Mumbai Indians vs Gujarat Titans Highlights Score Updates, 12 May 2023 : आयपीएल २०२३ चा ५७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात वानखेडे मैदानावर रंगला. गुजरातने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांनी गुजरातच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. मुंबईचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने पुन्हा एकदा वादळी खेळी केली. सूर्यकुमारने ४९ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकार ठोकून १०३ धावांची नाबाद खेळी करून आयपीएलमधील पहिलं शतक ठोकलं. या धावांच्या जोरावर मुंबईने गुजरातला २१९ धावांचं आव्हान दिलं होतं. परंतु, विजयासाठी २१९ धावांचा पाठलाग करणाऱ्या गुजरात टायटन्सच्या फलंदाजांची दाणादाण उडाली.

मुंबईच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून गुजरातचा फलंदाजांना स्वस्तात माघारी पाठवलं. त्यामुळे गुजरातला २० षटकांत ८ विकेट्स गमावत १९१ धावा केल्या. राशिद खानने अप्रतिम फलंदाजी करत ३२ चेंडूत १० षटकार आणि ३ चौकारांच्या मदतीनं ७९ धावांची नाबाद खेळी केली. परंतु, राशिदला गुजरातला विजय मिळवून देता आलं नाही. त्यामुळे मुंबई इंडियन्सने या सामन्यात दणदणीत विजय मिळवला.

मुंबईसाठी नवखा गोलंदाज आकाश मधवालने ३ विकेट्स घेण्याची चमकदार कामगिरी केली. पीयुष चावलानेही अप्रतिम गोलंदाजी करून दोन विकेट्स घेतल्या. कुमार कार्तिकेयनंही दोन विकेट्स घेत मुंबईला विजयाच्या दिशेनं नेलं. तर बेहरनडॉर्फने हार्दिक पांड्याला माघारी पाठवत गुजरातला मोठा धक्का दिला. गुजरातसाठी डेविड मिलरने २६ चेंडूत ४१ धावांची खेळी केली. मिलर बाद झाल्यानंतर राशिद खानने मुंबईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. तर इतर फलंदाज मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी झाले.

रोहित शर्मा आणि ईशान किशनने पॉवर प्ले मध्ये धडाकेबाज फलंदाजी करून मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. परंतु, राशिद खानच्या गोलंदाजीवर मुंबईचे दोन्ही सलामीवीर बाद झाले आणि मुंबईला मोठा धक्का बसला. त्यानंतर मैदानात उतरलेला नेहर वढेराही राशिदच्या गोलंदाजीचा शिकार झाला. परंतु, कमालीचा फॉर्ममध्ये असलेला सूर्युकमार यादव पुन्हा एकदा तळपला आणि मुंबईच्या धावसंख्येचा आलेख उंचावला. तसंच मुंबईचा नवखा फलंदाज विष्णू विनोदनेही अप्रतिम फलंदाजी केली.

मुंबईसाठी रोहित शर्मा (२९), ईशान किशन (३१), विष्णू विनोद (३०), नेहल वढेरा (१५), टीम डेव्हिड (५) धावा करून बाद झाला. पण त्यानंतर वानखेडे मैदानात सूर्यकुमार यादवचं वादळ आलं आणि मुंबईची धावसंख्या वाऱ्याच्या वेगाप्रमाणे वाढली. सूर्यकुमारने ४९ चेंडूत ११ चौकार आणि ६ षटकार ठोकून १०३ धावांची नाबाद खेळी केली. या धावांच्या जोरावर मुंबई इंडियन्सने २० षटकात ५ विकेट्स गमावत २१८ धावांपर्यंत मजल मारली, त्यामुळे गुजराता विजयासाठी २१९ धावांचं लक्ष्य गाठावं लागणार होतं.

