PBKS vs MI , Yuzvendra Chahal Comeback: आयपीएल २०२५ स्पर्धेतील अंतिम फेरीचं तिकीट मिळवण्यासाठी आज मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ भिडणार आहेत. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. मुंबई इंडियन्सने एलिमिनेटरच्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला पराभूत करून क्वालिफायर २ मध्ये प्रवेश केला आहे. तर पंजाब किंग्ज हे दोन्ही संघ भिडणार आहेत. जो संघ हा सामना जिंकेल तो अंतिम फेरीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा सामना करणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी पंजाब किंग्ज संघाला दिलासा देणारी, तर मुंबई इंडियन्स संघाचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येत आहे.

या सामन्यापूर्वी पंजाब किंग्ज संघाला दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. माध्यमातील वृत्तानुसार , पंजाब किंग्जचा अनुभवी फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल या सामन्यात कमबॅक करू शकतो. या महत्वाच्या सामन्यापूर्वी पंजाब किंग्ज संघाचे खेळाडू नरेंद्र मोदी स्टेडियमवर सराव करताना दिसले. यादरम्यान युजवेंद्र चहल देखील गोलंदाजीचा सराव करताना दिसून आला. यावरून असा अंदाज व्यक्त केला जात आहे की, तो आज होणाऱ्या सामन्यात प्लेइंग ११ मध्ये खेळताना दिसू शकतो.

दुखापतीमुळे काही सामने राहावं लागलं संघाबाहेर

युजवेंद्र चहलला दुखापतीमुळे काही सामने संघाबाहेर राहावं लागलं आहे. त्याच्या बोटाला दुखापत झाली आहे. तो १८ मे ला शेवटचा सामना खेळताना दिसून आला होता. त्यानंतर त्याला खेळण्याची संधी मिळालेली नाही. मात्र, या महत्वाच्या सामन्यापूर्वी तो गोलंदाजीचा सराव, फुटबॉल खेळताना आणि झेल पकडण्याचा सराव करताना दिसून आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्याच्या पूर्वसंध्येला अहमदाबादमध्ये पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे गुजरात टायटन्सच्या खेळाडूंना सराव करायला मिळाला. पण, ज्यावेळी मुंबई इंडियन्सचे खेळाडू सराव करण्यासाठी आले त्यावेळी खेळपट्टीवर कव्हर्स होते. त्यामुळे मुंबईच्या खेळाडूंना सराव करता आला नाही. एकीकडे दुखापतग्रस्त युजवेंद्र चहल कमबॅक करणार असल्याची चिन्ह आहेत. तर दुसरीकडे मुंबईचा वेगवान गोलंदाज दीपक चाहर अजूनही फिट झालेला नाही. ही मुंबई इंडियन्स संघासाठी चिंता वाढवणारी बाब आहे. या महत्वाच्या सामन्यात दीपक चाहर संघात असणं गरजेचं आहे. कारण पूर्णपणे फिट नसल्यामुळे गेल्या सामन्यातही तो खेळू शकला नव्हता.