आयपीएलमध्ये आज मुंबई इंडियन्सचा सामना गुजरात टायटन्सशी सुरु आहे. दोन्ही संघ सध्या गुणतालिकेत पहिल्या चारमध्ये आहेत. दोघेही हा सामना जिंकून प्लेऑफमधील आपला दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. गुजरात प्लेऑफ खेळणार हे जवळपास निश्चित असले तरी मुंबईसाठी हा सामना हरल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात. गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २१८ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादवने वानखेडेवर ‘मिस्टर ३६०’ ही बिरुदावली आपल्याला का लावली जाते याचे प्रत्यक्ष उदाहरणच आजच्या सामन्यात दाखवून दिले. सूर्याच्या शतकाने मुंबई सामन्यात सुस्थितीत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जगातील नंबर वन टी२० फलंदाज सूर्यकुमार यादवने आयपीएल २०२३चे पहिले शतक झळकावले आहे. गुजरात टायटन्सविरुद्ध शुक्रवारी रात्री मुंबई इंडियन्सच्या फलंदाजाने ४९ चेंडूत नाबाद १०३ धावा केल्या. अशाप्रकारे नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्सने निर्धारित २० षटकांत ५ गडी गमावून २१८ धावा केल्या. सूर्यकुमारने सामन्याच्या शेवटच्या चेंडूवर अल्झारी जोसेफविरुद्ध षटकार ठोकून आयपीएलमधील पहिले शतक पूर्ण केले. त्याने आपल्या खेळीत मैदानावर ११ चौकार आणि सहा षटकार मारले.

‘मिस्टर ३६० डिग्री’ सूर्याने या काळात दोन अर्धशतकांची भागीदारी केली. त्याने विष्णू विनोद (२० चेंडूत ३०) सोबत चौथ्या विकेटसाठी ४२ चेंडूंत ६२ धावांची भागीदारी केल्यानंतर सहाव्या विकेटसाठी कॅमेरॉन ग्रीनसोबत १८ चेंडूत ५४ धावांची नाबाद भागीदारी केली. यात ग्रीनचे योगदान तीन चेंडूत अवघ्या तीन धावांचे होते. सूर्यकुमारने शेवटच्या तीन षटकांमध्ये १५ चेंडूंचा सामना केला आणि या १५ चेंडूंमध्ये ५० धावा जोडल्या. १८व्या षटकात मोहितविरुद्ध तीन चौकार आणि एक षटकार मारल्यानंतर त्याने १९व्या षटकात शमीविरुद्ध एक षटकार आणि दोन चौकार मारले. त्याने शेवटच्या षटकात दोन षटकार मारत शतक पूर्ण केले.

रोहित-इशानने दमदार सुरुवात करून दिली

याच षटकात सूर्यकुमारने डावातील पहिला षटकार ठोकला. रशीद आणि नूरविरुद्ध सावध फलंदाजी करणाऱ्या सूर्यकुमारने १५व्या षटकात पुन्हा जोसेफला चौकार आणि षटकार ठोकून संघाची धावसंख्या १५० पर्यंत नेली. सूर्यकुमार यादवशिवाय, इशान किशन (२० चेंडूत ३१), रोहित शर्मा (१८ चेंडूत २९) आणि विष्णू विनोद यांनीही फलंदाजी करताना चांगले योगदान दिले. गुजरातकडून राशिद खानने चार षटकांत ३० धावा देत चार बळी घेतले. मोहित शर्माला (चार षटकांत ४३ धावा) यश मिळाले. मोहम्मद शमी (चार षटकात ५३) आणि अल्झारी जोसेफ (चार षटकात ५२धावा) यांनी कोणतेही यश न घेता धावा केल्या.

सूर्यकुमार यादवने गेल्या काही सामन्यांपासून विरोधी संघासोबत खऱ्या अर्थाने युद्ध छेडले आहे. पहिल्या पाच सामन्यात सूर्याची बॅट शांत होती. गुजरातविरुद्धच्या सामन्यात त्याने मागील सामन्यात कोणतीही कसर सोडलेली नाही. आरसीबीविरुद्धच्या सामन्यात त्याने ८३ धावांत विकेट्स घेतल्या होत्या. त्याचवेळी, आता गुजरातविरुद्ध शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकत त्याने शतक पूर्ण करून आपली ताकद दाखवून दिली. स्कायच्या धडाकेबाज शतकाच्या जोरावर मुंबईने गुजरातसमोर २१९ धावांचे लक्ष्य ठेवले आहे.

हेही वाचा: IND vs PAK:  भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप सामना अहमदाबादमध्ये आयोजित करण्यावरून पीसीबी चीफ नाराज; म्हणाले, “तिथे कोणाचे राज्य…”

आयपीएल २०२३ मधील भारतीय खेळाडूचे हे तिसरे शतक

  • वेेंकटेश अय्यर-१०४ रन vs मुंबई इंडियंस
  • यशस्वी जैस्वाल- १२४ रन vs मुंबई इंडियंस
  • सूर्यकुमार यादव- १०३* vs गुजरात टाइटंस
मराठीतील सर्व आयपीएल २०२४ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mi vs gt score mumbai indians set a target of 219 runs in front of gujarat suryakumar yadavs century avw
First published on: 12-05-2023 at 21:52 IST