Live Updates

Mumbai Indians vs Gujarat Titans Highlights Score Updates

मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणाऱ्या महामुकाबल्यात कोणता संघ बाजी मारणार? पाहा लाईव्ह अपडेट्स

22:46 (IST) 12 May 2023
MI vs GT Live : धडाकेबाज फलंदाज डेव्हिड मिलरनंतर राहुल तेवतिया बाद, गुजरातला मोठा धक्का, GT, १७१-८

आकशच्या गोलंदाजीवर डेव्हिड मिलर ४१ धावांवर बाद झाला. त्यानंतर पीयुष चावलाने राहुल तेवतियाला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. तेवतिया १४ धावांवर बाद झाला. १३ षटकानंतर गुजरातची धावसंख्या १०३-८ झाली आहे, १४ षटकानंतर गुजरातची धावसंख्या ११६-८ अशी झाली आहे. पंधरा षटकानंतर गुजरातची धावसंख्या १३१-८ झाली आहे. १६ षटकानंतर मुंबईची धावसंख्या १३६-८ झाली आहे. १९ षटकानंतर गुजरातची धावसंख्या १७१-८ अशी झाली आहे.

https://twitter.com/IPL/status/1657065548050755584?s=20

22:18 (IST) 12 May 2023
MI vs GT Live : आकाश मधवाल-पीयुष चावलाचा भेदक मारा, गुजरातचे पाच फलंदाज माघारी, GT, ९०-५

मुंबई इंडियन्सचा नवखा गोलंदाज आकाश मधवालने ऋद्धीमान साहा आणि शुबमन गिलच्या सलामी जोडीला बाद करून गुजरातला मोठा धक्का दिला. त्यानंतर पीयुष चावलाने सेट फलंदाज विजय शंकरला २९ धावांवर बाद केलं. तर बेहरनडॉर्फनेही कर्णधार हार्दिक पांड्याला स्वस्तात माघारी पाठवलं. त्यानंतर कार्किकेयनं अभिनव मनोहरला २ धावांवर बाद केलं. त्यामुळे सात षटकानंतर गुजरातची धावसंख्या ५६-५ अशी झाली आहे. नऊ षटकानंतर गुजतरातची धावसंख्या ७७-५ अशी झाली आहे. दहा षटकानंतर गुजरात टायटन्सची धावसंख्या ८२-५ झालीय, ११ षटकानंतर गुजरातची धावसंख्या ९०-५ झाली आहे.

https://twitter.com/IPL/status/1657065548050755584?s=20

22:01 (IST) 12 May 2023
मुंबईच्या गोलंदाजांचा भेदक मारा, गुजरात टायटन्सचे तीन फलंदाज माघारी, GT, ४८-३

मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांनी भेदक मारा करून गुजरातच्या तीन फलंदाजांना बाद केलं. ऋद्धीमान साहा, कर्णधार हार्दिक पांड्या आणि शुबमन गिल स्वस्तात माघारी परतले. साहाने २. पांड्याने ४ आणि शुबमनने ६ सहा धावा केल्या. विजय शंकर आणि डेविड मिलर मैदानात खेळत असून गुजरातची धावसंख्या पाच षटकानंतर ३९-३ झाली आहे, पॉवर प्ले च्या सहा षटकानंतर गुजरातची धावसंख्या ४८-३ अशी झाली आहे.

https://twitter.com/IPL/status/1657062437244510209?s=20

21:40 (IST) 12 May 2023
MI vs GT Live : गुजरातचे सलामीवीर फलंदाज ऋद्धीमान साहानंतर पांड्या बाद, गुजरात, १२-२

मुंबई इंडियन्सने दिलेलं २१९ धावांचं लक्ष्य गाठण्यासाठी गुजरात टायटन्सचे सलामीवीर फलंदाज शुबमन गिल आणि ऋद्धीमान साहा मैदानात उतरले आहेत. कॅमरून ग्रीनने मुंबईसाठी पहिलं षटक फेकलं. गुजरातची धावसंख्या पहिल्या षटकानंतर बिनबाद ४ अशी झाली होती. परंतु, दुसऱ्या षटकात मुंबईचा गोलंदाज आकाश मढवालने भेदक मारा करून साहाला २ धावांवर बाद केलं.त्यानंतर तिसऱ्या षटकात कर्णधार हार्दिक पांड्या बेहनरडॉर्फचया गोलंदाजीवर ४ धावांवर बाद झाला. तीन षटकानंतर गुजरातची धावसंख्या १७-२ अशी झाली आहे.

