर २ बाद १८ धावा आहे.

21:26 (IST) 9 Apr 2025

GT vs RR Live: विजयासाठी इतक्या धावांचं लक्ष्य

गुजरात टायटन्सने २० षटकांत ६ बाद २१७ धावा केल्या आहेत. अखेरच्या षटकांमध्ये गुजरातने विकेट तर गमावले पण धावांना मात्र ब्रेक लागू दिला नाही. साई सुदर्शनने ८२ धावांची उत्कृष्ट खेळी केली. तर बटलर आणि शाहरूख खान प्रत्येकी ३६ धावांची खेळी करत बाद झाले. यानंतर आलेल्या फलंदाजांनी मोठे फटके मारत झटपट धावा करत विकेट गमावल्या. आता राजस्थानला विजयासाठी २१८ धावांची गरज आहे.

21:19 (IST) 9 Apr 2025

GT vs RR Live: तुषार देशपांडेच्या एका षटकात दोन विकेट

तुषार देशपांडेच्या १९व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर वादळी फलंदाजी करणाऱ्या साई सुदर्शनला झेलबाद केलं. साई ५३ चेंडूत ८ चौकार आणि ३ षटकारांसह ८२ धावा करत झेलबाद झाला. तर अखेरच्या चेंडूवर राशीद खान १२ धावा करत झेलबाद झाला.

21:15 (IST) 9 Apr 2025
GT vs RR Live: रूदरफोर्ड झेलबाद

संदीप शर्माच्या १७व्या षटकातील पहिल्या चेंडूवर शेरफेन रूदरफोर्ड एक षटकार लगावत झेलबाद झाला. तर १७ षटकांत गुजरातने ४ बाद १७६ धावा केल्या आहेत.

21:09 (IST) 9 Apr 2025
GT vs RR Live: तीक्ष्णाच्या खात्यात दुसरी विकेट

महिश तीक्ष्णाच्या सोळाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर स्टम्पिंग होत बाद झाला. शाहरूख खान २० चेंडूवर ४ चौकार आणि २ षटकारासह ३६ धावा करत बाद झाला. यासह १६ षटकांत गुजरातने ३ बाद १६३ धावा केल्या आहेत.

20:59 (IST) 9 Apr 2025

GT vs RR Live: १५ षटकांत किती धावा

गुजरात टायटन्स संघाने १५ षटकांत २ बाद १४५ धावा केल्या आहेत. सुदर्शन आणि शाहरूख खान यांनी चांगली भागीदारी रचत संघाच्या चांगल्या धावसंख्येचा पाया रचला आहे.

20:32 (IST) 9 Apr 2025

GT vs RR Live: तीक्ष्णाच्या गोलंदाजीवर बटलर बाद

तीक्ष्णाच्या १०व्या षटकातील अखेरचा चेंडू बटलरच्या मागच्या पायाला जाऊन लागला, एलबीडब्ल्यूसाठी खेळाडूंनी अपील केलं. पण मैदानावरील पंचांनी बाद दिलं नाही. संजूने लगेचच चर्चा करून रिव्ह्यू घेतला आणि बॉल ट्रॅकिंगमध्ये चेंडू थेट विकेटवर आदळलेला दिसला. यासह बटलर पायचीत होत बाद झाला आणि बटलर-साई सुदर्शनची ८० धावांची भागीदारी तुटली.

20:23 (IST) 9 Apr 2025

GT vs RR Live: साई सुदर्शनचं अर्धशतक

शानदार फॉर्मात असलेल्या साई सुदर्शनने अजून एक शानदार अर्धशतक झळकावलं आहे. साई सुदर्शनने राजस्थान रॉयल्सविरूद्ध सामन्यात ३२ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण केले आहे.

20:06 (IST) 9 Apr 2025

GT vs RR Live: पॉवरप्ले

साई सुदर्शन आणि जोस बटलरने मिळून पॉवरप्लेमध्ये १बाद ५६ धावा केल्या आहेत. तर जोफ्रा आर्चरने शुबमन गिलची एक विकेट घेतली. साई सुदर्शन ३९ धावा तर बटलर ११ धावा करत खेळत आहे.

