MI vs PBKS IPL 2025 Qualifier-2: आयपीएल २०२५ चा अंतिम फेरीचा दुसरा संघ आज मिळणार आहे. प्लेऑफमधील दुसरा क्वालिफायर सामना आज १ जून रोजी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स या संघांमध्ये खेळवला जात आहे. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवला जात आहे. या सामन्याची नाणेफेक झाली असून पंजाब किंग्सने नाणेफेक जिंकली आहे. तर मुंबई इंडियन्सने मोठं पाऊसल उचलत नव्या खेळाडूला पदार्पणाची संधी दिली आहे.
मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या मोसमात उत्कृष्ट वेगवान गोलंदाजी त्रिकुटासह उतरला आहे. ज्यामध्ये जसप्रीत बुमराह, दीपक चहर आणि ट्रेंट बोल्टसारखे गोलंदाज आहेत. पण प्लेऑफमध्ये धडक मारताच मुंबईला मोठा धक्का बसला. अखेरच्या लीग स्टेज सामन्यात संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चहर दुखापतीमुळे मैदानाबाहेर गेला आणि एलिमिनेटर सामना खेळू शकला नाही.
दीपक चहरच्या दुखापतीमुळे मुंबईने तात्पुरता बदली खेळाडू म्हणून संघात रिटर्ड ग्लीसनला घेतलं होतं. रिचर्ड ग्लीसनला एलिमिनेटर सामन्यात पदार्पणाची संधी दिली आणि त्याने मुंबईच्या विजयात मोठं योगदान दिलं. पण एलिमिनेटर सामन्यातील अखेरच्या षटकात त्याला पायामध्ये ताण जाणवला. तो ३ चेंडू टाकून मैदानाबाहेर गेला आणि आता दुसऱ्या क्वालिफायर सामन्यातूनही बाहेर झाला आहे.
दीपक चहर आणि रिचर्ड ग्लीसनला दुखापत झाल्यामुळे मुंबईने पंजाबविरूद्ध सामन्यात रीस टोप्लेला पदार्पणाची संधी दिली. रिस टोप्लीला सामन्यापूर्वी ट्रेंट बोल्टने पदार्पणाची कॅप दिली. रीस टोप्ले क्वालिफायर सामन्यात बुमराह आणि बोल्टसह गोलंदाजी करताना दिसणार आहे. तर अश्वनी कुमार वेगवान गोलंदाज इम्पॅक्ट प्लेअर असेल.
मुंबई इंडियन्सची प्लेईंग इलेव्हन
रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या (कर्णझार), नमन धीर, मिचेल सँटनर, राज बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रीस टोपली