https://twitter.com/IPL/status/1657058301040009217?s=20

21:26 (IST) 12 May 2023
MI vs GT Live ; वानखेडे मैदानात सूर्या चमकला! शतक ठोकून मुंबईची धावसंख्या केली दोनशे पार

मुंबई इंडियन्सचा धडाकेबाज फलंदाज सूर्यकुमार यादवने गुजरातच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. सूर्याने ४९ चेंडूत १०३ धावांची नाबाद खेळी करून आयपीएलमधील पहिलं शतक ठोकलं. या शतकी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने गुजरातला २१९ धावांचं आव्हान दिलं आहे.

https://twitter.com/IPL/status/1657051112648880129?s=20

21:00 (IST) 12 May 2023
MI vs GT Live : सूर्यकुमार यादवचा झंझावात, अर्धशतक ठोकून धावसंख्या वाढवली, मुंबई, २०१-५

सूर्यकुमार यादव-विष्णू विनोदने उडवला गुजरातच्या गोलंदाजांचा धुव्वा, मुंबई, १५२-३

मुंबईचे तीन फलंदाज बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि विष्णू विनोदने गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेतला आहे. चौफेर फटकेबाजी होत असल्याने मुंबईची धावसंख्या १६ षटकानंतर १५३-४ अशी झाली आहे. विष्णू विनोद ३० धावांवर असताना मोहित शर्माच्या गोलंदाजीवर बाद झाला. परंतु, सूर्यकुमार यादवने अप्रति फलंदाजी करत आजच्या सामन्यातही अर्धशतकी खेळी केली. राशिदने टीम डेव्हिडला बाद करून आजच्या सामन्यात चार विकेट्स घेण्याची कमाल केली. १७ षटकानंतर मुंबईची धावसंख्या १६८-५ झालीय. १८ षटकानंतर मुंबईची धावसंख्या १८४-५ झाली आहे. १९ षटकानंतर मुंबईची धावसंख्या २०१-५ झाली आहे.

https://twitter.com/IPL/status/1657045922658877440?s=20

20:36 (IST) 12 May 2023
MI vs GT Live : सूर्यकुमार यादव-विष्णू विनोदची आक्रमक फलंदाजी, मुंबई १३९-३

मुंबई इंडियन्सचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि ईशान किशन पॉवर प्ले मध्ये अप्रतिम फलंदाजी करून बाद झाले. त्यानंतर नेहल वढेराही तंबूत परतला. राशिद खानने मुंबईच्या या तिन्ही फलंदाजांना बाद केलं. परंतु, त्यानंतर मैदानात उतरलेला सूर्यकुमार यादव आणि विनोद सावध खेळी करत असून १२ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ११६-३ अशी झाली आहे. तेरा षटकानंतर मुंबईची धावसंख्या १३१-३ अशी झाली आहे. चौदा षटकानंतर मुंबईची धावसंख्या १३९-३ झाली आहे.

https://twitter.com/IPL/status/1657036867743674368?s=20

20:13 (IST) 12 May 2023
MI vs GT Live : राशिद खानने मुंबई इंडियन्सची केली दैना, मुंबई, ९६-३

मुंबई इंडियन्सचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने पॉवर प्ले मध्ये आक्रमक फलंदाजी करून १८ चेंडूत २९ धावा केल्या. राशिद खानच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा स्लिपमध्ये झेलबाद झाला. राशिदच्या गोलंदाजीवर चौथ्यांदा रोहित शर्मा बाद झाला. त्यानंतर राशिदने त्याच षटकात ईशान किशनला ३१ धावांवद राशिदने झेलबाद केला आणि मुंबईला दुसरा धक्का बसला. सात षटकानंतर मुंबईची धावसंख्या ६७-२ वर आहे. आठ षटकानंतर मुंबईची धावसंख्या ८१-२ झाली आहे. राशिद खानने रोहित शर्मा, ईशान किशन आणि नेहल वढेराला बाद करून तीन धक्के दिले. दरम्यान मुंबईची धावसंख्या ९ षटकानंतर ८८-३ अशी झाली असून सूर्यकुमार यादव आणि विष्णू विनोद मैदानात फलंदाजी करत आहेत. दहा षटकानंतर मुंबईची धावसंख्या ९६-३ झाली आहे.

