Tilak Verma available for match against Gujarat: आयपीएल २०२३ चा ५७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात होणार आहे. प्लेऑफमध्ये जाण्यासाठी आणि पकड मजबूत करण्यासाठी मुंबईला गुजरातविरुद्धचा हा सामना जिंकावा लागेल. मुंबई इंडियन्सने गेल्या तीन सामन्यांत २०० किंवा त्याहून अधिक धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करतान दोन सामने जिंकले आहेत. यंदा त्याच्या संघाची गोलंदाजी खूपच निराशाजनक झाली आहे. फलंदाजीमध्ये संघ सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. दरम्यान, संघातील एक धडाकेबाज फलंदाज तंदुरुस्त झाला असून संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील होण्यासाठी उपलब्ध आहे.
हा खेळाडू तंदुरुस्त झाला आहे –
मुंबई इंडियन्सचा खेळाडू तिलक वर्मा या सामन्यासाठी तंदुरुस्त आहे आणि पुन्हा एकदा प्लेइंग इलेव्हनचा भाग होण्यासाठी सज्ज आहे. मुंबईने मागील सामन्यात आरसीबीचे २०० धावांचे लक्ष्य १७ षटकांत केले होते. शेवटच्या सामन्यात सूर्यकुमार यादवचे फॉर्ममध्ये परतणे आणि नेहल वढेराची खेळी याने तिलक वर्माची अनुपस्थिती भरून काढली. त्याचवेळी, इशान किशन पुन्हा एकदा संघासाठी धमाकेदार सुरुवात करत आहे. टीम डेव्हिड आणि कॅमेरॉन ग्रीन यांनी मोठ्या फटकेबाजी करत संघासाठी चांगली कामगिरी केली. एकूणच त्यांच्या संघाची फलंदाजी अतिशय संतुलित आहे.
हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे मुंबईसाठी शेवटचे दोन सामने खेळू न शकलेला वर्मा टायटन्सविरुद्ध पुन्हा खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे. मुंबई संघ प्रथम फलंदाजी करतो, तेव्हा तिलक वर्मा प्लेइंग इलेव्हनचा भाग असतो. पण पाठलाग करताना तो आकाश मधवालचा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून येतो.
दोन्ही संघांची संभाव्य प्लेइंग इलेव्हन –
मुंबई इंडियन्स: रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, कॅमेरॉन ग्रीन, नेहल वढेरा, टिम डेव्हिड, क्रिस जॉर्डन, पियुष चावला, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल
गुजरात टायटन्स: हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर, साई सुदर्शन, वृद्धिमान साहा, मॅथ्यू वेड, रशीद खान, राहुल तेवतिया, विजय शंकर, मोहम्मद शमी