Premium

चेन्नईने IPL चा किताब जिंकल्यानंतर धोनीच्या कुटुंबियांचे आनंदाश्रू तरळले, पत्नी साक्षी अन् मुलगी झिवा झाली भावुक, ‘तो’ Video व्हायरल

धोनीच्या कुटुंबियांचा मैदानातील तो भावुक क्षण कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

MS Dhoni Emotional Video Viral, IPL 2023
एम एस धोनीचा कुटुंबियांसोबतचा तो व्हिडीओ व्हायरल. (Image-Twitter)

Sakshi Dhoni And Ziva Emotional Moment With MS Dhoni Video Viral : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सोमवारी आयपीएल २०२३ चा फायनल सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंगला. गुजरातने २० षटकात २१४ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर पु्न्हा एकदा मैदानात पावसाच्या सरी कोसळल्याने सामना डकवर्थ लुईसनियमानुसार चेन्नईला १५ षटकांत १७० धावांचं लक्ष्य गाठायचं होतं. हा सामना शेवटच्या षटकापर्यंत अटीतटीचा झाला. ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू यांनी अप्रतिम फलंदाजी करून चेन्नईला विजयाच्या दिशेनं नेलं. परंतु, सामन्यात खरा रोमांचा पाहायला मिळाला तो म्हणजे मोहित शर्माच्या शेवटच्या षटकात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारण शेवटच्या दोन चेंडूवर चेन्नईला १० धावांची गरज असताना रविंद्र जडेजाने चौकार-षटकार ठोकला आणि चेन्नईनं आयपीएलचा पाचवा किताब जिंकला. धोनी शून्यावर बाद झाल्यानंतर डग आऊटमध्ये गेला आणि शांत बसला. तो कमालीचा भावुक झाला होता. पण जडेजानं चेन्नईला विजय मिळवून दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. जडेजाला त्याने मिठी मारून आनंद साजरा केला. तसंच धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी झिवा मैदानात भावुक झाली आणि जीवाने धोनीला मिठी मारुन आनंद साजरा केला. धोनीच्या कुटुंबियांचा मैदानातील तो भावुक क्षण कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

नक्की वाचा – CSK vs GT, IPL 2023 : शेवटची ओव्हर, जाडेजा स्ट्राईकवर आणि दोन बॉल १० रन; काय घडलं ‘त्या’ नाट्यमय षटकात? पाहा Video

इथे पाहा व्हिडीओ

चेन्नई सुपर किंग्जसाठी सलामीला मैदानात उतरलेल्या ऋतुराज गायकवाडने १६ चेंडूत २६ धावा केल्या. तर डेवॉन कॉन्वेनं २५ चेंडूत ४७ धावांची खेळी साकारली. पण हे दोन्ही फलंदाज नूर अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाले. त्यानंतर अजिंक्य रहाणेनं १३ चेंडूत २७ धावा केल्या. रहाणेला मोहित शर्माने बाद केल्यानंतर अंबाती रायुडूने १९ धावा केल्या. पण तोही मोहितच्या गोलंदाजीवर बाद झाला. त्यानंतर चेन्नईचा कर्णधार एम एस धोनी मैदानात उतरला पण धोनी या सामन्यात शून्यावर बाद झाला. पण रविंद्र जडेजा आणि शिवम दुबेनं गुजरातच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. दुबे २१ चेंडूत ३२ धावा करून नाबाद राहिला. तर जडेजानं १५ धावांची नाबाद खेळी केली.

मराठीतील सर्व आयपीएल २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-05-2023 at 12:19 IST
Next Story
IPL Final : गौरव मोरेलाही आयपीएलची क्रेझ, लंडनमध्ये पाहिली CSK विरुद्ध GT फायनल, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…