19:44 (IST) 9 Apr 2025

GT vs RR Live: शुबमन गिल क्लीन बोल्ड

जोफ्रा आर्चरने सामन्यातील तिसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर शुबमन गिलला क्लीन बोल्ड करत संघाला ब्रेकथ्रू मिळवून दिला आहे. गिल 2 धावा करत माघारी परतला.

19:36 (IST) 9 Apr 2025

GT vs RR Live: सामन्याला सुरूवात

गुजरात वि. राजस्थान सामन्याला सुरूवात झाली असून शुबमन गिल आणि साई सुदर्शनची जोडी फलंदाजीला उतरली आहे. तर जोफ्रा आर्चरच्या हातात नवा चेंडू आहे.

19:09 (IST) 9 Apr 2025
GT vs RR Live: गुजरात टायटन्सची प्लेईंग इलेव्हन

साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर (यष्टीरक्षक), शाहरुख खान, राहुल तेवतिया, शेरफन रूदरफोर्ड, रशीद खान, आर साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, अरशद खान

19:09 (IST) 9 Apr 2025

GT vs RR Live: राजस्थान रॉयल्सची प्लेईंग इलेव्हन

यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टिरक्षक), नितीश राणा, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, फजलहक फारूकी, जोफ्रा आर्चर, महेश थेक्षाना, संदीप शर्मा, तुषार देशपांडे

19:01 (IST) 9 Apr 2025
GT vs RR Live: नाणेफेक

गुजरात टायटन्स वि. राजस्थान रॉयल्स सामन्याची नाणेफेक राजस्थान संघाने जिंकली असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होत आहे. राजस्थान रॉयल्सच्या संघात वानिंदू हसरंगा त्याच्या वैयक्तिक कारणामुळे संघाबाहेर झाला आहे. त्याच्या जागी फजलहक फारूकीला संधी देण्यात आली आहे.

18:53 (IST) 9 Apr 2025

GT vs RR Live: आयपीएल २०२५ गुणतालिका

गुजरातने आतापर्यंत खेळलेल्या ४ पैकी ३ सामने जिंकले आहेत आणि ६ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर राजस्थाननेही ४ पैकी २ सामने जिंकले आहेत आणि ४ गुणांसह ७ व्या स्थानावर आहे.

18:40 (IST) 9 Apr 2025

GT vs RR Live: गुजरात टायटन्स वि. राजस्थान रॉयल्स

आयपीएलच्या या हंगामात संजू सॅमसनचा कर्णधार म्हणून हा दुसरा सामना असेल. मागील सामन्यात त्याने कर्णधार म्हणून विजय नोंदवला होता, तर शुबमन गिलच्या नेतृत्त्वाखाली गुजरातने विजयाची हॅटट्रिक साधली आहे. या सामन्यात दोन्ही संघ विजयी घोडदौड कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील.

18:11 (IST) 9 Apr 2025

GT vs RR: गुजरात टायटन्सचा संपूर्ण संघ

शुबमन गिल (कर्णधार), रशीद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान, जोस बटलर, मोहम्मद सिराज, कागिसो रबाडा, प्रसिध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, जेराल्ड कोएत्झी, आर साई किशोर, महिपाल लोमरोर, गुरनूर सिंग ब्रार, मोहम्मद खान, अरविंद खान, इशांत शर्मा, कुमार कुशाग्र, मानव सुथार, अनुज रावत, मानव सिंधू, जयंत यादव, ग्लेन फिलिप्स, करीम जनात, कुलवंत खेजुरालिया.

18:11 (IST) 9 Apr 2025

GT vs RR: राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ

संजू सॅमसन (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, संदीप शर्मा, जोफ्रा आर्चर, महेश तीक्ष्णा, वानिंदू हसरंगा, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, नितीश राणा, युधवीर सिंग, फजलहक फारुकी, वैभव सुर्यवंशी, क्वेना मफाका, कुमार कार्तिकेय, कुणाल राठोड, अशोक शर्मा, तुषार देशपांडे, शुभम दुबे.

GT vs RR IPL 2025 Highlights: गुजरात टायटन्सने विजयाचा चौकार लगावत राजस्थान रॉयल्सचा घरच्या मैदानावर मोठा पराभव केला आहे.