आयपीएलचे यंदाचे पर्व शेवटच्या टप्यात आहे. मोजकेच सामने शिल्लक असल्यामुळे सर्वच संघ प्लेऑफर्यंत पोहोचण्यासाठी कसोशीने प्रयत्न करत आहेत. काल (१८ मे) झालेल्या लखनऊ सुपर जायंट्स आणि कोलकाता नाईट लायडर्स या सामन्यात लखनऊचा विजय झाल्यामुळे केकेआर संघ प्लेऑफच्या बाहेर पडला. केकेआरचे आव्हान संपुष्टात आले असून लखनऊने प्लेऑफमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे.

हेही वाचा >>> IPL 2022 RCB vs GT : आज बंगळुरु संघासाठी ‘करो या मरो,’ गुजरातशी करणार दोन हात, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

यावेळी सर्वांनाच आश्चर्यचकित करुन टाकणारा खेळ लखनऊ आणि गुजरात या दोन संघांनी करुन दाखवली आहे. तर दुसरीकडे सर्वात यशस्वी मानले जाणारे चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन्ही संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहेत. त्याचरोबर लखनऊविरोधात खेळताना पराभव झाल्यामुळे केकेआर संघदेखील प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. यापूर्वीच्या हंगामांमध्ये तीन संघांपैकी एकतरी संघ प्लेऑफमध्ये राहिलेला आहे. मात्र यावेळी हे तिन्ही संघ प्लेऑफच्या बाहेर असतील. आयपीएलच्या इतिहासात असे कधीही झालेले नाही.

हेही वाचा >>> IPL 2022 : “तो हिरो बनू शकला असता पण…”; रिंकू सिंहबद्दल कर्णधार श्रेयस अय्यरने व्यक्त केले मत

मुंबई इंडियन्स संघाने आतापर्यंत पाच वेळा जेतेपद पटकावलेले आहे. तर चेन्नई संघाने चार वेळा ट्रॉफी जिंकलेली आहे. केकेआर या संघानेदेखील दोन वेळा जेतेपद पटकावलेले आहे. हे तिन्ही संघ आतापर्यंत सर्वात यशस्वी ठरलेले संघ आहेत. मात्र या पर्वामध्ये चित्र काहीसे वेगळे आहे. यावेळी पदार्पणाच्या हंगामातच गुजरात आणि लखनऊ या दोन्ही नव्या संघांनी आपले प्लेऑफमधील स्थान निश्चित केले आहे. तर चेन्नई, मुंबई आणि केकेआर हे तिन्ही संघ पहिल्यांदाचा प्लेऑफमध्ये नसणार आहेत. यापूर्वी या तीन संघांपैकी एकतरी संघ प्लेऑफमध्ये राहिलेला आहे.

हेही वाचा >>> LSG vs KKR : ९ मॅचनंतर संधी मिळालेल्या एव्हिन लुईसनचा झेल ठरला ‘टर्निंग पॉइंट’; केकेआरकडून सामना घेतला हिसकावून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स हे संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. तर आज बंगळुरु संघासाठी करो या मरोची लढाई असणार आहे. आज पराभव झाला तर बंगळुरुचेही आव्हान संपुष्टात येईल.