https://twitter.com/IPL/status/1657034355254910977?s=20

19:53 (IST) 12 May 2023
MI vs GT Live : पॉवर प्लेमध्ये मुंबई इंडियन्सचा धमाका! रोहित ईशानची चौफेर फटकेबाजी, मुंबई ६१-०

मुंबई इंडियन्सचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि ईशान किशन आक्रमक फलंदाजी करत आहेत. गुजरातच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवत पॉवर प्ले मध्ये मुंबईची धावसंख्या वेगानं वाढत आहे. चार षटकानंतर मुंबईची धावसंख्या ४४-० अशी झाली आहे. पाच षटकानंतर मुंबईची धावसंख्या ५५-० अशी झाली आहे. पॉवर प्ले मध्ये मुंबईचे धडाकेबाज फलंदाज रोहित शर्मा आणि ईशान किशनने आक्रमक फलंदाजी केली. त्यामुळे सहा षटकानंतर मुंबईची धावसंख्या ६१-० झाली आहे.

https://twitter.com/IPL/status/1657028487851438085?s=20

19:30 (IST) 12 May 2023
MI vs GT Live : मुंबईचे सलामीवीर रोहित शर्मा आणि ईशान किशन मैदानात, मुंबई ३७-०

मुंबई इंडियन्सचे सलामीवीर फलंदाज कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन मैदानात उतरले आहेत. गुजरातच्या गोलंदाजांचा समाचार घेऊन किती धावांचा पल्ला मुंबई इंडियन्स गाठणार? याकडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. पहिल्या षटकानंतर मुंबईची धावसंख्या बिनबाद ६-० झाली आहे. दोन षटकानंतर मुंबई इंडियन्सची धावसंख्या २०-० झाली आहे. तीन षटकानंतर मुंबईची धावसंख्या ३७-० झाली आहे.

https://twitter.com/IPL/status/1657021558806790147?s=20

19:07 (IST) 12 May 2023
MI vs GT Live : मुंबई इंडियन्सची प्रथम फलंदाजी, हार्दिक पांड्याची पलटण करणार गोलंदाजी

वानखेडे मैदानात मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स यांच्यात महामुकाबला होत आहे. तत्पूर्वी गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रोहित शर्माच्या पलटणला फलंदाजी करावी लागणार आहे.

https://twitter.com/IPL/status/1657016400093880321?s=20

17:33 (IST) 12 May 2023
MI vs GT Live : मुंबई इंडियन्स-गुजरात टायटन्स आमनेसामने, वानखेडे मैदानात कोण मारणार बाजी?

इंडियन प्रीमियर लीग २०२३ चा ५७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजराट टायटन्स यांच्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगणार आहे. डिफेंडिंग चॅम्पियन गुजरात टायटन्स संघ पुन्हा एकदा शानदर प्रदर्शन करून प्ले ऑफमध्ये पोहोचण्याच्या जवळ गेला आहे. आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा पराभव केल्यास गुजरातचा प्ले ऑफमध्ये प्रवेश निश्चित होईल. मुंबई इंडियन्सची सुरुवात खराब झाल्यानंतर मागील काही सामन्यांमध्ये मुंबईने बाजी मारली आहे. त्यामुळे गुणतालिकेत १२ गुणांची नोंद झालेल्या मुंबईला गुजरात विरुद्धचा सामना जिंकणे महत्वाचं ठरणार आहे. दोन्ही संघांमध्ये धडाकेबाज खेळाडू असल्याने आजचा सामना अटीतटीचा होणार, असा अंदाज क्रीडाविश्वात वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, गुजरातचा पराभव करून मुंबई इंडियन्स विजयी घौडदौड सुरु ठेवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

https://twitter.com/IPL/status/1656969968960036864?s=20

Mumbai Indians vs Gujarat Titans Live Match Score in Marathi

मुंबई इंडियन्स वि गुजरात टायटन्स लाइव्ह क्रिकेट स्कोअर

वानखेडे मैदानात मुंबई इंडियन्स गुजरात टायटन्सशी भिडणार, रोहित शर्मा-हार्दिक पांड्या आमनेसामने